सप्टेंबरसाठी सेवा सभा
सूचना: येणाऱ्या महिन्यांत आमची राज्य सेवा यात नेहमीप्रमाणे सेवा सभेचा साप्ताहिक कार्यक्रम दिला जाईल. पण, “देवाचे भविष्यसूचक वचन” या अधिवेशनाला उपस्थित राहता यावे आणि मग पुढच्या आठवड्याच्या सेवा सभेत अधिवेशन कार्यक्रमाच्या ठळक वैशिष्ट्यांची ३० मिनिटे उजळणी करता यावी म्हणून मंडळ्या आवश्यक ते बदल करू शकतात. अधिवेशनाच्या प्रत्येक दिवसाच्या ठळक मुद्द्यांचा पुनर्विचार करण्यासाठी तीन सुयोग्य बांधवांना आधीपासूनच सांगण्यात यावे जेणेकरून चांगली तयारी करून अधिवेशनातील ठळक मुद्दे ते मंडळीपुढे मांडू शकतील. आणि यामुळे सर्वांनाच आपल्या रोजच्या जीवनात तसेच क्षेत्र सेवेत उपयोगी पडतील असे मुख्य मुद्दे लक्षात ठेवता येतील. श्रोत्यांपैकी कोणाला एखादा मुद्दा किंवा अनुभव सांगायचा असेल तर तो विषयाला धरून थोडक्यात सांगावा.
सप्टेंबर ६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १९० (६)
१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.
१७ मि: “तुम्ही एक उद्देश समोर ठेवून कार्य करता का?” सदर लेख एका मिनिटाच्या आत प्रस्तुत करून प्रश्नोत्तरांनी चर्चा सुरू करा. आपली सेवा पुस्तकातील पृष्ठे ८८-९ मधील मुद्दे देखील विचारात घ्या. सेवेत नियमितपणे, पूर्णार्थाने सहभाग घेण्याचे प्रोत्साहन सर्वांना द्या.
१८ मि: “पालकांनो—आपल्या मुलांपुढे उत्तम आदर्श ठेवा.” वडिलांनी हा लेख थोडक्यात प्रस्तुत करावा; त्यानंतर ज्यांना मुले आहेत अशा दोन बांधवांनी सदर लेखाची चर्चा करावी. शाळा, टीव्ही, साक्षीदार नसलेले नातेवाईक आणि असे इतर लोक या माध्यमांतून येणाऱ्या वाईट प्रभावापासून आपल्या मुलांचे संरक्षण कसे करता येईल याविषयी ते चिंता व्यक्त करतात. बेशिस्त वागणूक, गलिच्छ भाषा, असभ्य पेहराव आणि हिणकस मनोरंजन या बाबी बांधव विचारात घेतात. उत्तम आदर्श मांडणे किती महत्त्वाचे आहे याची चर्चा केल्यानंतर कौटुंबिक अभ्यास, मंडळीच्या सभा आणि क्षेत्र सेवा उत्साहवर्धक करण्यासाठी काय करता येईल यावर ते चर्चा करतात.—पाहा जुलै १, १९९९, टेहळणी बुरूज, पृष्ठे ८-२२, आणि सप्टेंबर २२, १९९१, सावध राहा! (इंग्रजी) पृष्ठे ८-९.
गीत १०१ (२८) आणि समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर १३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १७१ (११)
१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.
१५ मि: मागच्या वर्षी आपण काय काय साध्य केले? सेवा पर्यवेक्षकांचे भाषण. मंडळीच्या १९९९ सेवा वर्ष अहवालाची ठळक वैशिष्ट्ये सांगा. साध्य केलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल मंडळीची प्रशंसा करा. त्याचवेळी, मंडळीला कोठे सुधारणा करण्याची गरज आहे तेही सांगा. सभांची उपस्थिती आणि बायबल अभ्यास यांबाबतीत मंडळीने काय केले त्याविषयी सांगा. यंदाच्या सेवा वर्षासाठी सर्वांना साध्य करता येतील असे ध्येय मंडळीपुढे ठेवा.
२० मि: “हिंदू व्यक्तीशी संभाषण कसे कराल?” प्रश्नोत्तरे. एखादी हिंदू व्यक्ती भेटल्यास सर्वसामान्य जिव्हाळ्याच्या विषयांना धरून संभाषण करणे लाभदायक कसे ठरू शकते यावर भर द्या आणि कोणकोणत्या बाबतींत आपण हिंदू लोकांशी सहमत होऊ शकतो तेही सांगा. सुचवलेल्या प्रस्तुतींमध्ये थोडाफार बदल करून हिंदू लोकांशिवाय इतर लोकांनाही साक्ष कशी दिली जाऊ शकते ते दाखवा. मग, हिंदू व्यक्तीला साक्ष देत असल्याचे एक उत्तम तयारी केलेले प्रात्यक्षिक दाखवा. हिंदू धर्माविषयी अधिक माहिती हवी असल्यास फेब्रुवारी १९९८ ची आमची राज्य सेवा पुरवणी; पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या (hw-MR) पृष्ठ १४ आणि मानवजातीने केलेला देवाचा शोध (इंग्रजी), अध्याय ५ पाहा.
गीत १४० (२६) आणि समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर २० ने सुरू होणारा सप्ताह
गीत १९३ (१८)
५ मि: स्थानिक घोषणा.
१५ मि: स्थानिक गरजा.
२५ मि: “सन १९९९ ‘देवाचे भविष्यसूचक वचन’ प्रांतीय अधिवेशने.” (परिच्छेद १-१५) प्रश्नोत्तरे. परिच्छेद ६, ८, ११ आणि १५ वाचा. अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी, शुक्रवारच्या दिवशीही उपस्थित राहणे जरूरीचे का आहे ते सांगा. अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी प्रत्येकाने आपल्या जेवणाची स्वतः व्यवस्था करावी, असे संस्था का म्हणते यावर जोर द्या.
गीत १९ (४) आणि समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर २७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १४१ (१७)
१० मि: स्थानिक घोषणा. सर्व प्रचारकांना सप्टेंबर महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. ऑक्टोबर महिन्यादरम्यान मासिक वितरण कार्यात पूर्णार्थाने सहभाग घेता यावा म्हणून सर्वांना योजना करण्याचे प्रोत्साहन द्या. संभाषण कसे सुरू करावे याबद्दल ऑक्टोबर १९९६ आमची राज्य सेवा, पृष्ठ ८ वर दिलेले काही सल्ले विचारात घ्या. संभाषण सुरू करण्यास मदत करतील असे काही मुद्दे नवीन मासिकांतून दाखवा आणि एकदोन छोटीशी प्रात्यक्षिके दाखवा.
१५ मि: प्रश्न पेटी. वडिलांचे भाषण.
२० मि: “सन १९९९ ‘देवाचे भविष्यसूचक वचन’ प्रांतीय अधिवेशने.” (परिच्छेद १६-२३) प्रश्नोत्तरे. परिच्छेद १७-२० वाचा. वेशभूषा, केशभूषा आणि आचरण यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज का आहे यावर जोर देण्यासाठी लेखात उल्लेख केलेल्या तसेच उद्धृत केलेल्या शास्त्रवचनांचा उपयोग करा.
गीत ८७ (६) आणि समाप्तीची प्रार्थना.