वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९९ पृ. २
  • जुलैसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जुलैसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • उपशिर्षक
  • जुलै ५ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै १२ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै १९ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै २६ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९९
km ७/९९ पृ. २

जुलैसाठी सेवा सभा

जुलै ५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ६ (१६)

१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. मार्च महिन्याच्या सबंध देशाच्या आणि स्थानिक मंडळीच्या क्षेत्र सेवा अहवालाविषयी सांगा. ईश्‍वरशासित वृत्त.

२० मि: “प्रार्थना करा, यहोवाकडे साहाय्य मागा.” एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍नोत्तरांनी लेखाची चर्चा सुरू करा. वेगवेगळ्या प्रकारच्या मनःपूर्वक प्रार्थना सेवेत सफल होण्याकरता कशा महत्त्वाच्या आहेत हे समजावून सांगा. प्रार्थना केल्यामुळे सेवेत कशी मदत मिळाली याविषयी अनुभव सांगण्याचे श्रोत्यांना निमंत्रण द्या.—टेहळणी बुरूज, ऑक्टोबर १५, १९९६, पृष्ठ ३२ पाहा.

१५ मि: माहितीपत्रकांचा चांगला उपयोग करा. भाषण व प्रात्यक्षिके. माहितीपत्रके आपल्या सेवेतील बहुमोल साधने का आहेत हे समजावून सांगा. यांत सर्वसामान्य विषयांवर समर्पक चर्चा केलेली असते, मूलभूत विषयाला धरून संक्षिप्तात माहिती असते आणि बायबलमधील शिकवणुकी सोप्या करून सांगितलेल्या असतात. या महिन्यात कोणती माहितीपत्रके द्यायची आहेत ते सांगा आणि मंडळीकडे ज्या माहितीपत्रकांचा भरपूर साठा आहे ती दाखवा. टेहळणी बुरूज प्रकाशन सूची (इंग्रजी) यात “प्रेझेन्टेशन्स” या विषयाखाली दिलेल्या सूचनांवर आधारित दोन तीन संक्षिप्त सादरता दाखवा.

गीत १८१ (१७) आणि समाप्तीची प्रार्थना.

जुलै १२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १०३ (११)

१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

१५ मि: “पूर्वतयारी केल्याने आनंद मिळतो.” भाषण आणि मुलाखती. क्षेत्र सेवेकरता तयारी करणे का आवश्‍यक आहे आणि तयारी केल्यामुळे सेवेत अधिक आनंद कसा मिळू शकतो हे सांगा. (प्रशाला मार्गदर्शक पुस्तक, पृष्ठ ३९ वर परिच्छेद १-३ पाहा.) दोन किंवा तीन कार्यक्षम प्रचारकांच्या मुलाखती घ्या आणि सेवेला निघण्याआधी ते कोणत्या प्रकारची तयारी करतात आणि यामुळे त्यांना कशाप्रकारे मदत मिळते हे विचारा. सेवेची तयारी करताना युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तकाचा कसा चांगला उपयोग करता येईल यासंबंधी टेहळणी बुरूज, एप्रिल १५, १९९३, (इंग्रजी) पृष्ठ ३० वर दिलेला अनुभव सांगा.

२० मि: “‘मुद्द्‌याचं’ बोलूया!” श्रोत्यांसोबत चर्चा आणि प्रात्यक्षिके. घरमालकाने आपले ऐकून घ्यावे म्हणून काय आणि कसे बोलावे याबद्दल सदर लेखात सुचवलेल्या प्रत्येक प्रस्तावनेची उजळणी करा. अनुभवी प्रचारकांकडून परिणामकारक ठरलेल्या वेगवेगळ्या प्रस्तावनांची प्रात्यक्षिके करवून घ्या. श्रोत्यांना काही सहायक मुद्दे सुचवायचे असतील तर तसे करण्याची त्यांना विनंती करा; तुमच्या क्षेत्रात कोणती पद्धत सर्वात परिणामकारक आहे हे दाखवणारे प्रेरणादायी अनुभव सांगा.

गीत १८३ (२७) आणि समाप्तीची प्रार्थना.

जुलै १९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ३१ (२२)

१० मि: स्थानिक घोषणा.

१५ मि: स्थानिक गरजा.

२० मि: संघटनेचे सदस्य होणे आवश्‍यक आहे का? युक्‍तिवाद पुस्तकातील पृष्ठे २८०-४ वर दिलेल्या माहितीवर श्रोत्यांसोबत चर्चा. आपल्याला बऱ्‍याच वेळा असे लोक भेटतात, जे राज्याचा संदेश मान्य करतात पण कोणत्याही धार्मिक संघटनेचे “मेम्बर होण्याची” त्यांची इच्छा नसते. “संघटना” या शब्दाची व्याख्या काय, आणि यहोवाच्या दृश्‍य संघटनेची सात वैशिष्ट्ये कोणती यावर चर्चा करा. ही संघटना इतर संघटनांपेक्षा कोणत्या अर्थाने वेगळी आहे आणि तिच्यात सहभागी झाल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळतात यावर खुलासा करा.

गीत १८९ (४) आणि समाप्तीची प्रार्थना.

जुलै २६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १८४ (२८)

१० मि: स्थानिक घोषणा. जुलै महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची सर्वांना आठवण करून द्या. प्रश्‍न पेटी.

१५ मि: आपण शिष्य बनवत आहोत का? सेवा पर्यवेक्षक एखाददोन सेवा सेवकांसोबत टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १५, १९९६, पृष्ठे १९-२२ वर दिलेल्या मुद्द्‌यांची चर्चा करतात. आपल्या क्षेत्रातल्या योग्य जनांना शोधून त्यांना शिष्य बनवणे का आवश्‍यक आहे हे बायबलमधून पटवून द्या. (मत्त. १०:११) हे लोक या जगातली दुष्टता आणि अधार्मिकता पाहून उसासे टाकत आहेत आणि यहोवाचा क्रोधाचा दिवस येण्याआधी ते त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात उत्सुक आहेत. (यहे. ९:४; सफ. २:२, ३) यांतच काहीजण “सार्वकालिक जीवनाकडे योग्य कल असलेले” आहेत. (प्रे. कृत्ये १३:४८, NW) आपल्याला शिष्य बनवण्याचे, अर्थात लोकांना येशूने आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी शिकवण्याचे कार्य नेमून देण्यात आले आहे. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) घरोघरचे कार्य, अनौपचारिक साक्षकार्य आणि रस्त्यावरचे कार्य यांद्वारे आपण आपल्याला भेटलेल्या व्यक्‍तीच्या मनात आस्था निर्माण करू शकतो पण त्यानंतर जेव्हा आपण पुनर्भेट करतो आणि बायबल अभ्यास चालवतो, तेव्हा आपण शिष्य बनवण्याचे कार्य करत असतो. हे कसे करता येईल यासंबंधी काही खास व्यवहारोपयोगी सूचना द्या.

२० मि: “आपल्या देवाच्या भवनाकडे आपले दुर्लक्ष होता कामा नये.” आमची राज्य सेवा, जानेवारी १९९७ अंकातील पुरवणी पृष्ठे ३-६ वरील माहितीवर आधारित वडिलांचे उत्साहपूर्ण भाषण. स्वतःचे राज्य सभागृह असणे किती महत्त्वाचे आहे या विषयावर मंडळीला प्रोत्साहन द्या; आणि मंडळीकडे स्वतःचे राज्य सभागृह आधीपासूनच असल्यास ते सुस्थितीत ठेवण्याचे आणि सबंध देशातील मंडळ्यांना राज्य सभागृहे बांधण्याकरता मदत करण्याचे प्रोत्साहन द्या. पुरवणीतील पृष्ठ ६ वरील पेटीत दिलेली माहिती देखील विचारात घ्या.

गीत ११८ (२०) आणि समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा