सेवा सभा आराखडा
एप्रिल १० ने सुरू होणारा सप्ताह
गीत १२२ (२३)
१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. एप्रिल १६ रोजी होणाऱ्या खास भाषणाची सर्वांना आठवण करून द्या. “मानवजातीला खंडणीची गरज का आहे” या शीर्षकावर सदर भाषण आधारित असेल. तसेच, शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे—२००० यात दाखवल्याप्रमाणे एप्रिल १४ ते १९ पर्यंत स्मारक विधीकरता नेमून दिलेले बायबल वाचन करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या. आमची राज्य सेवा याच्या याच अंकातील पुरवणीत पृष्ठ ४ वर दिलेल्या “स्मारक विधीकरता सूचना” या सदराची उजळणी करा.
१५ मि: “तुम्ही ख्रिस्तावर प्रेम करता का?” एक मिनिटात लेख प्रस्तूत करून प्रश्नोत्तरांनी लेखाची चर्चा करा. मे १, १९९८ च्या टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठे १६-१७ वरील परिच्छेद १२ ते १३ मध्ये दिलेले काही विचार श्रोत्यांपुढे मांडा. लोकांना स्मारक विधीचे आमंत्रण देण्यासाठी खास प्रयत्न करण्याचे उत्तेजन मंडळीला द्या.
२० मि: “एप्रिल—चांगल्या कामांत आवेशी राहण्याचा महिना!” प्रश्नोत्तरे. एप्रिल महिन्यात आपण काय काय साध्य करू इच्छितो याविषयी उत्साहवर्धक चर्चा. शेवटच्या तीनचार मिनिटांत, “बहुतेकांना उत्तेजन देणारा आवेश” या लेखाची उजळणी करा.
गीत १९९ (१७) आणि समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल १७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २५ (२)
१३ मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. एप्रिल महिना संपण्यासाठी फक्त दोन आठवडे बाकी आहेत. तेव्हा, महिना संपण्याआधी सर्वांना सेवेत सहभाग घेण्याचे प्रोत्साहन द्या. नवीन मासिकांचा उपयोग करून मासिके कशी सादर केली जाऊ शकतात त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा. काही लोक कदाचित इस्टरच्या प्रथांमध्ये सहभाग घेण्याची तुम्हाला गळ घालतील. त्याकरता रिझनिंग पुस्तकातील पृष्ठे १७९-८० वरील माहितीवर चर्चा करा.
१६ मि: “तुमच्यात त्याग करण्याची वृत्ती आहे का?” प्रश्नोत्तरे. आपल्या जीवनात अतिमहत्त्वाच्या गोष्टी कोणत्या हे ओळखून त्यांना प्राधान्य देण्याची गरज आहे. ज्या गोष्टींमुळे आध्यात्मिकदृष्ट्या आपल्याला लाभ होईल त्या गोष्टींत चिकाटी राखण्याकरता प्रेरणेची आणि आत्मसंयमाची गरज आहे. या संदर्भात येशूच्या उदाहरणावरून काय शिकता येण्यासारखे आहे ते सांगा.—इन्साइट, खंड २, पृष्ठ ६८, परिच्छेद ३-५ पाहा.
१६ मि: आपल्या मासिकांचा सगळ्यात चांगला उपयोग होईल अशाच ठिकाणी ती द्या. या विषयावर भाषण आणि श्रोत्यांसोबत चर्चा. या संदर्भात, जानेवारी ८, १९९५, सावध राहा! (इंग्रजी), पृष्ठे २२-४ वर दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची उजळणी करा. आपल्या मासिकांतले विशिष्ट लेख ज्यांना विशेष अपीलकारक वाटतील अशा लोकांचा शोध करणे का जरूरीचे आहे याचे स्पष्टीकरण द्या. विशिष्ट प्रकारच्या लोकांना, व्यवसायांना किंवा संस्थांना खास आकर्षक वाटले असतील अशा जुन्या अंकातील लेखांविषयी श्रोत्यांना सांगा. या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे कसा फायदा झाला ते श्रोत्यांना विचारा.
गीत ७१ (४) आणि समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल २४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १३७ (११)
१० मि: स्थानिक घोषणा. स्मारक विधीची उपस्थिती किती होती ते सांगा. पहिल्यांदाच उपस्थित राहिलेल्या लोकांना कसे वाटले हे श्रोत्यांना विचारा.
१७ मि: सभांना उपस्थित राहण्यासाठी नवोदितांना मदत करा. ज्ञान पुस्तकातील पृष्ठे १६१-३, परिच्छेद ५-८ वर आधारित भाषण. एखाद्या व्यक्तीबरोबर अभ्यास सुरू केल्यानंतर त्या व्यक्तीला लवकरात लवकर सभांना उपस्थित राहण्याचे उत्तेजन द्या. पण, अशा नवोदित व्यक्तींना हे थोडेसे कठीण वाटेल. तेव्हा, त्यांना सभांना येण्यास उत्तेजित करण्यासाठी काय करता येईल? गृह बायबल अभ्यास चालवणाऱ्या लोकांनी वेळ काढून आपल्या विद्यार्थ्यांसोबत ज्ञान पुस्तकातील या माहितीची चर्चा करावी आणि आपल्यासह त्यांना सत्य उपासना करता यावी म्हणून काही निश्चित योजना करावी.
१८ मि: “तुम्ही नियमितपणे राज्याचा प्रचार करता का?” हा भाग मंडळीच्या सचिवाने भाषण आणि चर्चेच्या स्वरूपात हाताळावा. आपण क्षेत्र सेवेचा अहवाल का देतो त्याची कारणे सांगा. (आपली सेवा पुस्तकातील पृष्ठे १०६-१०८ पाहा.) वेळच्या वेळी अहवाल दिला नाही तर कोणत्या अडचणी उद्भवू शकतात ते सांगा. वेळेवर अहवाल देण्यासाठी बंधुभगिनी काय करतात ते श्रोत्यांना विचारा. या बाबतीत मंडळीचे पुस्तक अभ्यास संचालक कशी मदत करू शकतात तेही सांगा. एप्रिल महिना संपत आला आहे तेव्हा येत्या शनिवारी-रविवारी सर्वांना सेवेत सहभाग घेण्याचे आणि महिन्याच्या शेवटी सेवेचा अहवाल देण्याचे उत्तेजन द्या.
गीत २०० (२३) आणि समाप्तीची प्रार्थना.
मे १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २१३ (२३)
१२ मि: स्थानिक घोषणा. सर्वांना एप्रिल महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. आपल्या पुस्तक अभ्यास गटातील प्रत्येकाने आपला अहवाल दिला आहे की नाही याची मंडळीच्या पुस्तक अभ्यास संचालकांनी खात्री करावी जेणेकरून मे ६ तारखेपर्यंत सर्व अहवाल संकलित करून संस्थेला पाठवता येतील. प्रश्न पेटीची चर्चा करा. त्यातील माहिती आपल्या मंडळीला कशी लागू होऊ शकते ते सांगा.
१५ मि: स्थानिक गरजा.
१८ मि: “आवर्जून पुन्हा भेटा!” श्रोत्यांसोबत चर्चा. पुनर्भेटी करण्यात आपण कधी कधी मागे का पडतो याची कारणे विचारात घ्या. व्यक्तीबद्दलची अचूक माहिती लिहून घेणे आणि पुनर्भेट करण्याची मनस्वी इच्छा असणे का महत्त्वाचे आहे ते सांगा. दर आठवडी पुनर्भेटी करण्यासाठी थोडा वेळ काढण्याचा सल्ला द्या. या संदर्भात आपली सेवा पुस्तकातील पृष्ठे ८८-९ वर काय सांगितले आहे त्याची चर्चा करा. तसेच, १९९५ इयरबूक यात पृष्ठ ४५ वर दिलेला अनुभवही सांगा.
गीत ६८ (२३) आणि समाप्तीची प्रार्थना.