वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९९ पृ. १
  • इतरांना स्वतःचे हित साधण्यास शिकवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इतरांना स्वतःचे हित साधण्यास शिकवा
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या मार्गदर्शनाचा तुम्ही फायदा करून घेत आहात का?
    आमची राज्य सेवा—२०००
  • आपण घरी ईश्‍वरी भक्‍ती आचरण्याची गरज आहे
    उपासनेतील ऐक्य
  • कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा
    कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा
  • कौटुंबिक सौख्यानंदाचे एखादे रहस्य आहे का?
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९९
km ५/९९ पृ. १

इतरांना स्वतःचे हित साधण्यास शिकवा

१ सगळ्यांनीच स्वतःचे हित साधावे असे यहोवाला वाटते. (यश. ४८:१७, पं.र.भा.) आपल्याला कुठल्या गोष्टीमुळे खरा आनंद मिळेल याची कल्पना त्याला आहे. लोकांनी आपल्या आज्ञांचे पालन करून संकटप्रसंगे चुकवावीत आणि जीवनाचा आनंद घ्यावा अशी त्याची प्रांजळ इच्छा आहे. आज, देवाने दाखवलेल्या मार्गावर जीवनाची वाटचाल केल्यामुळे आपण सर्वजण मोठ्या प्रमाणात स्वतःचे हित साधत आहोत. (स्तोत्र ३४:८) पण, इतरांनाही स्वतःचे हित साधण्यास आपण कसे शिकवू शकतो?

२ लोकांना नेमके काय हवे आहे? तुमच्या परिसरातील लोकांच्या मुख्य चिंता कोणत्या आहेत? आपल्या घराची सुरक्षितता, विवाहाची मजबुती, मुलांचे भविष्य आणि अशा इतर बाबींची त्यांना चिंता नव्हे काय? समस्या उद्‌भवतात तेव्हा मदतीसाठी ते कोणाकडे धाव घेतात? कदाचित ते स्वतःवरच किंवा स्व-साह्‍य कार्यक्रमांवर अथवा इतरांच्या मार्गदर्शनावर अवलंबून असतील. पण, या मार्गांनी स्वतःचे हित साधण्याच्या प्रयत्नांत, दिवसागणिक बदलणाऱ्‍या अव्यावहारिक कल्पनांमुळे अनेकजण पार गोंधळून जातात. अशा लोकांना, आपण पटवून सांगितले पाहिजे, की देवाच्या वचनात सापडणारे मार्गदर्शन कितीतरी पटीने चांगले आहे. (स्तोत्र ११९:९८) असे करण्याचा एक मार्ग म्हणजे, बायबलचा अभ्यास करण्याचा आणि त्यातील सल्ला लागू करण्याचा प्रयत्न केल्यास ते आता देखील आपल्या जीवनाचा दर्जा कसे सुधारू शकतात हे त्यांना दाखवून देणे.—२ तीम. ३:१६, १७.

३ सुधारित कौटुंबिक जीवन: कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी इफिसकर ५:२२-६:४ यात दिलेला प्रेरित सल्ला किती परिणामकारक आहे याची अनेकांना अद्याप प्रचिती आलेली नाही. हीच गोष्ट, चक्क दहा वर्षे एकत्र संसार केल्यानंतर वेगळे होण्याच्या निर्णयावर येऊन पोहंचलेल्या एका जोडप्याच्या बाबतीत खरी ठरली. पण, त्या पत्नीसोबत बायबल अभ्यास सुरू करण्यात आला आणि वैवाहिक जीवनावरील बायबलच्या सिद्धान्तांविषयी तिला शिकवण्यात आले. आपल्या जीवनात बायबलचे सिद्धान्त लागू केल्यामुळे तिच्यात झालेला बदल पतीच्या पटकन लक्षात आला आणि तोही अभ्यास करू लागला. त्यानंतर त्याने काय म्हटले ते पाहा: “आता आम्हाला खऱ्‍या आनंदी कौटुंबिक जीवनाचे रहस्य उलगडले आहे.”

४ खरे उद्देशपूर्ण जीवन: अमली पदार्थांचे व्यसन जडलेल्या एका तरुणाने साक्षीदारांची मदत घेतली तेव्हा यहोवाला त्याची किंमत आहे हे त्याला शिकवण्यात आले. त्यानंतर त्याने म्हटले: ‘मनुष्यासाठी सृष्टीकर्त्याचा एक उद्देश आहे आणि ज्यांच्यावर त्याचा अनुग्रह आहे अशांसाठी त्याने सार्वकालिक जीवन राखून ठेवले आहे हे मी शिकलो. हे जाणून मला किती आनंद झाला याची कल्पना तुम्ही करू शकणार नाहीत. आज मला उत्तम आरोग्य, मनाची शांती आणि देवाबरोबर एक घनिष्ठ नातेसंबंध लाभला आहे.”

५ देवाच्या वचनातून मिळणाऱ्‍या व्यावहारिक मदतीचा आज सगळ्यांनाच लाभ होऊ शकतो. मार्गदर्शक म्हणून बायबलचा उपयोग केल्यामुळे जगाच्या कोणत्याही मार्गापेक्षा, देवाने दाखवलेला मार्ग सगळ्यात उत्तम आहे याची खात्री आपल्याला पटते. (स्तोत्र ११६:१२) इतरांना हा संदेश सांगण्याचा तसेच आपले स्वतःचे हित कसे साधावे हे शिकवण्याचा एक विशेषाधिकार आपल्याला लाभला आहे. आणि असे करत राहिल्यामुळे अनेक उत्तम परिणाम निप्पन्‍न होतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा