वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९९ पृ. २
  • ऑक्टोबरसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑक्टोबरसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • उपशिर्षक
  • ऑक्टोबर ४ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर ११ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर १८ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर २५ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९९
km १०/९९ पृ. २

ऑक्टोबरसाठी सेवा सभा

ऑक्टोबर ४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १६४ (१९)

१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.

१७ मि: “मुले—‘परमेश्‍वराने दिलेले धन.’” हा भाग एखाद्या वडिलाने, शक्यतो कुटुंबप्रमुख असलेल्या वडिलाने हाताळावा. झपाट्याने बदलणाऱ्‍या या जगात आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी नियमित कौटुंबिक अभ्यास करणे महत्त्वाचे आहे यावर जोर द्या. ज्यांनी अद्याप आपल्या घरात कौटुंबिक अभ्यास सुरू केलेला नाही अशी किती टक्के कुटुंबे मंडळीत आहेत ते सांगा. तसेच, नियमिपणे अभ्यास करण्यासाठी वेळ काढणे ही मुळात पालकांची जबाबदारी आहे यावर भर द्या.

१८ मि: मासिके देण्यास नेहमी तयार असा! गेल्या महिन्यात मंडळीने एकूण किती मासिके क्षेत्रात दिली ते मंडळीला सांगा. याची तुलना, मंडळीला संस्थेकडून मिळणाऱ्‍या एकूण मासिकांशी केल्यास काय दिसून येते? यात बराच फरक आहे का? असल्यास काय करता येण्यासारखे आहे? पुढील मुद्द्‌यांवर श्रोत्यांचे विचार जाणून घ्या: (१) प्रत्येक प्रचारकाने आपल्याला पुरेशी असतील इतकी पण त्याचवेळी उचित प्रमाणात मासिके ऑर्डर करावीत. (२) प्रत्येक शनिवार हा नियतकालिक दिवस समजला जावा. (३) दर महिन्यात नियतकालिक कार्य करण्यासाठी आपल्या वेळापत्रकात वेळ द्या. (४) संभाषण सुरू करण्यासाठी मासिकांचा उपयोग करून आपले अनौपचारिक कार्य वाढवण्याची योजना करा. (५) व्यापारी क्षेत्रातील लोकांना तसेच पेशेवाईकांना वाचायला आवडतील असे खास विषयांवरील अंक त्यांना जाऊन द्या. (६) तुम्ही किती मासिके दिलीत त्याची अचूक नोंद ठेवा आणि एखादा नियतकालिक मार्ग सुरू करून नवीन अंक देण्यासाठी नियमितपणे जा. (७) जुन्या मासिकांचाही चांगला उपयोग करा, म्हणजे मासिके पडून राहणार नाहीत. श्रोत्यांना नवीन मासिके दाखवा आणि लोकांची आस्था वाढवतील असे काही लेख त्यातून दाखवा. मासिक देण्याबाबत, एखाद्या प्रौढ प्रचारकाचे आणि युवकाचे एक छोटेसे प्रात्यक्षिक दाखवा.—आमची राज्य सेवा, जानेवारी १९९६ अंकातील पुरवणी पाहा.

गीत १०५ (१७) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर ११ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १९४ (२०)

१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

१५ मि: स्थानिक गरजा.

२० मि: “सभांपासून अधिकाधिक आनंद घेण्यासाठी.” प्रश्‍नोत्तरे. सभांमध्ये आपण एकमेकांविषयी कळकळ कशी दाखवू शकतो आणि एकमेकांना उत्तेजन कसे देऊ शकतो हे काही खास उदाहरणे देऊन सांगा. याबाबत, श्रोत्यांना आपले अनुभव कथन करण्यास सांगा.

गीत १५२ (६) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर १८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १९६ (९)

१५ मि: स्थानिक घोषणा आणि क्षेत्र सेवेतील अनुभव. त्यानंतर, “नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रम” हा लेख विचारात घ्या.

१५ मि: “तुम्ही दुसरीकडे राहायला जाणार आहात का?” मंडळीच्या सचिवाचे उत्तेजनपर भाषण. दुसरीकडे कुठे राहायला गेल्यानंतर आपला आध्यात्मिक नित्यक्रम बिघडवू नये म्हणून नवीन परिसरात, नवीन मंडळीत रुळून जाणे फार जरूरीचे आहे. राहण्याचे ठिकाण बदलण्याच्या तुमच्या योजनेबद्दल वडिलांना कळवणे तसेच नवीन मंडळीशी संपर्क साधण्याकरता त्यांच्याकडे मदतीची विनंती करणे जरूरीचे आहे यावर जोर द्या.

१५ मि: “अपेक्षा माहितीपत्रकातून अभ्यास कसा सुरू करावा.” प्रश्‍नोत्तरांनी या लेखाची चर्चा करा.

गीत १४२ (१७) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर २५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १७९ (२)

१५ मि: स्थानिक घोषणा. नोव्हेंबर महिन्यात सर्वांना क्षेत्रांत अपेक्षा माहितीपत्रक किंवा ज्ञान पुस्तक देता यावे म्हणून पूर्वतयारी करण्यास सर्वांना मदत करा. “देव आपल्या प्रार्थना ऐकतो का?” असा एक प्रश्‍न उपस्थित करून संभाषण कसे सुरू करता येईल याचे स्पष्टीकरण द्या. यासाठी अपेक्षा माहितीपत्रकातील पाठ ७ आणि ज्ञान पुस्तकातील १६ वा अध्याय, परिच्छेद १२-१४ यातील मुद्द्‌यांचा उपयोग करा. आणि मग, कोणत्याही एका शास्त्रवचनाचा उपयोग करून घरमालकाशी कसे बोलता येईल, याचे एक छोटेसे प्रात्यक्षिक दाखवा.

१५ मि: बायबलच्या प्रश्‍नांची उत्तरे कशी शोधावीत? मंडळीतल्या एका प्रचारकाला क्षेत्रात एका आस्थेवाईक व्यक्‍तीने बायबलवर आधारित प्रश्‍न विचारलेला आहे; या प्रश्‍नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा प्रचारक, सेवा सेवकाकडे येतो. प्रचारकाला त्याच्या प्रश्‍नाचे थेट उत्तर देण्याऐवजी सेवा सेवक त्याला त्याचे उत्तर शोधून काढण्यात मदत करतो. प्रथम, तो प्रशाला मार्गदर्शक पुस्तक (इंग्रजी), अध्याय ७, परिच्छेद ८-९ यात दिलेल्या सल्ल्यांची उजळणी प्रचारकासोबत करतो. मग, क्षेत्रात लोक सहसा विचारतात अशा एका प्रश्‍नावर ते दोघे मिळून संशोधन करतात. खास त्या विषयाशी संबंधित असलेले संदर्भ ते पडताळून पाहतात आणि सदर प्रश्‍नावर बायबलचे म्हणणे पटवून देणारे मुद्दे ते शोधून काढतात. उपस्थित असलेल्या सर्वांना अशाच प्रकारे बायबलच्या प्रश्‍नांची उत्तरे शोधून काढण्यासाठी संशोधन करण्याचे प्रोत्साहन द्या.

१५ मि: कोणती ध्येये समोर ठेवावीत? भाषण आणि श्रोत्यांसोबत चर्चा. मार्च १५, १९९७ टेहळणी बुरूज, पृष्ठ ११ वर दिलेल्या चौकटीतील व्यावहारिक ध्येयांची उजळणी करा. या ध्येयांशिवाय, सहायक किंवा नियमित पायनियर सेवा करण्याचेही प्रोत्साहन श्रोत्यांना द्या. ही ध्येये साध्य केल्याने व्यक्‍तिगतपणे आपल्याला काय लाभ होऊ शकतो ते सांगा. आपण समोर ठेवलेले एखादे ईश्‍वरशासित ध्येय पूर्ण केल्यामुळे आपल्याला कोणकोणते लाभ झाले याविषयी श्रोत्यांना आपले काही अनुभव सांगण्याची विनंती करा.

गीत १५१ (१८) आणि समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा