जूनसाठी सेवा सभा
जून ७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ४५ (६)
१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. ईश्वरशासित वृत्त.
१५ मि: “यहोवा आपल्याला शिकवतो.” एका मिनिटाच्या आत प्रस्तावना करून प्रश्नोत्तरांनी लेखाची चर्चा सुरू करा. ईश्वरशासित सेवा प्रशाला, पायनियर सेवा प्रशाला, राज्य सेवा प्रशाला इत्यादी प्रशालांपासून कोणते लाभ झाले ते श्रोत्यांना विचारा. या प्रशालांमुळे सेवेत अधिक कुशल होण्यास यहोवाच्या लोकांना कशी मदत होते यावर भर द्या.
२० मि: “वेळेचा सदुपयोग करा.” मंडळीचे पुस्तक अभ्यास संचालक आणि एकदोन प्रचारकांमध्ये चर्चा; यात, क्षेत्र सेवेत शक्य तितका अधिक सहभाग घेण्यास आपण वेळ कसा काढतो याबद्दल प्रचारक सांगतात. सुसाध्य आराखडा असणे का महत्त्वाचे आहे याचे स्पष्टीकरण देऊन प्रत्येकाने असा एक आराखडा तयार करावा यावर ते भर देतात. सेवा उशिरा सुरू करणे, आधीपासून नीट योजना न करणे किंवा सेवेत असताना इतर गोष्टींमध्ये अधिक वेळ खर्च करणे यांसारख्या वेळखाऊ गोष्टी ते कसे टाळतात याविषयी ते सांगतात. वेळेचा सदुपयोग कसा केला जाऊ शकतो यावर खास मंडळीला समर्पक असणाऱ्या सहायक सूचना द्या.
गीत ४८ (२२) आणि समाप्तीची प्रार्थना.
जून १४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ६३ (१८)
१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.
१५ मि: स्थानिक गरजा.
२० मि: “तुम्ही मदतीचा हात देऊ शकता का?” या भागाची, वडील श्रोत्यांबरोबर चर्चा करतील. ऑक्टोबर ८, १९९५, सावध राहा! (इंग्रजी), पृष्ठे ८-९ वर एक-पालक कुटुंबांना मदत करण्यासंबंधी दिलेल्या सूचनांचा उल्लेख करा. मंडळीतील इतरांकडून मिळालेल्या प्रेमळ मदतीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास काहींना आमंत्रित करा.
गीत ५३ (८) आणि समाप्तीची प्रार्थना.
जून २१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ७२ (२२)
१० मि: स्थानिक घोषणा. मंडळीकडे तरुणांचे प्रश्न किंवा युवक (इंग्रजी) या पुस्तकांचा साठा असल्यास मुलांच्या शाळा सुरू होण्याच्या बेतात असताना या पुस्तकांचा प्रभावीपणे उपयोग कसा केला जाऊ शकतो ते दाखवा.
१७ मि: व्हिडिओ आणि साऊंड ड्रामा यांचा चांगला उपयोग करा. संस्थेने पुरवलेल्या ७ व्हिडिओंचा आणि ९ नाटकांच्या कॅसेट्सचा आपल्याला अधिक चांगला उपयोग करता येईल का? यापैकी प्रत्येक व्हिडिओ आणि साऊंड ड्रामा तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने पाहिला आणि ऐकला आहे का? हा भाग सादर करणाऱ्याने, या व्हिडिओ आणि नाटकांची नावे सांगावीत आणि त्यांमुळे आपले बायबलचे वाचन कसे सुधारते, आध्यात्मिकरित्या आपण कसे मजबूत होतो आणि सत्याविषयी उत्तम साक्ष कशी दिली जाऊ शकते ते सांगा. एखाददोन ऑडिओ कॅसेट्समधील काही भाग श्रोत्यांना ऐकवा. आपल्या कुटुंबाला ज्यातून खास उत्तेजन मिळाले किंवा नवीन लोकांचा संघटनेशी परिचय करून देण्यासाठी कोणता व्हिडिओ किंवा साऊंड ड्रामा विशेष प्रभावी ठरला हे श्रोत्यांना विचारा. आणि यांमुळे उत्तम परिणाम निष्पन्न झाल्याची काही उदाहरणे सांगा. (१९९९ वार्षिक-पुस्तक, पृष्ठे ५१-२) व्हिडिओ आणि साऊंड ड्रामा यांचा चांगला उपयोग करण्याचे उत्तेजन सर्वांना द्या.
१८ मि: “तुम्ही केवळ बाह्यस्वरूप पाहता का?” भाषण आणि चर्चा. आपल्याला भेटणाऱ्या लोकांबद्दल आपण तडकाफडकी मते का बनवू नयेत यावर जोर द्या. लोकांबद्दल चुकीचे मत बनवून त्यांना शिक्षेस पात्र समजणाऱ्या योनाला यहोवाने कोणता धडा शिकवला याची थोडक्यात उजळणी करा. (ऑगस्ट १५, १९९७, टेहळणी बुरूज, पृष्ठे २१-२, परिच्छेद १७-१९ पाहा.) क्षेत्रात भेटलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या लोकांबद्दल श्रोत्यांना विचारा; एक सकारात्मक दृष्टिकोन बाळगून न्याय करण्याची बाब यहोवाच्या हातात ते कसे सोपवून देतात याविषयी ते बोलतात.
गीत ७७ (९) आणि समाप्तीची प्रार्थना.
जून २८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ८५ (११)
१२ मि: स्थानिक घोषणा. सर्वांना आपला जूनचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. जुलैची साहित्य सादरता काय आहे त्याची उजळणी करा. मंडळीकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेली माहितीपत्रके दाखवा आणि आपल्या प्रस्तुतीत उपयोग करता येतील अशी एकदोन वैशिष्ट्ये सांगा. यासाठी चांगली तयारी केलेले एक प्रात्यक्षिक दाखवा.
१३ मि: यहोवा आपल्या लोकांचा छळ का खपवून घेतो? यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्घोषक (इंग्रजी), पृष्ठे ६७६-७ वर आधारित वडिलांचे भाषण. येशूने भाकीत केल्याप्रमाणे ‘सर्व राष्ट्रे आपला द्वेष करतात.’ (मत्त. २४:९) आपण सेवेत सहभाग घेतो, सत्यात नसलेल्या नातेवाईकांसोबत उठतो-बसतो किंवा कामाच्या ठिकाणी अथवा शाळेत बाहेरच्या लोकांशी आपला संपर्क येतो तेव्हा आपला विरोध होण्याची शक्यता आहे. यहोवा हा छळ किंवा विरोध का होऊ देतो, आणि आपण दाखवत असलेल्या सहनशील वृत्तीमुळे शेवटी आपल्याला कसे आशीर्वादच मिळतील हे श्रोत्यांना प्रोत्साहन मिळेल अशाप्रकारे वक्त्याने समजावून सांगावे.
२० मि: जेथे कोठे लोक आहेत तिथे जा! १९९७ वार्षिक-पुस्तक (इंग्रजी), पृष्ठे ४२-८ यावर आधारित भाषण. घरोघरच्या साक्षीकार्यात नियमित सहभाग घेताना कोणत्याही वेळी आणि कोठेही अनौपचारिक साक्ष देण्याची संधी आपण उत्सुकतेने शोधत असतो. प्रवास करताना, रस्त्यांवर अथवा समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना; वाहन तळांवर किंवा ट्रक सहसा थांबतात त्या ठिकाणी तसेच टेलिफोनद्वारे आणि पत्र लिहिण्याद्वारे काही जणांना यशस्वीरित्या अनौपचारिक साक्ष कशी देता आली हे दाखवण्यासाठी वार्षिक-पुस्तकातील अनुभव सांगा. वेळ असल्यास, श्रोत्यांना स्वतःचे काही अनुभव सांगण्याची विनंती करा. जेथे कोठे लोक भेटतात तेथे त्यांना साक्ष देण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घेण्याचे उत्तेजन सर्वांना द्या.
गीत ७५ (६) आणि समाप्तीची प्रार्थना.