बायबल किती प्रभावशाली आहे ते पाहा!
पण कसे? द बायबल—इट्स पावर इन युवर लाईफ हा व्हिडिओ पाहून. सदर व्हिडिओ, द बायबल—अ बुक ऑफ फॅक्ट ॲण्ड प्रॉफेसी या व्हिडियोकॅसेट मालिकेतला तिसरा खंड आहे.
तुम्हाला सुखी वैवाहिक जीवन हवे आहे का? जीवनातल्या खडतर प्रसंगांतून निभावून जाण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन हवे आहे का? तरुण लोकांना जबाबदार प्रौढ कसे बनता येईल? सदर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बायबल तुमची मदत करू शकते. बायबलने कशाप्रकारे लोकांच्या जीवनात एक चांगला प्रभाव पाडला आहे आणि हल्लीच्या समस्यांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी बायबल तत्त्वांनी कशाप्रकारे लोकांना साहाय्य केले आहे हे त्यांच्याच तोंडून ऐका.
आपल्या जीवनात देवाच्या वचनाचा एक दीपस्तंभ म्हणून उपयोग केल्याने कोणकोणते फायदे होतात हे नवीन लोकांना दाखवून देण्यासाठी हा व्हिडिओ एक परिणामकारक साधन आहे. द बायबल—इट्स पावर इन युवर लाईफ या व्हिडिओच्या प्रती संस्थेकडे उपलब्ध आहेत. तुम्हाला या व्हिडियोची प्रत हवी असल्यास मंडळीच्या साहित्य सेवकामार्फत तुम्ही आपली ऑर्डर पाठवू शकता.