वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९९ पृ. ३-४
  • पायनियरींग—आता जमण्यासारखे आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पायनियरींग—आता जमण्यासारखे आहे का?
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • आपण पुन्हा करणार का?—सहायक पायनियरांसाठी आणखीन एक आवाहन
    आमची राज्य सेवा—१९९८
  • पायनियर सेवा—तुम्हाला ती जमेल का?
    आमची राज्य सेवा—१९९८
  • पाहिजेत—४,००० सहायक पायनियर तुम्ही मार्च, एप्रिल वा मे महिन्यांत सहायक पायनियरींग करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—१९९७
  • पायनियर सेवेचे वरदान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९९
km ८/९९ पृ. ३-४

पायनियरींग—आता जमण्यासारखे आहे का?

१ सन १९९९ चे वार्षिक वचन आपल्याला सतत याची आठवण करून देते, की आपण अद्याप यहोवाच्या ‘तारणाच्या दिवसातच’ आहोत. (२ करिंथ. ६:२) पण, त्याचा हा तारणाचा दिवस लवकरच मावळतीला जाऊन ‘न्यायाचा दिवस’ उजाडेल. (२ पेत्र २:९) आज यहोवा मानवजातीला तारण साधून घेण्याची संधी देतो, तेव्हा वाढत्या संख्येने लोक त्या संधीचा फायदा घेतात हे किती आनंददायक आहे!

२ न्यायाचा दिवस उजाडण्यापूर्वी प्रतिसाद देणाऱ्‍या सर्व लोकांना साहाय्य करण्याचे आव्हान यहोवाचे लोक मोठ्या शिकस्तीने पेलत आहेत. असे करण्यासाठी अनेक राज्य प्रचारकांनी पायनियर सेवा हाती घेतली आहे. तुमच्याविषयी काय? पायनियर सेवा आता जमण्यासारखी आहे असे तुम्हाला वाटते का? असे विचारण्याचे कारण काय?

३ व्यक्‍त केलेली कृतज्ञता: जानेवारी १९९९ च्या आमच्या राज्य सेवेत सांगितल्याप्रमाणे नियमित आणि सहायक या दोन्ही पायनियरांकडून करण्यात येणारी तासांची मागणी कमी करण्यात आली आहे. या नवीन मागणीनुसार नियमित पायनियरांना दरमहा ७० तास म्हणजे एका सेवा वर्षात एकूण ८४० तास सेवेत खर्च करावे लागतात. तर, सहायक पायनियरांना दरमहा ५० तास सेवेत खर्च करावे लागतात. तासांच्या मागणीत हा फेरबदल केल्यामुळे अनेकांनी आपली कृतज्ञता व्यक्‍त केली आहे:

“खरंच, आपल्या स्वर्गीय पित्याकडून आलेली ही एक देणच आहे!”

“ही तरतूद केल्याबद्दल आनंद, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात!”

“यामुळे आता आम्हाला आमच्या आराखड्यानुसार कार्य पूर्ण करणं खूपच सोपं होईल!”

“आता आणखीन बऱ्‍याच जणांनी पूर्ण-वेळेची सेवा हाती घ्यावी आणि मोठ्या प्रमाणात यहोवाची सेवा केल्यामुळे मिळणारे आशीर्वाद अनुभवावेत अशी आमची प्रार्थना आहे.”

४ तारणाच्या दिवसाच्या अंतिम टप्प्यात येत असता यहोवाच्या लोकांनी एकाच प्रचंड आवाजात त्याची स्तुती करावी अशी अपेक्षा यहोवा करतो हे स्पष्ट दिसून येत आहे. हा आवाज पुढे अधिकाधिक मोठा आणि प्रचंड बनतो तो पुढील कारणांमुळे: (१) राज्य घोषकांच्या संख्येत सतत वाढ होत असल्यामुळे आणि (२) राज्य प्रचाराच्या कार्यात आपल्या परीने होता होईल तितके अधिक करत राहण्याच्या प्रत्येकाच्या प्रयत्नामुळे. या दोन्ही मार्गांनी, तारणाचा स्वीकार करणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीला तिच्या स्वयंसेवी वृत्तीमुळे यहोवाने, अर्थात ‘वाढवणाऱ्‍या’ देवाने आशीर्वादित केले आहे.—स्तोत्र ११०:३; १ करिंथ. ३:६, ७.

५ तिचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका: देवाच्या तारणाच्या दिवसासंदर्भात पौलाने सहख्रिश्‍चनांना बोध केला: “आम्ही त्याच्यासह [यहोवासह] कार्य करिता करिता विनंती करितो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये.” होय, प्रत्येक प्रसंगी तारण साधण्यास इतरांना साहाय्य करण्याचा ‘आताच अनुकूल समय आहे’ याची जाणीव ठेवल्यास आपण ‘तिचा स्वीकार व्यर्थ होऊ देणार नाही.’ (२ करिंथ. ६:१, २) पौलाचे हे शब्द विशेषतः आपल्या काळाकरता लागू होतात. यहोवावर मनस्वी प्रेम करणाऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या मते, यहोवाने नेमून दिलेल्या कार्यात होता होईल तितका सहभाग घेणे हा एक विशेषाधिकारच आहे. तर मग, नियमित पायनियर म्हणून या सेवेत पूर्णार्थाने सहभाग घेणे तुम्हाला आता जमण्यासारखे आहे का?

६ एक वाजवी ध्येय: सप्टेंबर १ पर्यंत १,००० नियमित पायनियरांची संख्या गाठण्याचे भारताचे ध्येय आहे. हे नक्कीच एक वाजवी आणि साध्य करण्याजोगे ध्येय आहे. इतक्या आत्मविश्‍वासाने आम्ही असे का म्हणतो? कारण, मार्च १९९७ मध्ये १,७१५ बंधुभगिनींनी तर एप्रिल १९९८ मध्ये जवळजवळ २,१७० बंधुभगिनींनी सहायक पायनियर सेवा केली होती. यांपैकी बहुतेक लोकांनी ६० तासांचा अहवाल दिला होता—नियमित पायनियरांच्या तासांच्या नवीन मागणीनुसार फक्‍त १० तास कमी! तेव्हा, सहायक पायनियरींग केलेल्या या लोकांपैकी केवळ २०० लोकांनी जरी यंदाचे सेवा वर्ष उलटण्यापूर्वी नियमित पायनियर म्हणून आपले नाव नोंदवले तर सप्टेंबर महिन्यापासून आपल्याकडे १,००० किंवा त्याहून अधिक पूर्ण-वेळेचे पायनियर असतील!

७ आराखडा आवश्‍यक: दरमहा क्षेत्र सेवेचे ७० तास भरून काढणे तुम्हाला अजूनही असाध्य वाटते का? मग, आठवड्याचे फक्‍त १७ तास असा विचार केला तर कदाचित तुम्हाला हे शक्य वाटेल. पुढील पानावर दिलेल्या नमुना आराखड्यांचा उपयोग करून तुम्हाला सोईस्कर पडेल असा एक नियमित पायनियर आराखडा तयार करा. असे करताना, अनुभवी पायनियरांना विचारा की वैयक्‍तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्‍या पार पाडून त्यांना पायनियरींग कसे जमते? तसेच, तुमच्या विभागातले इतर पायनियर आठवड्याभराच्या आपल्या सेवेचे नियोजन कसे करतात याबद्दल विभागीय पर्यवेक्षकांना विचारा. हे सर्व केल्यानंतर, तुम्ही केलेली योजना यशस्वी होण्यासाठी यहोवावर विसंबून राहा.—नीति. १६:३.

८ कुटुंबातील सर्वांना सामील करा: पायनियरींगच्या कार्यात कुटुंबातील सर्वांना सामील करण्याचा तुम्ही विचार केला आहे का? नसल्यास, विचारपूर्वक योजना आणि उत्तम सहकार्य यांमुळे कुटुंबातले निदान एकदोन सदस्य तरी पायनियरींग कसे करू शकतात याची कुटुंब या नात्याने सविस्तर चर्चा करा. पण, परिस्थितीचे प्रामाणिकपणे परीक्षण केल्यानंतर काहींना दिसून येईल, की नियमित पायनियरींग करणे त्यांना सध्यातरी शक्य नाही. अशा वेळी, नंतर कधी तरी पायनियरींग करण्याचे ध्येय राखा. पण, एका विशिष्ट तारखेपासून पायनियरींग सुरू करता येण्यासाठी आतापासूनच योजना आखायला सुरवात करा. नियमित पायनियरींगचे ध्येय गाठता यावे म्हणून तुम्ही बऱ्‍याचदा सहायक पायनियरींग करू शकता.

९ सध्या नियमित पायनियर म्हणून सेवा करणाऱ्‍या ८०० हून अधिक पायनियरांची परिस्थिती लक्षात घेतली तर ती एकसारखीच नाही असे आपल्याला जाणवेल. यांच्यापैकी १०० अविवाहित असून सुमारे २०० पायनियरांनी वयाची पन्‍नाशी ओलांडली आहे. जवळजवळ ५०० जण २० ते ५० वर्षांच्या वयोगटातले असून त्यांच्यापैकी पुष्कळांना परिवाराच्या आणि मंडळीच्या जबाबदाऱ्‍या सांभाळाव्या लागतात. पण तरीही, हे सगळेजण पायनियरींग करण्यासाठी ‘संधी साधून घेत आहेत.’ आणि पुष्कळांना असे करण्यासाठी अतिशय साधे जीवन जगावे लागत असले तरी त्यात ते समाधानी असतात.—कलस्सै. ४:५.

१० तुम्हीही साधे जीवन जगण्यास हवे का? साधे जीवन व्यतीत केल्याने तुम्हालाही पायनियरींग करण्याची संधी लाभू शकते. अनावश्‍यक खोल्या आणि इतर सामानसुमान असलेल्या एका मोठ्या घरासारखे तुमचे जीवन आहे का, ज्यामागे तुमचा जास्त वेळ, पैसा आणि श्रम खर्च होतो? तसे असल्यास, अगदी साधे जीवन जगल्याने पायनियरींग करणे शक्य होईल. नोकरी-व्यवसायात खर्च होणारा वेळ तुम्हाला कमी करता येईल का? अनावश्‍यक गोष्टींमध्ये किंवा मनोरंजनामध्ये जितका वेळ खर्च होत असेल त्यातून तुम्ही काही वेळ काढू शकता का?

११ पहिले तीमथ्य ६:८ मध्ये बायबल असा सल्ला देते: “आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.” साध्या राहणीमानात आनंद मानल्याने यहोवाच्या सेवेत शक्य तितके अधिक करणे आणि आध्यात्मिक गोष्टींना सर्वाधिक महत्त्व देणे कठीण जाणार नाही. (मत्त. ६:२२, ३३) १९९८ वार्षिक पुस्तकाच्या (इंग्रजी) पृष्ठ १०४ वर जपान देशातील बांधवांमध्ये असलेल्या पायनियर आत्म्याकरता कारणीभूत ठरलेल्या अनेक सूचनांविषयी सांगण्यात आले आहे. त्यांपैकी एका सूचनेचा विचार करा: “जपानी घरे सहसा फार अलिशान नसतात; त्यामुळे ती नीटनेटकी ठेवण्यासाठी जास्त वेळ खर्च होत नाही, आणि मुख्य म्हणजे परंपरेनुसार तिथल्या लोकांचे राहणीमान देखील अगदी साधेच असते.” हेच १ तीमथ्य ६:८ चे सार नाही का?

१२ यहोवाचा तारणाचा दिवस मावळतीला लागण्यापूर्वी जगभरात देवाचे सेवक अधिकाधिक जोरदारपणे सुवार्तेचा प्रचार करत आहेत. प्रशंसनीय गोष्ट अशी, की गेल्या वर्षी सरासरी ७,००,००० जणांनी दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या पायनियर सेवेत सहभाग घेतला. त्यांच्यात सामील होण्यासाठी तुम्ही आपल्या जीवनात काही तडजोडी करू शकता का? “पायनियरींग—आता जमण्यासारखे आहे का?” या प्रश्‍नाचा गांभिर्याने आणि प्रार्थनापूर्वक विचार करण्याचे उत्तेजन आम्ही तुम्हाला देत आहोत.

[३ पानांवरील संक्षिप्त आशय]

लक्ष्य: १००० नियमित पायनियर!

[४ पानांवरील चौकट]

नियमित पायनियर नमुना आराखडा

गरज आहे: दर आठवडी १७ तास

आठवड्याचा एक दिवस आणि सप्ताहांत

दिवस तास

शुक्रवार ८

शनिवार ६

रविवार ३

एकूण तास: १७

आठवड्यातले दोन दिवस आणि शनिवार

दिवस तास

मंगळवार ७

गुरुवार ७

शनिवार ३

एकूण तास: १७

आठवड्यातले तीन दिवस आणि रविवार

दिवस तास

सोमवार ५

बुधवार ५

शुक्रवार ५

रविवार २

एकूण तास: १७

दोन संध्याकाळ आणि सप्ताहांत

दिवस तास

सोमवार ३

बुधवार ३

शनिवार ८

रविवार ३

एकूण तास: १७

आपल्या स्वतःचा नियमित पायनियर आराखडा तयार करा

दिवस तास

सोमवार

मंगळवार

बुधवार

गुरुवार

शुक्रवार

शनिवार

रविवार

एकूण तास: १७

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा