नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम
आज यहोवासोबत चालल्यामुळे प्रत्यक्षात कोणकोणते लाभ आपल्याला मिळतात? आध्यात्मिक गोष्टींऐवजी गैर-ईश्वरशासित गोष्टींना जास्त महत्त्व देण्याचा मोह तुम्हाला होतो तेव्हा, तो टाळण्याकरता तुम्हाला काय करता येण्यासारखे आहे? (मत्त. ६:३३) चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगले असे समजणाऱ्या या जगात वावरताना, बऱ्या-वाईटातला फरक जाणणे तुम्हाला कठीण जाते का? (इब्री ५:१४) या सर्व प्रश्नांची उत्तरे, फेब्रुवारी २००० पासून सुरू होणाऱ्या विभागीय संमेलनात दिली जातील; संमेलनाचे शीर्षक आहे: “देवाच्या मार्गांवर चालून आज लाभ मिळवा.”—स्तोत्र १२८:१.
या विभागीय संमेलनाच्या शनिवारच्या दिवसाचे एक नवीन वैशिष्ट्य म्हणजे आदर्श सेवा सभा. या संदर्भात केलेल्या योजनांची पूर्वकल्पना विभागीय पर्यवेक्षक तुम्हाला देतीलच जेणेकरून कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सर्वांनाच पूर्वतयारीनिशी या संमेलनाला उपस्थित राहता येईल.
“पायनियरांनो—सभोवार नजर ठेवून जपून चाला” या भागात, पायनियर सेवेकरता उचित वेळ काढण्यासाठी ज्ञानाचा आणि समंजसपणाचा उपयोग कसा करावा हे स्पष्ट केले जाईल. (इफिस. ५:१५-१७) मग, “वरवरून योग्य वाटणाऱ्या मार्गांविषयी सावधान” या भाषणात, जीवनाच्या हरएक पैलूत देवाला काय मान्य आहे आणि हे कसे ओळखावे हे समजावले जाईल. “पूर्ण झालेल्या भविष्यवाणीचा आपल्यावर काय परिणाम होतो” हे भाषण ऐकून देवाच्या वचनाविषयी वाटणारे प्रेम आपल्या मनात आणि अंतःकरणात अगदी पूर्णपणे भरून जाईल. आणि मग, “देवाचे मार्ग—किती लाभदायक!” या जाहीर व्याख्यानात यहोवाच्या नीतिमान मार्गांनुसार चालल्यामुळे आज आपल्याला प्रत्यक्षात कोणकोणते लाभ होतात हे दाखवले जाईल.
देवाचे समर्पित सेवक या नात्याने त्याच्या मार्गांवरून वाटचाल करण्याची तुमची इच्छा आहे हे जाहीरपणे व्यक्त करण्याकरता तुम्ही पाण्याचा बाप्तिस्मा घेऊ इच्छिता का? असल्यास, याबद्दल तुमच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांशी बोला म्हणजे त्यांना आवश्यक ती व्यवस्था करता येतील.
या समयोचित विभागीय संमेलनाला कोणत्याही परिस्थितीत जातीने उपस्थित राहण्याचा आताच दृढसंकल्प करा. “जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य.” तेव्हा, या दोन्ही दिवसांच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी जरूर हजर राहा.—स्तोत्र १२८:१.