वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९९ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९९
आमची राज्य सेवा—१९९९
km ९/९९ पृ. ७

घोषणा

◼ सप्टेंबरसाठी साहित्य सादरता: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गण्या. नोव्हेंबर: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. डिसेंबर: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान आणि त्याच्यासोबत नवे जग भाषांतर (इंग्रजी) देखील.

◼ अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नियुक्‍त केलेल्या कोणा एकाने सप्टेंबर १ रोजी अथवा त्यानंतर होता होईल तितक्या लवकर मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. मग, मंडळीत पुढच्या वेळी जमाखर्च अहवाल वाचून दाखवल्यानंतर याची घोषणा करण्यात यावी.

◼ पुनःस्वीकार केला जावा अशी इच्छा दाखवणाऱ्‍या कोणाही बहिष्कृत अथवा सत्यापासून अलिप्त झालेल्या व्यक्‍तीसंबंधी फेब्रुवारी १, १९९२, टेहळणी बुरूज, पृष्ठे १६-९ वर दिलेल्या सूचना अनुसरण्याची आठवण वडिलांना करून दिली जात आहे.

◼ मंडळीतल्या सर्वांनी टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांच्या सर्व नवीन व नुतनीकरणाच्या वर्गण्या आणि त्यासोबतच आपल्या स्वतःच्या वर्गण्याही मंडळीमार्फतच पाठवाव्यात.

◼ संस्था प्रचारकांच्या वैयक्‍तिक साहित्य मागण्यांची पूर्ती करत नाही. मंडळीची दर महिन्याची साहित्य मागणी संस्थेला पाठवण्यापूर्वी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी दर महिन्याला एक घोषणा करावी; यामुळे, ज्यांना स्वतःसाठी काही साहित्य हवे असेल ते याबद्दल साहित्य हाताळणाऱ्‍या बांधवाला सांगू शकतील. कोणती प्रकाशने, खास मागणी प्रकाशने (स्पेशल रिक्वेस्ट आयटम्स) आहेत ते कृपया लक्षात ठेवा.

◼ येथून पुढे संस्था टेहळणी बुरूज आणि सावध राहा! खंडांच्या स्थायी मागण्या राखणार नाही. आपल्या पुढच्या साहित्य मागणीत मंडळ्या या खंडांची मागणी करू शकतात. बाइन्ड केलेले हे खंड खास मागणी साहित्यांत मोडतात. तेव्हा, ज्या कोणाला हे खंड हवे असतील त्यांनी मंडळीकडे यांची मागणी करतेवेळीच त्यांची रक्कम भरावी.

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

यहोवाचे साक्षीदार आणि शिक्षण—बंगाली, हिंदी आणि मराठी

सन १९९८ चे टेहळणी बुरूज आणि सावध राहा! खंड.

◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित—तामिळ

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा