वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९९ पृ. ५-६
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
  • आमची राज्य सेवा—१९९९
आमची राज्य सेवा—१९९९
km ८/९९ पृ. ५-६

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत मे ३ ते ऑगस्ट २३, १९९९ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्‍नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.

[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्रश्‍नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्‍तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]

पुढील विधाने चूक किंवा बरोबर ते ओळखा:

१. मुलांना वाजवी वागणूक देण्याकरता आईवडिलांना बायबल तत्त्वांबद्दल हातमिळवणी करण्याची गरज नाही. [fy-MR पृ. १०८ परि. १४]

२. वचनयुक्‍त ‘संततीच्या’ शासनाधीन असलेल्या राज्याकरवी यहोवाचे समर्थन, हाच सबंध बायबलचा मुख्य विषय आहे. (उत्प. ३:१५) [si पृ. १७ परि. ३०]

३. निर्गम यात अभिलिखित असलेल्या घटनांच्या अचूकतेला पुष्टी देणारा फारसा पुरावा पुरातत्त्वविज्ञानात किंवा इतर उगमांकडे उपलब्ध नाही. [si पृ. २० परि. ४]

४. जे अतिशय गरीब आहेत ते राज्याच्या वाढीकरता आर्थिक साहाय्य करण्याच्या स्थितीत नसतात. [w-MR९७ ९/१५ पृ. ५ परि. ७]

५. पालकांचे आणि आजीआजोबांचे उपकार फेडणे हे आपण करत असलेल्या यहोवाच्या उपासनेचा एक भाग आहे. (१ तीम. ५:४) [w-MR९७ ९/१ पृ. ४ परि. १-२]

६. सुरवातीला, शब्बाथ दिवस म्हणजे परमेश्‍वरामध्ये व सर्व राष्ट्रांमध्ये असलेली एक खूण होती. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा rs पृ. ३४५ परि. ३.]

७. मूल, स्वतःचे निर्णय घेण्याइतके मोठे होते तेव्हा ते आपल्या कार्यांबद्दल अधिक प्रमाणात जबाबदार असते, विशेषतः देवाचे नियम पाळण्याच्या बाबतीत. (रोम. १४:१२) [fy-MR पृ. १३५ परि. १७]

८. लेवीय हे पुस्तक मोशेने सा.यु.पू. १५१३ या वर्षी लिहिले. [si पृ. २५ परि. ३-४]

९. लूक २१:२०, २१ येथे अभिलिखित केलेले येशूचे शब्द, सा.यु. ६६ साली जनरल टायटस याच्या नेतृत्त्वाखाली रोमी सैन्याने जेरुसलेमेतून माघार घेतली तेव्हा पूर्ण झाले. [w-MR९७ ४/१ पृ. ५ परि. ३-४]

१०. एपिक्युरस याची शिकवण ख्रिस्ती लोकांकरता धोकेदायक होती, कारण ती १ करिंथकर १५:३२ येथे वर्णन केल्याप्रमाणे त्याच्या विश्‍वासहीन दृष्टिकोनावर आधारित होती. [w-MR९७ ११/१ पृ. २४ परि. ५]

पुढील प्रश्‍नांची उत्तरे द्या:

११. लेवीय ३:१७ येथे चरबी खाण्याची मनाई असल्याचे जे सांगण्यात आले आहे त्यातून आपल्याला काय शिकायला मिळते? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८४ २/१५ पृ. २९ परि. २.]

१२. यहोवाने दियाबल सैतानाला अस्तित्वात का राहू दिले आहे? (निर्ग. ९:१५) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w९२ ३/१५ पृ. १० परि. १४.]

१३. कुटुंबातील एखादी व्यक्‍ती गंभीर आजाराने पीडित असते तेव्हा प्राथमिकता ठरवण्यासाठी इतर कुटुंबियांनी मिळून सर्वप्रथम कोणती पावले उचलली पाहिजे? (नीति. १५:२२) [fy-MR पृ. १२२ परि. १४]

१४. इस्राएल राष्ट्र कोणत्या अर्थाने “याजकराज्य” होते? (निर्ग. १९:६) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ ७/१ पृ. १६ परि. ८.]

१५. “निर्दोष” आणि “सदोष” डोळ्यांत कोणता फरक आहे? (मत्त. ६:२२, २३) [w-MR९७ १०/१ पृ. २६ परि. ५]

१६. दाविदाच्या हातून चुका घडल्या असताना, तो “खऱ्‍या मनाने व सरळतेने” चालला असे त्याच्याविषयी कसे म्हणण्यात आले? (१ राजे ९:४) [w-MR९७ ५/१ पृ. ५ परि. २]

१७. निवासमंडपाच्या संबंधाने इस्राएली लोकांनी “सर्व काही केले,” यावरून आधुनिक काळातील कोणते सुहक्क पूर्वसूचित होतात? (निर्ग. ३९:३२) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ १२/१५ पृ. १२ परि. ९.]

१८. यहोवाने स्वतःला “मी असावयाचा तोच असणार” या शब्दांत प्रकट केले यावरून काय सूचित होते? (निर्गम ३:१४, ओल्ड व्हर्शन) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ ३/१ पृ. १० परि. ६.]

१९. लेवीय १०:१, २ येथे नादाब व अबीहू यांच्याविषयीचा जो अहवाल आहे, त्यावरून कोणता धडा शिकायला मिळतो? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८४ २/१५ पृ. २९ परि. ३.]

२०. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे मूल प्रसवल्यावर स्त्रीला “अशुद्ध” का समजले जायचे? (लेवी. १२:२, ५) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८४ २/१५ पृ. २९ परि. ५.]

पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक शब्द किंवा वाक्यांश पुरवा:

२१. एकाकीपणावर चमत्कारिक उपाय नसला तरीसुद्धा, एक-पालक _________________________ सामर्थ्याने त्यास सहन करू शकतात; हे सामर्थ्य रात्रंदिवस _________________________ केल्यामुळे मिळते. (१ तीम. ५:५) [fy-MR पृ. ११२ परि. २१]

२२. जीवनात एखादी शोकांतिका घडते, ती _________________________ गोष्टींना बळी पडल्यामुळे किंवा आपल्याला प्राप्त झालेल्या _________________________ असू शकते. [w-MR९७ ५/१५ पृ. २२ परि. ७]

२३. निर्गम या पुस्तकात यहोवा सर्वात महान _________________________ आणि _________________________ आणि आपल्या महान उद्देशांचा _________________________ असल्याचे प्रकट केले आहे. [si पृ. २४ परि. २६]

२४. आपण _________________________ जसे आहोत त्यापेक्षा आपण _________________________ कसे आहोत यावरून मुख्यतः आपण आंतरिक कसे आहोत, हे स्पष्ट होते. [w-MR९७ १०/१५ पृ. २९ परि. ४]

२५. कापणीच्या सणाचा संबंध _________________________ किंवा _________________________ असल्यास, खरे ख्रिस्ती अशा कोणत्याही प्रकारच्या दूषित उपासनेत _________________________ नकार दर्शवतात व यहोवाला नाखुश करण्याचे टाळतात. [w-MR९७ ९/१५ पृ. ९ परि. ६]

पुढील विधानांतून अचूक उत्तर निवडा:

२६. अब्राहामाच्या संतानाला छळले जाण्याची “चारशे वर्षे” सा.यु.पू. (१९४३; १९१९; १९१३) साली इश्‍माएलाने इसहाकाची थट्टा केली तेव्हापासून सुरू झाली आणि सा.यु.पू. (१५४३; १५१९; १५१३) या वर्षी ईजिप्तमधून सुटका झाली तेव्हा ती संपुष्टात आली. (उत्प. १५:१३) [si पृ. १७ परि. ३१]

२७. कुटुंबाचे गंभीर आजाराला यशस्वीपणे तोंड देणे किंवा न देणे हे कौटुंबिक सदस्यांची (आर्थिक सुबत्ता; प्रवृत्ती; विमा) यावर बव्हंशी अवलंबून असते. (नीति. १७:२२) [fy-MR पृ. १२० परि. १०]

२८. “देव [“यहोवा,” NW] नाही,” असे आपल्या अंतःकरणात म्हणणाऱ्‍या मनुष्याला “मूढ” असे म्हणण्यात आले आहे कारण (त्याच्यात नैतिक उणीव आहे; तो अशिक्षित आहे; त्याला तर्कबुद्धी नाही). (स्तोत्र १४:१) [w-MR९७ १०/१ पृ. ६ परि. ८]

२९. बंड पुकारल्यामुळे आदाम व हव्वा यांनी गमावलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट, अर्थात त्यांचे आनंदी राहणे ज्यावर सर्वस्वी अवलंबून होते ती गोष्ट म्हणजे (त्यांची परिपूर्णता; देवाबरोबरचा त्यांचा नातेसंबंध; त्यांचे उद्यानरूपी निवासस्थान). [w-MR९७ १०/१५ पृ. ६ परि. २]

३०. बायबलच्या इतर कोणत्याही पुस्तकाच्या तुलनेत (उत्पत्ति; निर्गम; लेवीय) या पुस्तकात पवित्रतेच्या आवश्‍यकतेविषयी अधिक वेळा उल्लेख केलेला आढळतो. [si पृ. २६ परि. ९]

पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:

निर्ग. ५:२; निर्ग. २१:२९; नीति. १:८; गलती. ५:२०; याको. १:१४, १५.

३१. ख्रिश्‍चन असल्याचा दावा करणारा कोणी शारीरिक गैरवागणुकीसोबत वारंवार व अपश्‍चात्तापाने त्याच्या पत्नीवर अथवा मुलांवर क्रोध व्यक्‍त करत असल्यास, त्याला ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत केले जाऊ शकते. [fy-MR पृ. १५० परि. २३]

३२. आपण जे कार्य करतो, ते आपण जसा विचार करतो त्यावरून सुरू होते. [fy-MR पृ. १४८ परि. १८]

३३. यहोवाच्या देवत्त्वाला मान्य करण्यास जे मगरूरीने नकार देतात अशांना तो नमवतो. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९२ १२/१ पृ. २५ परि. १८.]

३४. बायबल, मुलांना शिक्षण देण्याची प्रमुख जबाबदारी पित्याला देत असले तरी मातेला देखील महत्त्वपूर्ण भूमिका पूर्ण करावयाची आहे. [fy-MR पृ. १३३ परि. १२]

३५. कोणाच्या निष्काळजीपणामुळे एखादी व्यक्‍ती जिवे मारली गेल्यास, दयेची याचना करण्याची अनुमती नियमशास्त्रात दिली नव्हती. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ ११/१५ पृ. ११ परि. ५.]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा