बायबल अभ्यासादरम्यान शास्त्रवचनांचा परिणामकारी वापर करणे
१. बायबल अभ्यास चालवताना आपण शास्त्रवचनांवर जास्त जोर का दिला पाहिजे?
१ आपण लोकांबरोबर बायबल अभ्यास करतो तेव्हा त्यांना “शिष्य” बनवण्याचा आपला हेतू असतो. देवाच्या वचनातील शिकवणी समजण्यास व त्यांचा स्वीकार करण्यास तसेच या शिकवणींचा आपल्या जीवनात अवलंब करून शिष्य बनण्यास आपण त्यांना मदत करतो. (मत्त. २८:१९, २०; १ थेस्सलनी. २:१३) त्यामुळे आपला अभ्यास हा शास्त्रवचनांवर आधारित असला पाहिजे. सुरुवातीला आपण, विद्यार्थ्यांना त्यांच्या बायबलमधून विशिष्ट वचने शोधण्यास मदत करू शकतो.
२. अभ्यासादरम्यान कोणती वचने वाचायची व त्यावर चर्चा करायची हे आपण कसे ठरवतो?
२ वाचण्याकरता वचने निवडा: बायबल अभ्यासाची तयारी करताना, पाठातील प्रत्येक वचन, तुम्ही ज्या भागाचा अभ्यास करणार आहात त्याजशी कसे संबंधित आहे व अभ्यासादरम्यान तुम्ही कोणत्या वचनावर चर्चा करणार आहात हे ठरवा. आपल्या विश्वासाला आधार देणारी वचने वाचणे सहसा चांगले आहे. अतिरिक्त माहिती देणारी वचने अभ्यासादरम्यान वाचली नाहीत तरी चालेल. प्रत्येक विद्यार्थ्याची गरज व परिस्थिती लक्षात घ्या.
३. अभ्यास करताना प्रश्नांचा उपयोग केल्याने काय फायदा होतो आणि असे आपण कसे करू शकतो?
३ प्रश्नांचा उपयोग करा: वचन वाचून झाल्यावर, तुम्ही ते समजावून सांगण्याऐवजी, विद्यार्थ्याला तसे करायला सांगा. प्रश्नांचा चांगला उपयोग करून तुम्ही त्याला असे करण्यास प्रवृत्त करू शकता. एखादे शास्त्रवचन समजायला अगदीच सोपे असेल तर, तुम्ही अभ्यास करत असलेल्या भागाशी त्याचा कसा संबंध आहे ते विचारा. इतर प्रसंगी तुम्हाला विद्यार्थ्याला अधिक स्पष्ट किंवा सलग दोन तीन प्रश्न विचारावे लागतील जेणेकरून विद्यार्थी योग्य निष्कर्षावर येऊ शकेल.
४. अभ्यासादरम्यान आपण वाचलेल्या वचनाची किती फोड करून सांगणे आवश्यक आहे?
४ अभ्यासाची पद्धत साधी ठेवा: बाण मारण्यात निष्णात असलेला तिरंदाज, फक्त एकाच बाणात निशाणा टिपतो. तसेच, शिकवण्यात निपुण असलेला शिक्षक, त्याचे विचार मांडताना शब्दांबरोबर खेळत नाही. अभ्यासादरम्यान वाचलेल्या वचनाचा शब्द न् शब्द समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नका. ज्या विषयावर चर्चा चालली आहे केवळ तोच मुद्दा समजावून सांगा. कधीकधी, एखादे वचन नीट समजून घेऊन ते अचूकपणे समजावून सांगण्याकरता तुम्हाला, आपल्या प्रकाशनांमध्ये संशोधन करावे लागेल.—२ तीम. २:१५.
५, ६. आपल्या बायबल विद्यार्थ्यांना देवाच्या वचनातून ते शिकत असलेल्या गोष्टींचा जीवनात अवलंब करण्यास आपण कशी मदत करू शकतो पण असे करताना आपण काय करू नये?
५ व्यवहारात कसे लागू करायचे ते सांगा: उचित असते तेव्हा विद्यार्थ्याला, बायबलमधील वचने त्याला कशी लागू होतात ते पाहण्यास मदत करा. जसे की, इब्री लोकांस १०:२४, २५ वाचून दाखवल्यावर तुम्ही एखाद्या सभेबद्दल सांगू शकता आणि त्या सभेला उपस्थित राहण्यास त्याला आमंत्रण देऊ शकता. पण त्याच्यावर दबाव आणू नका. देवाचे वचन वाचून तो स्वतः, यहोवाला संतुष्ट करणारे पाऊल उचलण्यास प्रवृत्त होणे आवश्यक आहे.—इब्री ४:१२.
६ शिष्य बनवण्याची आज्ञा पूर्ण करत असताना, शास्त्रवचनांचा परिणामकारी वापर करण्याद्वारे आपण “विश्वासापासून आज्ञाधारकपणा निर्माण” करू या.—रोम. १६:२६, ईझी टू रीड.