वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०० पृ. १
  • लहान मुलांकरता उत्तम संधी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लहान मुलांकरता उत्तम संधी
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • पालकांनो—आपल्या पाल्यांना प्रचार करण्याची तालीम द्या
    आमची राज्य सेवा—१९९७
  • आईवडिलांनो आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला मदत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • पालकांनो आपल्या मुलांना प्रेमाने वळण लावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km ५/०० पृ. १

लहान मुलांकरता उत्तम संधी

१ यहोवाच्या साक्षीदारांपैकी बरेचजण जे आज स्वतः आईवडील बनले आहेत, आपल्या लहानपणी एका खास कार्यात मोठ्या आनंदाने सहभागी होण्याविषयीच्या आठवणी सांगतात; ते म्हणजे मॅगझीन डे किंवा मासिकवाटपाचे कार्य. हे कार्य १९४९ साली सर्व मंडळ्यांतून सुरू करण्यात आले. दर आठवडी एक दिवस खास टेहळणीबुरूज व सावध राहा! या मासिकांच्या वाटपासाठी ठेवला जायचा. रस्त्यांवर, घरोघर, दुकानांमध्ये आणि इतर ठिकाणी ही मासिके दिली जायची. लहान मुले या दिवसाची आतुरतेने वाट पाहायचे, कारण मंडळीतल्या मोठ्यांप्रमाणेच त्यांना देखील मासिके वाटण्याची संधी मिळायची. तुम्हाला लहानपणी या कार्यात सहभागी झाल्याचे आठवते का?

२ आपल्या मुलांना प्रोत्साहन द्या: फार लहान मुले साहजिकच घरोघरच्या कार्यात घरमालकाशी बायबलमधून चर्चा करू शकणार नाहीत; पण ही मुले मासिके मात्र सहज देऊ शकतात. यासाठी फक्‍त दोनतीन लहान वाक्यांत प्रस्तावना देऊन मासिक देणे, एवढेच करायचे असते. जसे की, मुखपृष्ठावर असलेल्या चित्राबद्दल अगदी थोडक्यात सांगितले तर तेही पुरेसे आहे. बरेचजण लहान मुलांकडून मासिके घ्यायला लगेच तयार होतात; लहान वयातही, प्रामाणिकपणे इतके चांगले कार्य करण्याबद्दल ते आपल्या मुलांचे कौतुकही करतात. मुलांना थोडी मदत केली तर या कार्यात ते निपुण होऊ शकतात; अशारितीने, ते राज्याच्या संदेशाचा प्रसार करण्यात मोलाचे योगदान देऊ शकतात. अर्थात, मुले मोठी होऊ लागतात तसतसे आईवडिलांनी त्यांना प्रचार करण्यात अधिक कौशल्य संपादन करण्यास मदत करत राहावे.

३ मॅनवेल फक्‍त तीन वर्षांचा होता, तेव्हापासून तो प्रचार कार्याला जाऊ लागला. त्याच्या आईवडिलांनी त्याच्याकडून एक लहानसा संदेश पाठ करून घेतला. आज तो त्यांच्यासोबत अतिशय उत्साहाने प्रचार कार्य करतो आणि कितीतरी मासिके, ब्रोशर आणि ट्रॅक्ट लोकांना देतो. घरोघरच्या कार्यातच नव्हे तर इतर ठिकाणी देखील तो चांगल्याप्रकारे प्रचार करतो. एकदा त्याच्या आईवडिलांनी त्याला एका पार्कमध्ये खेळायला नेले; तेथे त्याने स्वतःहूनच काही लोकांशी बोलून त्यांना ट्रॅक्ट्‌स दिले. मॅनवेल अजून खूप लहान आहे, पण प्रचार कार्यातला त्याचा उत्साह पाहून त्याच्या आईवडिलांनाच नव्हे तर मंडळीतल्या सर्व बंधुभगिनींना अतिशय प्रोत्साहन मिळते.—नीति. २२:६.

४ यहोवाच्या साक्षीदारांच्या २००० सालच्या कॅलेंडरवर दर शनिवारी “मॅगझीन डे” असे लिहिलेले तुम्हाला आढळेल. आईवडिलांनो, आम्ही तुम्हाला हा खास सल्ला देऊ इच्छितो की या कार्यात तुम्ही नव्याने लक्ष द्यावे. सेवेत सहभागी होण्याची ही तुमच्या मुलांकरता फार चांगली संधी आहे. तेव्हा त्यांना शक्यतो नियमितपणे हे कार्य करण्यासाठी मदत करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा