सन २००० साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा पर्यायी आराखडा
सूचना
सन २००० मध्ये ईश्वरशासित सेवा प्रशाला पुढील व्यवस्थांनुरूप चालवली जाईल.
क्रमिक पुस्तके: बायबल, टेहळणी बुरूज [w-MR], सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान [kl-MR], आणि “चर्चेसाठी पवित्रशास्त्र विषय” [td-MR], ह्यांवर आधारित नेमणुका दिल्या जातील.
प्रशालेचा कार्यक्रम गायन, प्रार्थना व स्वागतपर अभिवादनाने वेळेवर सुरू केला जावा. मराठी भाषेत सभा चालवल्या जाणाऱ्या मंडळ्यांना, त्या भाषेतील गायनपुस्तकाचा/माहितीपत्रकाचा उपयोग करण्याची शिफारस केली जाते. गीत क्रमांक मराठीतील गीत माहितीपत्रकातून घेतलेले आहेत. कार्यक्रमात कोणते भाग हाताळले जाणार आहेत याचा सारांश देण्याची गरज नाही. एखादा भाग कोणत्या विषयावर असेल त्याबद्दल प्रशाला पर्यवेक्षक प्रत्येक भागाच्या सुरवातीला सांगतील. नंतर तो पुढील प्रकारे चालवला जावा:
नेमणूक क्र. १: १५ मिनिटे. वडील किंवा सेवा सेवकांकरवी ही हाताळली जावी आणि ती टेहळणी बुरूज, किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान यावर आधारलेली असेल. ही नेमणूक टेहळणी बुरूज यावर आधारित असल्यास तोंडी उजळणी न घेता १५ मिनिटांच्या बोधप्रद भाषणाच्या रूपात सादर करावी; ज्ञान पुस्तकावर आधारित असल्यास १० ते १२ मिनिटांकरता बोधप्रद भाषण देऊन नंतर ३ ते ५ मिनिटे पुस्तकातील छापील प्रश्नांचा वापर करून तोंडी उजळणी घ्यावी. केवळ साहित्य उरकणे हा या मागील हेतू नसावा तर चर्चिल्या जात असलेल्या माहितीच्या व्यावहारिक मूल्यावर लक्ष केंद्रित करून मंडळीस अत्यंत सहायक ठरणारे मुद्दे ठळकपणे मांडणे हा असावा. आराखड्यात दिलेले शीर्षक उपयोगात आणावे.
या भाषणाची नेमणूक मिळालेल्या बांधवांनी आपले भाषण मर्यादित वेळेमध्ये संपवण्याची दक्षता घ्यावी. आवश्यक असल्यास किंवा वक्त्याने विनंती केल्यास खासगी सूचना दिल्या जाऊ शकतील.
बायबल वाचनातील ठळक मुद्दे: ६ मिनिटे. हा भाग वडिलांनी किंवा सेवा सेवकाने हाताळावा, ते स्थानिक गरजांप्रमाणे साहित्याचा प्रभावीपणे अवलंब करतील. यासाठी ठराविक विषयाची गरज नाही. हा भाग म्हणजे, नेमून दिलेल्या वाचनाचा केवळ एक सारांश नसावा. नेमून दिलेल्या अध्यायांचे ३० ते ६० सेकंदांपर्यंत संपूर्ण पुनरावलोकन यात समाविष्ट करता येईल. तथापि, या भागाचा प्रमुख हेतू, ही माहिती आपल्याकरता का व कशाप्रकारे महत्त्वाची आहे, हे जाणण्यास श्रोत्यांना साहाय्य करणे हा आहे. यानंतर प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात पाठवतील.
नेमणूक क्रमांक २: ५ मिनिटे. या नेमणुकीत एखाद्या बांधवाला बायबलच्या भागाचे वाचन नेमून दिले जाते. हे प्रशालेच्या मुख्य वर्गास तसेच उपवर्गांस लागू होईल. वाचनाच्या नेमणुका बहुधा, विद्यार्थ्याला सुरवातीच्या व समारोपाच्या विवेचनांमध्ये संक्षिप्त स्पष्टीकरणात्मक माहिती सादर करण्याएवढ्या पुरेशा असतात. यात ऐतिहासिक पार्श्वभूमी, भविष्यवादित किंवा सिद्धान्तीय अर्थसूचकता आणि तत्त्वांचा अवलंब यांचा समावेश करता येईल. नेमून दिलेली सर्व वचने मध्यंतरी न थांबता वाचली जावीत. अर्थात, वाचावयाची वचने क्रमाने नसतील तेथे वाचन पुन्हा कोठून सुरू होते ते, वचन विद्यार्थी सांगू शकतो.
नेमणूक क्रमांक ३: ५ मिनिटे. ही नेमणूक भगिनीला नेमून देण्यात येईल. या प्रस्तुतीचा विषय “चर्चेसाठी पवित्रशास्त्र विषय” यांतून घेतला जाईल. दृश्य रचना अनौपचारिक साक्ष, पुनर्भेट, गृह बायबल अभ्यास यांवर आधारित असू शकते, व यामध्ये भाग घेणारे बसू शकतात किंवा उभे राहू शकतात. विद्यार्थीनी, नेमलेला विषय कशाप्रकारे घरमालकाला समजावते तसेच कशाप्रकारे शास्त्रवचनांतून तर्क करते यावर प्रशाला पर्यवेक्षक अधिक लक्ष देतील. नेमणूक मिळालेल्या विद्यार्थीनीला वाचता आले पाहिजे. प्रशाला पर्यवेक्षक एक मदतनीस नेमून देतील, पण आणखी एक मदतनीस देखील घेता येऊ शकतो. दृश्य रचनेला नव्हे तर बायबलचा प्रभावीपणे उपयोग कसा करण्यात आला याला प्राधान्य दिले जावे.
नेमणूक क्रमांक ४: ५ मिनिटे. एखाद्या बायबल पात्रावर किंवा “चर्चेसाठी पवित्रशास्त्र विषय” यांवर या नेमणूकीचा भाग आधारित असेल. हा भाग टेहळणी बुरूज यावर आधारित असल्यास, विषय आणि लेखामधील वचनांचा उपयोग करून विद्यार्थ्याने अशाप्रकारे तयारी करावी ज्याद्वारे त्या बायबल पात्राची संपूर्ण ओळख मिळेल, शिवाय त्याचे किंवा तिचे उदाहरण, व्यक्तिमत्व, सवयी आणि मनोवृत्ती यांबद्दलही माहिती मिळेल. विश्वासूपणा, धैर्य, नम्रता आणि निःस्वार्थीपणा हे गुण अनुसरण्याजोगे आहेत; परंतु अविश्वासूपणा त्याजबरोबर नकोशा सवयी ख्रिश्चनांना अयोग्य मार्गापासून सावध करण्यासाठी नमूद करण्यात आल्या आहेत. हा भाग “चर्चेसाठी पवित्रशास्त्र विषय” यांवर आधारित असल्यास नेमून दिलेल्या विषयाचा उपयोग करावा व विद्यार्थ्याने शास्त्रवचनाचा व्यवहारिक उपयोग दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेमणूक क्र. ४ एखाद्या बांधवाला किंवा भगिनीला दिली जाऊ शकते. हा भाग बांधवाला नेमून दिल्यास त्यांनी तो जाहीर भाषणाच्या पद्धतीने सादर करावा. भगिनीला नेमून दिल्यास तिने ते, नेमणूक क्रमांक ३ च्या पद्धतीने सादर करावे. शिवाय जर नेमणूक क्रमांक ४ # या चिन्हाने सुरू होत असेल तर ती नेमणूक बांधवाला नेमून द्यावी.
*पूरक बायबल-वाचन आराखडा: प्रत्येक आठवड्याच्या गीत क्रमांकानंतर कंसात हा आराखडा पुरवलेला आहे. आठवड्याला सुमारे दहा पानांचे वाचन करण्याचा हा आराखडा पाळल्याने, तीन वर्षांत संपूर्ण बायबल वाचले जाऊ शकते. प्रशाला कार्यक्रमात किंवा लेखी उजळणीत कोणताही भाग पूरक वाचन आराखड्यावर आधारलेला नाही.
सूचना: सल्ला, वेळ, लेखी उजळणी आणि नेमणुकांची तयारी, यांविषयी अतिरिक्त माहिती व सूचनेसाठी कृपया ऑक्टोबर १९९६ ची आमची राज्य सेवा पृष्ठ ३ पाहा.
आराखडा
जाने. ३ बायबल वाचन: अनुवाद ४-६
गीत क्र. २२ [*यिर्मया ४९-५२]
क्र. १: यहोवाच्या आशीर्वादांची खरी कदर बाळगा (w९८ १/१ पृ. २२-४)
क्र. २: अनुवाद ६:४-१९
क्र. ३: td १ए देव पूर्वजांच्या भक्तीस मनाई का करतो
क्र. ४: मोशे आणि अहरोन—विषय: #सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे (w९६ १/१५ पृ. २४-५)
जाने. १० बायबल वाचन: अनुवाद ७-१०
गीत क्र. ६ [*विलापगीत १-५]
क्र. १: खऱ्या देवाला उंचवा (w९८ १/१ पृ. ३०-१)
क्र. २: अनुवाद ८:१-१८
क्र. ३: td १बी मानवास आदर दिला जाऊ शकतो परंतु भक्ती मात्र देवाची
क्र. ४: सत्य तुमच्या मुलांमध्ये बिंबवा (w९६ ५/१५ पृ. ८-९)
जाने. १७ बायबल वाचन: अनुवाद ११-१४
गीत क्र. २१ [*यहेज्केल १-९]
क्र. १: आपल्या प्रियजनांकरता आगाऊ योजना का करावी (w९८ १/१५ पृ. १९-२२)
क्र. २: अनुवाद ११:१-१२
क्र. ३: td २ए आर्मगिदोन—दुष्टाईचा अंत करणारे युद्ध
क्र. ४: योना—विषय: #यहोवाची दया अगाध आहे (w९६ ५/१५ पृ. २४-८)
जाने. २४ बायबल वाचन: अनुवाद १५-१९
गीत क्र. १८ [*यहेज्केल १०-१६]
क्र. १: बदल आणि समेट घडवून आणण्यात सत्याचे सामर्थ्य (w९८ १/१५ पृ. २९-३१)
क्र. २: अनुवाद १९:११-२१
क्र. ३: td २सी आर्मगिदोन देवाचे प्रेमळ कृत्य का आहे
क्र. ४: #विश्वासू सहकार्यामुळे उत्तम प्रतिफळे मिळतात (w९६ ६/१५ पृ. २८-३०)
जाने. ३१ बायबल वाचन: अनुवाद २०-२३
गीत क्र. १ [*यहेज्केल १७-२१]
क्र. १: प्रशंसा आणि तोंडपूजावरील शास्त्रवचनीय दृष्टिकोन (w९८ २/१ पृ. २९-३१)
क्र. २: अनुवाद २०:१०-२०
क्र. ३: td ३ए बाप्तिस्मा—ख्रिस्ती गरज
क्र. ४: एपफ्रदीत—विषय: #धाडसी असा व देवाच्या सेवकांप्रती प्रेम दाखवा (w९६ ८/१५ पृ. २७-३०)
फेब्रु. ७ बायबल वाचन: अनुवाद २४-२७
गीत क्र. २९ [*यहेज्केल २२-२७]
क्र. १: आशावादी असण्याचा आधार (w९८ २/१ पृ. ४-६)
क्र. २: अनुवाद २५:५-१६
क्र. ३: td ३बी बाप्तिस्मा पातके पुसून टाकीत नाही
क्र. ४: पेत्र—विषय: #धैर्याने साक्ष देण्याचे परिणाम (w९६ ९/१५ पृ. ८-९)
फेब्रु. १४ बायबल वाचन: अनुवाद २८-३०
गीत क्र. ५ [*यहेज्केल २८-३३]
क्र. १: कृतज्ञतेचा आत्मा विकसित करा (w९८ २/१५ पृ. ४-७)
क्र. २: अनुवाद २८:१-१४
क्र. ३: td ४ए देवाचे वचन प्रेरित आहे
क्र. ४: लुदिया—विषय: आदरातिथ्यामुळे आशीर्वाद लाभतात (w९६ ९/१५ पृ. २६-८)
फेब्रु. २१ बायबल वाचन: अनुवाद ३१-३४
गीत क्र. २१ [*यहेज्केल ३४-३९]
क्र. १: हा शेवटला काळ आहे! (kl अध्या. ११)
क्र. २: अनुवाद ३२:३५-४३
क्र. ३: td ४सी बायबल—आमच्या दिवसासाठी व्यवहारिक मार्गदर्शक
क्र. ४: अपुल्लोस—विषय: #आध्यात्मिक व्यक्ती असा (w९६ १०/१ पृ. २०-३)
फेब्रु. २८ बायबल वाचन: यहोशवा १-५
गीत क्र. ४ [*यहेज्केल ४०-४५]
क्र. १: दुरात्म्यांच्या समूहाचा प्रतिकार करा (kl अध्या. १२)
क्र. २: यहोशवा २:८-१६
क्र. ३: td ४एफ बायबल—सर्व लोकांसाठी असलेले पुस्तक
क्र. ४: दानीएल—विषय: #देवाची नित्य सेवा करा (w९६ ११/१५ पृ. ८-९)
मार्च ६ बायबल वाचन: यहोशवा ६-९
गीत क्र. १९ [*यहेज्केल ४६–दानीएल २]
क्र. १: पालकहो—आपल्या मुलांना सांभाळा! (w९८ २/१५ पृ. ८-११)
क्र. २: यहोशवा ७:१, १०-१९
क्र. ३: td ५ए रक्त संक्रमण रक्ताच्या पावित्र्याचा अनादर करते
क्र. ४: अक्विला आणि प्रिसिल्ला—विषय: #आवेशाने प्रचार करा आणि आदरातिथ्य करणारे असा (w९६ १२/१५ पृ. २२-४)
मार्च १३ बायबल वाचन: यहोशवा १०-१३
गीत क्र. २१ [*दानीएल ३-७]
क्र. १: विभूतिमत्वाविषयी बायबल काय म्हणते (w९८ २/१५ पृ. २३-७)
क्र. २: यहोशवा ११:६-१५
क्र. ३: td ५बी काही झाले तरी जीवन वाचवावे का?
क्र. ४: अलियेजर—विषय: #यहोवावर भरवसा ठेवून प्रयत्न करा (w९७ १/१ पृ. ३०-१)
मार्च २० बायबल वाचन: यहोशवा १४-१७
गीत क्र. १६ [*दानीएल ८–होशेय २]
क्र. १: ‘आपल्यासारख्या भावना असलेले’ विश्वासू पुरुष (w९८ ३/१ पृ. २६-९)
क्र. २: यहोशवा १५:१-१२
क्र. ३: td ६ए विदेश्यांच्या काळाची समाप्ती कधी झाली?
क्र. ४: हनोख—विषय: #देवाची भीती बाळगा आणि निर्दोष राहा (w९७ १/१५ पृ. २९-३१)
मार्च २७ बायबल वाचन: यहोशवा १८-२०
गीत क्र. १७ [*होशेय ३-१४]
क्र. १: पृथ्वीवर येशूच्या शेवटल्या दिवसांच्या आठवणींना उजाळा (w९८ ३/१५ पृ. ३-९)
क्र. २: यहोशवा १८:१-१०
क्र. ३: td ७ए ख्रिस्ती चर्च काय आहे?
क्र. ४: एहूद—विषय: #धैर्यवान आणि बळकट असा (w९७ ३/१५ पृ. २९-३१)
एप्रि. ३ बायबल वाचन: यहोशवा २१-२४
क्र. १: ईश्वरी जीवन जगणे का आनंद देते (kl अध्या. १३)
क्र. २: यहोशवा २१:४३–२२:८
क्र. ३: td ७डी पेत्र “खडक” आहे का?
क्र. ४: अम्राम आणि योखबेद—विषय: मुलांना प्रशिक्षण दिल्याची प्रतिफळे (w९७ ५/१ पृ. ३०-१)
एप्रि. १० बायबल वाचन: शास्ते १-४
क्र. १: तुम्ही कोणाच्या अधिकाराला ओळखले पाहिजे? (kl अध्या. १४)
क्र. २: शास्ते ३:१-११
क्र. ३: td ९ए बायबलच्या उत्पत्ती कार्यासोबत शाबीत विज्ञानाचे सहमत
क्र. ४: एपफ्रास—विषय: #आपल्या बांधवांसाठी प्रार्थना करा व त्यांची सेवा करा. (w९७ ५/१५ पृ. ३०-१)
एप्रि. १७ बायबल वाचन: शास्ते ५-७
गीत क्र. १८ [*मीखा ६–सफन्या १]
क्र. १: येशूने ७० शिष्यांना दिलेल्या सूचनांपासून शिका (w९८ ३/१ पृ. ३०-१)
क्र. २: शास्ते ५:२४-३१
क्र. ३: td ९बी उत्पत्तीचे दिवस २४ तासाचे होते का?
क्र. ४: अबीगईल—विषय: यहोवाचा सन्मान होईल असे गुण प्रदर्शित करा (w९७ ७/१ पृ. १४-५)
एप्रि. २४ लेखी उजळणी. संपूर्ण अनुवाद ४–शास्ते ७
गीत क्र. २१ [*सफन्या २–जखऱ्या ७]
मे १ बायबल वाचन: शास्ते ८-१०
गीत क्र. १६ [*जखऱ्या ८–मलाखी ४]
क्र. १: इतरांच्या व्यक्तिगत प्रतिष्ठेचा आदर करा (w९८ ४/१ पृ. २८-३१)
क्र. २: शास्ते ९:७-२१
क्र. ३: td १०ए येशूचा मृत्यू क्रूसावर झाला का?
क्र. ४: तर्तिय—विषय: #पुढाकार घेणाऱ्यांप्रती निष्ठावान राहा (w९७ ७/१५ पृ. २९-३१)
मे ८ बायबल वाचन: शास्ते ११-१४
गीत क्र. १० [*मत्तय १-८]
क्र. १: बर्णबा, ‘सांत्वनाचा पुत्र’ (w९८ ४/१५ पृ. २०-३)
क्र. २: शास्ते १३:२-१०, २४
क्र. ३: td १०बी ख्रिश्चनांनी क्रूसाची भक्ती करावी का?
क्र. ४: कौटुंबिक सदस्यांच्या बाबतीत हार मानू नका (w९७ ९/१ पृ. ३०-१)
मे १५ बायबल वाचन: शास्ते १५-१८
गीत क्र. ३ [*मत्तय ९-१४]
क्र. १: सैन्यांच्या गरजेविना जगव्याप्त सुरक्षा (w९८ ४/१५ पृ. २८-३०)
क्र. २: शास्ते १७:१-१३
क्र. ३: td ११ए मृत्यूचे कारण काय आहे?
क्र. ४: अरिस्तार्ख—विषय: #देवाच्या संघटनेशी निष्ठावान राहा (w९७ ९/१५ पृ. २९-३१)
मे २२ बायबल वाचन: शास्ते १९-२१
गीत क्र. २१ [*मत्तय १५-२१]
क्र. १: देवाला सन्मान देणारे कुटुंब उभारणे (kl अध्या. १५)
क्र. २: शास्ते १९:११-२१
क्र. ३: td ११बी मृत लोक तुम्हाला इजा पोहंचू शकतात का?
क्र. ४: अलीशा—विषय: #देवाच्या सेवेत स्वतःला वाहून घ्या (w९७ ११/१ पृ. ३०-१)
मे २९ बायबल वाचन: रूथ १-४
गीत क्र. २५ [*मत्तय २२-२६]
क्र. १: तुम्हाला देवाजवळ कसे येता येईल (kl अध्या. १६)
क्र. २: रूथ ३:१-१३
क्र. ३: td ११सी मानव आपल्या मृत नातेवाईकांसोबत बोलू शकतात का?
क्र. ४: अनेसिफर—विषय: #छळात असलेल्यांना सांत्वन देत राहा (w९७ ११/१५ पृ. २९-३१)
जून ५ बायबल वाचन: १ शमुवेल १-३
गीत क्र. २१ [*मत्तय २७–मार्क ४]
क्र. १: देवाच्या लोकांमध्ये सुरक्षितता मिळवा (kl अध्या. १७)
क्र. २: १ शमुवेल १:९-२०
क्र. ३: td १४ए दियाबल खरीखुरी व्यक्ती आहे का?
क्र. ४: मरीया—विषय: “चांगला वाटा” निवडा (w९९ ९/१ पृ. ३०-१)
जून १२ बायबल वाचन: १ शमुवेल ४-७
गीत क्र. ११ [*मार्क ५-९]
क्र. १: यहोवा कोण आहे? (w९८ ५/१ पृ. ५-७)
क्र. २: १ शमुवेल ४:९-१८
क्र. ३: td १४बी सैतान—जगाचा अदृश्य अधिपती
क्र. ४: #जगीक बुद्धीचा तुमच्यावर प्रभाव होऊ देऊ नका (w९६ ७/१५ पृ. २६-९)
जून १९ बायबल वाचन: १ शमुवेल ८-११
गीत क्र. ६ [*मार्क १०-१४]
क्र. १: सचोटीचे प्रतिफळ मिळते (w९८ ५/१ पृ. ३०-१)
क्र. २: १ शमुवेल ८:४-२०
क्र. ३: td १४डी देवाच्या नजरेतून उतरलेल्या देवदूतांबद्दल बायबल काय म्हणते?
क्र. ४: बेलशस्सर—विषय: #यहोवाचा अपमान करण्यापासून सावध असा (w९८ ९/१५ पृ. ८-९)
जून २६ बायबल वाचन: १ शमुवेल १२-१४
क्र. १: धनदौलतीने तुम्हाला सौख्य मिळेल का? (w९८ ५/१५ पृ. ४-६)
क्र. २: १ शमुवेल १४:१-१४
क्र. ३: td १७ए पृथ्वी—परादीस होण्यासाठी निर्मिली होती
क्र. ४: फिलेमोन आणि अनेसिम—विषय: #आपण ख्रिस्ती बंधुत्वात एकत्रित आहोत (w९८ १/१५ पृ. २९-३१)
जुलै ३ बायबल वाचन: १ शमुवेल १५-१७
गीत क्र. १६ [*लूक ४-८]
क्र. १: युनीके व लोईस—अनुकरणीय शिक्षक (w९८ ५/१५ पृ. ७-९)
क्र. २: १ शमुवेल १६:४-१३
क्र. ३: td १७सी पृथ्वीवरील जीवनाचा कधीही अंत होणार नाही
क्र. ४: #ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल (w९७ ३/१ पृ. ३०-१)
जुलै १० बायबल वाचन: १ शमुवेल १८-२०
गीत क्र. २८ [*लूक ९-१२]
क्र. १: मन वळवण्याच्या कलेद्वारे हृदयाचा ठाव घ्या (w९८ ५/१५ पृ. २१-३)
क्र. २: १ शमुवेल १९:१-१३
क्र. ३: td १९ए तुम्ही खोटे संदेष्टे ओळखू शकाल का?
क्र. ४: तुखिक—विषय: #विश्वासू आणि भरवसालायक ख्रिस्ती असा (w९८ ७/१५ पृ. ७-८)
जुलै १७ बायबल वाचन: १ शमुवेल २१-२४
गीत क्र. ४ [*लूक १३-१९]
क्र. १: कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी उचलणे (w९८ ६/१ पृ. २०-३)
क्र. २: १ शमुवेल २४:२-१५
क्र. ३: td २२ए आध्यात्मिकरित्या बरे करणे किती महत्त्वाचे आहे?
क्र. ४: आपल्या मुलांसाठी वेळ काढा (w९८ ११/१ पृ. ३०-१)
जुलै २४ बायबल वाचन: १ शमुवेल २५-२७
गीत क्र. १७ [*लूक २०-२४]
क्र. १: खरा न्याय—केव्हा आणि कसा? (w९८ ६/१५ पृ. २६-९)
क्र. २: १ शमुवेल २५:२३-३३
क्र. ३: td २२बी देवाचे राज्य—चिरकालिक शारीरिक आरोग्य प्रदान करण्याचे माध्यम
क्र. ४: #उच्च अधिकाऱ्यांचा आदर केला पाहिजे (w९८ ११/१५ पृ. ८-९)
जुलै ३१ बायबल वाचन: १ शमुवेल २८-३१
गीत क्र. २१ [*योहान १-६]
क्र. १: देवाची सेवा सदासर्वकाळ करणे हे तुमचे ध्येय बनवा (kl अध्या. १८)
क्र. २: १ शमुवेल ३१:१-१३
क्र. ३: td २२सी आधुनिक दिवसांत विश्वासाने बरे करणे देवाकडून नाही
क्र. ४: तीत—विषय:# “अशांचा मान राखा” (w९८ ११/१५ पृ. २९-३१)
ऑग. ७ बायबल वाचन: २ शमुवेल १-४
गीत क्र. १६ [*योहान ७-११]
क्र. १: जेव्हा देवाच्या ज्ञानाने पृथ्वी पूर्ण भरते (kl अध्या. १९)
क्र. २: २ शमुवेल २:१-११
क्र. ३: td २२डी अन्य भाषेत बोलणे देवाच्या स्वीकृतीचा निश्चित पुरावा आहे का?
क्र. ४: योसेफ—विषय: एकमेकांना पूर्ण मनाने क्षमा करा (w९९ १/१ पृ. ३०-१)
ऑग. १४ बायबल वाचन: २ शमुवेल ५-८
गीत क्र. २२ [*योहान १२-१८]
क्र. १: “नेटाने यत्न करा” (w९८ ६/१५ पृ. ३०-१)
क्र. २: २ शमुवेल ७:४-१६
क्र. ३: td २३बी स्वर्गात कोण जातात?
क्र. ४: सीला—विषय: #उत्तेजनाचा स्रोत (w९९ २/१५ पृ. २६-२९)
ऑग. २१ बायबल वाचन: २ शमुवेल ९-१२
गीत क्र. ४ [*योहान १९–प्रेषितांची कृत्ये ४]
क्र. १: स्वतःला एक चांगला शेजारी शाबीत करा (w९८ ७/१ पृ. ३०-१)
क्र. २: २ शमुवेल ११:२-१५
क्र. ३: td २४बी नरक अग्नियातनांचे स्थळ नाही
क्र. ४: #नम्र बना—मोठेपणाची आस धरू नका (w९९ ३/१ पृ. ३०-१)
ऑग. २८ लेखी उजळणी. संपूर्ण शास्ते ८–२ शमुवेल १२
गीत क्र. ९ [*प्रेषितांची कृत्ये ५-१०]
सप्टें. ४ बायबल वाचन: २ शमुवेल १३-१५
गीत क्र. २७ [*प्रेषितांची कृत्ये ११-१६]
क्र. १: तुमच्या मुलांना जीवनाची उत्तम सुरवात करून द्या (w९८ ७/१५ पृ. ४-६)
क्र. २: २ शमुवेल १३:२०-३३
क्र. ३: td २४सी अग्नी सर्वनाशाचे द्योतक आहे
क्र. ४: आपला भार यहोवावर टाका (w९९ ५/१ पृ. ३०-१)
सप्टें. ११ बायबल वाचन: २ शमुवेल १६-१८
गीत क्र. १८ [*प्रेषितांची कृत्ये १७-२२]
क्र. १: अंत्यविधीच्या प्रथांविषयी ख्रिस्ती दृष्टिकोन (w९८ ७/१५ पृ. २०-४)
क्र. २: २ शमुवेल १६:५-१४
क्र. ३: td २४ई श्रीमंत मनुष्य व लाजारसचा अहवाल चिरकालिक यातनांचा पुरावा नाही
क्र. ४: #स्वतःला इतरांपासून वेगळे करू नका (w९९ ६/१ पृ. २८-३१)
सप्टें. १८ बायबल वाचन: २ शमुवेल १९-२१
गीत क्र. ४ [*प्रेषितांची कृत्ये २३–रोमकर १]
क्र. १: तुमचा विवेक विश्वसनीय आहे का? (w९८ ९/१ पृ. ४-७)
क्र. २: २ शमुवेल २०:१, २, १४-२२
क्र. ३: td २५ब सण पाळण्याबद्दलचा ख्रिश्चनांचा दृष्टिकोन
क्र. ४: पौल—विषय: सत्याचे शत्रू बदलू शकतात (w९९ ६/१५ पृ. २९-३१)
सप्टें. २५ बायबल वाचन: २ शमुवेल २२-२४
गीत क्र. १६ [*रोमकर २-९]
क्र. १: साथीदारांचा दबाव—कधी तुमच्या फायद्याचा ठरू शकतो का? (w९९ ८/१ २२-२५)
क्र. २: २ शमुवेल २३:८-१७
क्र. ३: td २६ए मूर्त्यांचा उपयोग केल्यामुळे देवाचा अनादर होतो
क्र. ४: #खऱ्या बुद्धीला शोधत राहा (w९९ ७/१ पृ. ३०-१)
ऑक्टो. २ बायबल वाचन: १ राजे १-२
गीत क्र. २३ [*रोमकर १०–१ करिंथकर ३]
क्र. १: रागाला अडखळण होऊ देऊ नका (w९९ ८/१५ ८, ९)
क्र. २: १ राजे २:१-११
क्र. ३: td २६बी मूर्तिपूजेचे परिणाम
क्र. ४: फिलिप्प—विषय: #“सर्व माणसांना” प्रचार करा (w९९ ७/१५ पृ. २४-५)
ऑक्टो. ९ बायबल वाचन: १ राजे ३-६
गीत क्र. ७ [*१ करिंथकर ४-१३]
क्र. १: प्रथम गोष्टींना प्रथम स्थान द्या (w९८ ९/१ पृ. १९-२१)
क्र. २: १ राजे ४:२१-३४
क्र. ३: td २६सी केवळ यहोवाचीच भक्ती केली पाहिजे
क्र. ४: td २७ए #मिश्र विश्वासांचा मार्ग देवाचा मार्ग नाही
ऑक्टो. १६ बायबल वाचन: १ राजे ७-८
गीत क्र. ९ [*१ करिंथकर १४–२ करिंथकर ७]
क्र. १: प्रतिष्ठितांपुढे निर्भीडपणे साक्ष देणे (w९८ ९/१ पृ. ३०-१)
क्र. २: १ राजे ७:१-१४
क्र. ३: td २७बी सर्वच धर्म चांगले आहेत का?
क्र. ४: td २९ए ख्रिश्चनांनी देवाच्या वैयक्तिक नावाचा उपयोग करावा
ऑक्टो. २३ बायबल वाचन: १ राजे ९-११
गीत क्र. ६ [*२ करिंथकर ८–गलतीकर ४]
क्र. १: वधूमूल्याविषयी ख्रिस्ती दृष्टिकोन (w९८ ९/१५ पृ. २४-७)
क्र. २: १ राजे ११:१-१३
क्र. ३: td २९सी देवाच्या अस्तित्वाविषयीचे सत्य
क्र. ४: td २९डी #देवाचे गुण ओळखणे
ऑक्टो. ३० बायबल वाचन: १ राजे १२-१४
गीत क्र. १२ [*गलतीकर ५–फिलिप्पैकर २]
क्र. १: देव तुम्हाला खरी व्यक्ती वाटते का? (w९८ ९/१५ पृ. २१-३)
क्र. २: १ राजे १३:१-१०
क्र. ३: td २९एफ सर्वजण एकाच देवाची सेवा करीत नाहीत
क्र. ४: td ३०ए यहोवाचे साक्षीदार एक नवा धर्म आहे का?
नोव्हें. ६ बायबल वाचन: १ राजे १५-१७
गीत क्र. ४ [*फिलिप्पैकर ३–१ थेस्सलनीकाकर ५]
क्र. १: आध्यात्मिक प्रगती करीत राहा! (w९८ १०/१ पृ. २८-३१)
क्र. २: १ राजे १५:९-२४
क्र. ३: td ३१बी येशू ख्रिस्त—देवाचा पुत्र व नेमलेला राजा
क्र. ४: td ३१डी येशूवर विश्वास ठेवणे तारणासाठी अत्यावश्यक का आहे?
नोव्हें. १३ बायबल वाचन: १ राजे १८-२०
गीत क्र. १३ [*२ थेस्सलनीकाकर १–२ तीमथ्य ३]
क्र. १: शांतीने समस्या सोडवा (w९८ ११/१ पृ. ४-७)
क्र. २: १ राजे २०:१, १३-२२
क्र. ३: td ३१ई बचावासाठी केवळ येशूवर विश्वास पुरेसा आहे का?
क्र. ४: td ३३बी #देवाच्या राज्याद्वारे मिळणारे आशीर्वाद
नोव्हें. २० बायबल वाचन: १ राजे २१-२२
गीत क्र. २ [*२ तीमथ्य ४–इब्री लोकांस ७]
क्र. १: ‘स्वर्गातल्या धान्याचा’ फायदा करून घेणे (w९९ ८/१५ पृ. २५-२८)
क्र. २: १ राजे २२:२९-४०
क्र. ३: td ३३सी ख्रिस्ताचे शत्रू क्रियाशील असतानाच राज्यशासन सुरु होते
क्र. ४: td ३३ई देवाचे राज्य मानवाच्या प्रयत्नांद्वारे येत नाही
नोव्हें. २७ बायबल वाचन: २ राजे १-३
गीत क्र. ६ [*इब्री लोकांस ८–याकोब २]
क्र. १: विवाहाच्या मागणीला ख्रिश्चनांनी कसे लेखले पाहिजे? (w९९ ८/१५ पृ. ३०, ३१)
क्र. २: २ राजे २:१५-२५
क्र. ३: td ३४ए “जगाचा शेवट” याचा अर्थ काय आहे
क्र. ४: td ३४बी #शेवटल्या दिवसांची चिन्हे पाहून आध्यात्मिकरीत्या जागृत असा
डिसें. ४ बायबल वाचन: २ राजे ४-६
गीत क्र. २ [*याकोब ३–२ पेत्र ३]
क्र. १: सिमनीपासून सावधान (w९८ ११/१५ पृ. २८)
क्र. २: २ राजे ५:२०-२७
क्र. ३: td ३६बी सार्वकालिक जीवन फक्त एक स्वप्न नव्हे
क्र. ४: td ३६डी स्वर्गात कोण जातात?
डिसें. ११ बायबल वाचन: २ राजे ७-९
गीत क्र. १४ [*१ योहान १–प्रकटीकरण १]
क्र. १: पैसे उधार देताना व घेताना अनुसरावेत अशी बायबल तत्त्वे (w९८ ११/१५ पृ. २४-७)
क्र. २: २ राजे ७:१, २, ६, ७, १६-२०
क्र. ३: td ३६ई पृथ्वीवर सार्वकालिक जीवन प्राप्त करणाऱ्यांची संख्या अमर्याद असेल
क्र. ४: td ३८बी #विवाह बंधन आदरणीय असावे
डिसें. १८ बायबल वाचन: २ राजे १०-१२
गीत क्र. १७ [*प्रकटीकरण २-१२]
क्र. १: येशूच्या जन्माची सत्य कथा (w९८ १२/१५ पृ. ५-९)
क्र. २: २ राजे ११:१-३, ९-१६
क्र. ३: td ३८सी ख्रिश्चनांनी मस्तकपद तत्वाचा आदर केला पाहिजे
क्र. ४: td ३८डी लेकरांसंबंधी पालकांची जबाबदारी
डिसें. २५ लेखी उजळणी. संपूर्ण २ शमुवेल १३–२ राजे १२
गीत क्र. ९ [*प्रकटीकरण १३-२२]