वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९९ पृ. २
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या अपेक्षा शिकण्यास लोकांना मदत करणारे नवीन साधन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • “कोणी मार्ग दाखविल्याखेरीज मला कसे समजणार?”
    आमची राज्य सेवा—२०००
  • अभ्यास सुरू करण्याकरता तुम्ही अपेक्षा माहितीपत्रकाचा उपयोग करता का?
    आमची राज्य सेवा—२००२
  • देवाकडून आनंदाची बातमी! या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग पुनर्भेट घेण्यास व बायबल अभ्यास सुरू करण्यास केला जाऊ शकतो
    आमची राज्य सेवा—२०१३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९९
km ७/९९ पृ. २

प्रश्‍न पेटी

◼ बाप्तिस्मा होण्याआधी नवीन व्यक्‍तीसोबत कोणकोणत्या पुस्तकांचा अभ्यास करावा?

यहोवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेण्याआधी, प्रत्येक व्यक्‍तीने अचूक ज्ञान घेतले पाहिजे. (योहा. १७:३) देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक, या दोन्ही प्रकाशनांतून त्या व्यक्‍तीला हे आवश्‍यक ज्ञान मिळू शकते. सहसा अपेक्षा माहितीपत्रकातून आधी अभ्यास केला जातो. पण अभ्यास जर ज्ञान पुस्तकातून सुरू झाला असेल तर हे पुस्तक संपल्यानंतर अपेक्षा माहितीपत्रकातून अभ्यास करावा. हे का आवश्‍यक आहे?

अपेक्षा माहितीपत्रकात बायबलच्या मूलभूत शिकवणुकींचा सारांश आहे. आधी यातून अभ्यास केल्यास, अभ्यास करणाऱ्‍या व्यक्‍तीला यहोवाला आनंदित करण्यासाठी आपल्याकडून काय अपेक्षित आहे याचे मूलभूत ज्ञान मिळेल. पण या माहितीपत्रकाचा नंतर अभ्यास केल्यास, ज्ञान पुस्तकात शिकलेल्या गोष्टींना उजाळा मिळेल. आधी असो वा नंतर, अभ्यास करताना विद्यार्थ्याला सहायक वचने उघडून पाहण्याचे व त्यांवर मनन करण्याचे प्रोत्साहन द्या. चित्रांकडे लक्ष वेधण्याचे विसरू नका कारण एखादा मुद्दा स्पष्ट करण्यात चित्रे अतिशय परिणामकारक असतात.—टेहळणी बुरूज, जानेवारी १५, १९९७ अंकातील १६-१७ पृष्ठांवरील माहिती पाहा.

या दोन्ही प्रकाशनांतून अभ्यास पूर्ण केल्यानंतर, बाप्तिस्म्याच्या तयारीसाठी वडील ज्या प्रश्‍नांची उजळणी घेतात त्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे या विद्यार्थ्याला देता येतील. अशावेळेस, आणखी कोणत्या पुस्तकातून पुन्हा औपचारिक पद्धतीने अभ्यास घेण्याची जरूर नाही; अर्थात अभ्यास घेणाऱ्‍याने पुढेही या व्यक्‍तीच्या आध्यात्मिक प्रगतीकडे जातीने लक्ष देत राहिले पाहिजे.—टेहळणी बुरूज, जानेवारी १५, १९९६ अंकातील १४ आणि १७ वरील माहिती पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा