आवर्जून पुन्हा भेटा!
१ “व्वा! काय छान चर्चा झाली आज! पुढच्या वेळी न विसरता या व्यक्तीला भेटलंच पाहिजे.” असे कधीतरी म्हटल्याचे तुम्हाला जरूर आठवत असेल. पण, पुन्हा भेट घ्यायला गेल्यानंतर मात्र ती व्यक्ती नेमकी कुठे राहते हेच आठवत नाही. असे कधी तुमच्या बाबतीत घडले आहे का? असल्यास यावर एकच उपाय आहे. तो म्हणजे त्या व्यक्तीचा नाव-पत्ता व्यवस्थित लिहून घेणे.
२ सर्व माहिती लिहून घ्या: आस्थेवाईक व्यक्तीशी चर्चा केल्यानंतर चर्चा केलेल्या सर्व गोष्टी तुमच्या मनात अजूनही ताज्या असतात तोच सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित लिहून काढा. यात व्यक्तीचे नाव आणि पत्ता यांसोबत पुन्हा भेट द्याल तेव्हा तिला कसे ओळखाल ते लिहा. लिहून घेतलेली माहिती अचूक असण्यास हवी. ती माहिती अचूक आहे किंवा नाही हे त्या व्यक्तीलाच विचारा. तुम्ही कोणत्या विषयावर बोलला, कोणती शास्त्रवचने वाचलीत आणि घरमालकाला कोणते साहित्य वाचायला दिले हे सर्व सविस्तर लिहून घ्या.
३ त्या व्यक्तीला तुम्ही एखादा प्रश्न विचारला असल्यास आणि त्याचे उत्तर पुढील भेटीत देणार असल्यास तो प्रश्नही लिहून घ्या. तसेच, त्या घरमालकाबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल किंवा त्याच्या धर्माबद्दल तुम्हाला काही माहीत असल्यास ते देखील लिहून घ्यायला विसरू नका. शेवटी हेसुद्धा लिहून घ्या, की तुम्ही त्या व्यक्तीला केव्हा आणि कोठे भेटला होता आणि पुन्हा केव्हा तुम्ही त्याची भेट घ्याल. मग पुढच्या वेळी तुम्ही घरमालकाला भेटता आणि लिहून घेतलेल्या मुद्द्यांवर त्याच्याशी चर्चा करता तेव्हा आपल्याला त्याच्याविषयी किती आत्मीयता आहे, कळकळ आहे याची त्याला जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. अशाप्रकारे सर्व माहिती सविस्तर लिहून ठेवल्यामुळे तुमच्याकडे अचूक माहिती तर राहीलच पण तुम्ही कोणाला तरी पुन्हा भेटण्याचा शब्द दिला आहे या गोष्टीची आठवणही तुम्हाला राहील.—१ तीम. १:१२.
४ पूर्ण माहिती लिहून घेतल्यानंतर तो कागद क्षेत्र सेवेच्या बॅगमध्ये ठेवा ज्यात तुम्ही तुमचे बायबल, रिझनिंग पुस्तक आणि पुस्तके-मासिके ठेवता. यामुळे लिहून घेतलेली माहिती हरवणार नाही. घरी न भेटणाऱ्या लोकांची नोंद आणि पुनर्भेटींसंबंधित माहिती हाऊस-टू-हाऊस रेकॉर्डवर वेगवेगळी लिहावी. अर्थात, या सर्व माहितीचे तेव्हा चीज होईल जेव्हा तुम्ही त्या आस्थेवाईक व्यक्तीला न विसरता पुन्हा भेटायला जाल. तेव्हा, आवर्जून पुन्हा भेटा.
५ घरमालकाचा विचार करा: सेवेला जाण्याची तुम्ही तयारी करता तेव्हा ज्या लोकांना तुम्ही पुन्हा जाऊन भेटण्याचे ठरवले आहे त्या सर्व लोकांसंबंधी लिहून घेतलेली माहिती नजरेखालून घाला. त्या प्रत्येक व्यक्तीचा विचार करा आणि तुम्ही पुन्हा त्याची भेट घ्याल तेव्हा सुरवात कशी करता येईल याचाही पूर्वविचार करा. बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी या व्यक्तीला कसे तयार करता येईल याचाही विचार करा. अशी पूर्वयोजना केल्याने सुवार्तेच्या कामात तुम्हाला चांगले प्रतिफळ मिळेल आणि त्यामुळे सेवेतला तुमचा आनंद द्विगुणीत होईल.—नीति. २१:५अ.
६ तेव्हा, पुढच्या वेळी एखादी आस्थेवाईक व्यक्ती भेटल्यास तिची सर्व माहिती आपल्याला बरोबर लक्षात राहील असा विचार करू नका. तर सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित लिहून काढा, लिहिलेल्या माहितीची उजळणी करा, त्या व्यक्तीचा विचार करा आणि शेवटी आवर्जून पुन्हा भेटा!