वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९९ पृ. १
  • पूर्वयोजना करा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पूर्वयोजना करा!
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • उन्हाळ्याकरता तुमच्या काय योजना आहेत?
    आमची राज्य सेवा—१९९६
  • “तुझ्या सर्व योजना तो पूर्ण करो”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • वेळेचा सदुपयोग करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • ईश्‍वरशासित कार्यहालचालींचा उन्हाळ्यात पाठलाग करीत राहा
    आमची राज्य सेवा—१९९४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९९
km ५/९९ पृ. १

पूर्वयोजना करा!

१ आपल्या आध्यात्मिक गरजा तृप्त करण्यासाठी यहोवाची संघटना, ईश्‍वरशासित कार्यहालचालींचा एक नियमित कार्यक्रमच आखत असते. आणि त्याच्याप्रती असलेली आपली कृतज्ञता, आयोजित केलेल्या सर्व कार्यहालचालींचा अर्थात प्रवासी पर्यवेक्षकांच्या भेटी, संमेलने आणि अधिवेशने तसेच मंडळीतर्फे आयोजित केलेल्या इतर खास कार्यहालचालींचा पुरेपूर लाभ घेण्याची प्रेरणा आपल्याला देते. (मत्त. ५:३) पण, काहीजणांना इतर कामांमुळे या आध्यात्मिक तरतुदी चुकवाव्या लागतात. यावर उपाय काय? गैरईश्‍वरशासित कामांमुळे “श्रेष्ठ” गोष्टींकडे दुर्लक्ष होणार नाही याची खात्री आपण कशी करू शकतो?—फिलिप्पै. १:१०.

२ विचारपूर्वक योजना आवश्‍यक: नीतिसूत्रे २१:५ आपल्याला असा सल्ला देते की, “उद्योग्याचे विचार [योजना] समृद्धि करणारे असतात. जो कोणी उतावळी करितो तो दारिद्र्‌याकडे धाव घेतो.” आध्यात्मिक ‘समृद्धिकरिता,’ आयोजित केलेल्या सर्व ईश्‍वरशासित कार्यहालचाली लक्षात ठेवून प्रयत्नपूर्वक पूर्वयोजना करणे जरूरीचे आहे. आपण आपल्या वैयक्‍तिक कार्यहालचाली अशा वेळेसाठी आयोजित कराव्यात जेव्हा आध्यात्मिक आशीर्वादांचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्यास काहीही आड येणार नाही. येणाऱ्‍या दिवसांसाठी आयोजित केलेल्या ईश्‍वरशासित कार्यहालचाली लक्षात न घेता आपल्या वैयक्‍तिक कार्यहालचालींसंबंधी उतावळीने योजना केल्यास आध्यात्मिकरित्या ‘दरिद्री’ होण्याचीच शक्यता आहे.

३ मुळीच चुकवू नका! आपण सगळेच जण भवितव्यासाठी तसेच सुट्ट्यांसाठी, व्यापारी दौऱ्‍यांसाठी, नातेवाईकांना भेटायला जाण्यासाठी आणि अशा इतर अनेकानेक गोष्टींसाठी योजना आखत असतो. पण, एखाद्याला शब्द देण्यापूर्वी किंवा आपल्या योजनांना निश्‍चित स्वरूप देण्यापूर्वी येणाऱ्‍या दिवसांतील ईश्‍वरशासित कार्यहालचालींचा आराखडा पाहा. तुम्ही बाहेर कोठे जाणार असणार आणि नेमक्या त्याच दरम्यान विभागीय पर्यवेक्षक येणार असतील किंवा एखादे संमेलन असेल तर या आध्यात्मिक कार्यक्रमांत तुम्हाला सहभाग घेता यावा म्हणून तुमच्या वैयक्‍तिक कार्यहालचालींमध्ये फेरबदल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. सहसा आपल्या मोठमोठ्या कार्यक्रमांविषयी आपल्याला पुरेशा वेळेआधीच कळवले जाते. शिवाय, मंडळीतर्फे आयोजित केलेल्या कार्यहालचालींची माहिती वडिलांकडून प्राप्त केली जाऊ शकते.

४ अशाप्रकारे, पुढचा विचार केल्याने तसेच अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी पूर्वयोजना केल्याने ‘देवाचे गौरव व स्तुति व्हावी म्हणून नीतिमत्त्वाच्या फळाने आपण भरून जाऊ.’—फिलिप्पै. १:११.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा