वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९९ पृ. २
  • ऑगस्टसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्टसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • उपशिर्षक
  • ऑगस्ट २ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट ९ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट १६ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट २३ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट ३० ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९९
km ८/९९ पृ. २

ऑगस्टसाठी सेवा सभा

ऑगस्ट २ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ३९ (४)

१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. एप्रिल महिन्याच्या सबंध देशाच्या आणि स्थानिक मंडळीच्या क्षेत्र सेवा अहवालाविषयी सांगा. सर्व प्रचारकांना ऑगस्ट महिन्यात क्षेत्र सेवेत सहभाग घेण्याचे उत्तेजन द्या.

१७ मि: “यहोवाचे प्रतापी नाम अतिआदरणीय माना.” एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍नोत्तरांनी लेखाची चर्चा सुरू करा. सदर लेखात उल्लेख केलेल्या शास्त्रवचनांकडे श्रोत्यांचे विशेष लक्ष वेधून घ्या.—अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील पृष्ठे १८४-५ पाहा.

१८ मि: “लौकिक शिक्षण आणि तुमचे आध्यात्मिक ध्येय.” कुटुंबातले वडील आपल्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर या लेखाची चर्चा करतात. आणि यासोबतच, डिसेंबर २२, १९९५, सावध राहा! (इंग्रजी), पृष्ठे ७-११ वरील संबंधित माहितीची देखील ते उजळणी करतात.

गीत १४८ (६) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट ९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १३८ (२१)

८ मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

१२ मि: पायनियर साहाय्य कार्यक्रम—कितपत यशस्वी ठरला आहे? सेवा पर्यवेक्षकाचे भाषण आणि काही मुलाखती. या संदर्भात सप्टेंबर १९९८, आमची राज्य सेवामध्ये पृष्ठ ८ वर दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची उजळणी करा. या कार्यक्रमासंदर्भात मंडळीमध्ये काय योजना केली होती आणि साहाय्य मिळालेल्या प्रचारकांनी काय प्रगती केली ते सांगा. एकदोन पायनियरांची आणि त्यांच्यापासून लाभ मिळालेल्या काही प्रचारकांची मुलाखत घ्या. यानंतर आता ज्या लोकांना साहाय्य केले जाईल त्यांना या कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घेण्याचे उत्तेजन द्या.

२५ मि: “पायनियरींग—आता जमण्यासारखे आहे का?” प्रश्‍नोत्तरांनी वडील याची चर्चा करतात. कशाप्रकारे अधिक प्रचारकांना पायनियरींग करणे शक्य आहे ते सकारात्मकपणे दाखवून द्या. समोर आलेल्या अडथळ्यांवर मात करून पायनियर सेवेत यशस्वी झालेल्या पायनियरांची मुलाखत घ्या. “नियमित पायनियर नमुना आराखडा” याचे विश्‍लेषण करा; उत्तम योजना केल्याने तास भरून काढणे कसे शक्य आहे यावर भर द्या. पायनियरींग करण्याची इच्छा असणाऱ्‍यांना सभेनंतर अर्ज मिळू शकतात असे सांगा.

गीत २०२ (१) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट १६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १३१ (२२)

१० मि: स्थानिक घोषणा. ऑगस्ट महिन्याचे केवळ दोन आठवडे बाकी आहेत; तेव्हा महिना संपण्यापूर्वी सर्वांना सेवेत सहभाग घेण्याचे उत्तेजन द्या. “नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम” या लेखाची उजळणी करा. नवीन लोकांना बाप्तिस्म्याचा विचार करण्याचे उत्तेजन द्या. संमेलनाच्या हरएक सत्रास उपस्थित राहण्याचे प्रोत्साहन सर्वांना द्या.

१५ मि: स्थानिक गरजा.

२० मि: तुम्ही शिष्य बनविण्याच्या कामात सहभाग घेत आहात का? श्रोत्यांसोबत चर्चा. आज अतिशय मोठ्या प्रमाणात बायबल साहित्याचे वितरण होत आहे; ही गोष्ट लक्षात घेता, लोकांना या साहित्यातून लाभ व्हावा म्हणून त्यांच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करणे हे आपले ध्येय असायला हवे. कोणत्या कारणांमुळे प्रचारक अधिक बायबल अभ्यास संचालित करू शकत नाहीत त्याविषयी प्रचारकांची मते जाणून घ्या. (१) अभ्यास करण्याची इच्छा असणारे लोक इतक्या सहजासहजी भेटत नाहीत. (२) किंवा भेटले तरी व्यस्त असल्यामुळे अभ्यासासाठी ते वेळ देऊ शकत नाहीत. (३) शिवाय, अभ्यास सुरू झाल्यानंतरही, प्रत्येक वेळी ती व्यक्‍ती घरी भेटेलच आणि अभ्यास नियमितपणे होईलच याची शाश्‍वती नसते. यासोबतच, बायबल अभ्यासाच्या कार्यासंबंधी काही प्रचारकांना काय वाटते याचीही चर्चा करा: जसे की (१) ‘मला नाही वाटत मी एक चांगला शिक्षक आहे.’ (२) ‘दर आठवडी अभ्यास संचालित करण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही.’ (३) ‘अभ्यास घेण्याचा शब्द द्यायला मी इतका सहजासहजी तयार होत नाही.’ (४) ‘सेवेच्या इतर पैलूंमध्ये मी भाग घेतो तितकंच पुरेसं आहे.’ शिष्य बनविण्याच्या कामात व्यक्‍तिगतपणे सहभाग घेण्यासाठी या अडसरांवर यशस्वीरित्या मात कशी केली जाऊ शकते यावर सकारात्मक सल्ले द्या. बायबल अभ्यासाच्या कार्यात यशस्वी झालेल्या प्रचारकांना आलेल्या आनंदी अनुभवाचे कथन करण्यास सांगा.—मे १९९८ आमची राज्य सेवा पुरवणी, परिच्छेद ३-८, १५.

गीत १०० (६) समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट २३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ९४ (५)

१० मि: स्थानिक घोषणा.

१५ मि: विवाह एक पवित्र बंधन आहे हे समजण्यास नवोदितांना मदत करा. युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठे २४८-५० च्या आधारे वडील मंडळीसोबत या विषयाची चर्चा करतात. आपला संपर्क अशा काही जोडप्यांशी येतो जे राज्य संदेशाला प्रतिसाद देतात; पण, कायदेशीररित्या लग्न न करता एकत्र राहात असल्यामुळे त्यांची आध्यात्मिकरित्या इतकी प्रगती होत नाही. ख्रिश्‍चनांनी विवाहास आदरणीय का समजावे हे त्यांना कसे पटवून दिले जाऊ शकते याची चर्चा करा. (जानेवारी ८, १९९२, सावध राहा! (इंग्रजी), पृष्ठे २६-७ पाहा.) ज्यांचा कायदेशीर विवाह झाला नाही असे लोक मंडळीचे सदस्य का होऊ शकत नाहीत हे व्यवहारकुशलतेने त्यांना कसे समजावून सांगता येईल यावर सल्ले द्या.

२० मि: “बौद्ध व्यक्‍तीशी संभाषण कसे कराल?” प्रश्‍नोत्तरे. आपल्यासाठी नवीन असणाऱ्‍या कल्पना, प्रथा आणि विधी यांचे पालन करणारे विधर्मी लोक आपल्याला क्षेत्रात भेटतात तेव्हा त्यांच्याशी संभाषण कसे सुरू करावे हे आपल्याला सुचत नाही. या विषयावर पाच लेखांची श्रृंखला प्रकाशित होणार असून त्यापैकी हा पहिला लेख आहे. चांगल्याप्रकारे तयार केलेले एक प्रात्यक्षिक दाखवा. बौद्ध धर्माबद्दल अधिक माहितीसाठी फेब्रुवारी १९९८ ची आमची राज्य सेवा पुरवणी, पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या (hw-MR) पृष्ठ १३ आणि मानवजातीने केलेला देवाचा शोध (इंग्रजी) यातील ६ वा अध्याय पाहा.

गीत १३३ (३) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट ३० ने सुरू होणारा सप्ताह

गीत ९९ (८)

१० मि: स्थानिक घोषणा. सर्वांना ऑगस्टचा आपला क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. आपल्या गटातील सर्वांनी आपापला अहवाल दिला आहे की नाही हे मंडळीच्या पुस्तक अभ्यास संचालकाने पाहावे जेणेकरून सप्टेंबर ६ रोजी सर्व अहवाल जमा करणे शक्य होईल.

१७ मि: आपण आपल्या बांधवांवर प्रेम करतो. वडिलांचे भाषण आणि त्यासोबतच डिसेंबर १, १९९५, टेहळणी बुरूज, पृष्ठे १५-१७, परिच्छेद ७-११ वर आधारित श्रोत्यांसोबत चर्चा. बांधवांशी चांगली ओळख करून घेतल्यामुळे, एकमेकांना उत्तेजन दिल्यामुळे आणि संकटप्रसंगात टिकून राहण्यास एकमेकांना साहाय्य केल्यामुळे आपल्याला आणि आपल्या बांधवांना दोघांनाही कसा लाभ होऊ शकतो यावर भर द्या. आणि हे अधिकाधिक कसे केले जाऊ शकते यावर उपयुक्‍त सूचना द्या. इतरांनी दिलेल्या प्रेमळ उत्तेजनामुळे उभारी कशी मिळाली, मनोबल कसे वाढले यावर श्रोत्यांना आपले अनुभव विचारा.

१८ मि: तुमच्या आशेविषयी बोला. हायस्कूलमध्ये शिकणाऱ्‍या एकदोन आदर्श किशोरवयीन मुलांची मुलाखत वडील घेतात. आपण जे काही करतो त्यात हे युवक सहभागी का होत नाही असा प्रश्‍न करणाऱ्‍या जगीक युवकांचा त्यांना सतत सामना करावा लागतो. अशावेळी ख्रिस्ती युवकांनी आपला बायबल-आधारित विश्‍वास तर स्पष्ट करावाच पण त्याचवेळी प्रतिकार करण्यास खंबीरही असावे. आपल्याला कोणी तंबाखू किंवा ड्रग्स दिल्यास आपली प्रतिक्रिया काय असावी यावर हा गट चर्चा करतो. तरुणांचे प्रश्‍न या पुस्तकात, पृष्ठे २७७-८१ वर दिलेल्या युक्‍तिवादाची उजळणी करा. योग्य ते करण्याचा पक्का निश्‍चय केल्याने स्वतःचे संरक्षण कसे होते आणि त्याच वेळी इतरांना एक चांगली साक्ष कशी दिली जाते याचे स्पष्टीकरण द्या.

गीत १२९ (१८) आणि समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा