सेवेत—पूर्णार्थाने सहभाग घेण्यासाठी कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य
१ पती आणि पत्नी, पालक आणि मुले, एकूण सर्वच कौटुंबिक सदस्यांना ख्रिस्ती सेवेत एकत्र मिळून कार्य करताना, यहोवाच्या नावाचे जाहीरपणे स्तवन करताना पाहणे किती मनोरम आहे! (स्तोत्र १४८:१२, १३) क्षेत्र सेवेत नियमितपणे सहभाग घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबामध्ये एक चांगला नित्यक्रम असण्यास हवा. दर आठवडी सेवेत सहभाग घेण्यासाठी तुमच्या कुटुंबाने एक विशिष्ट दिवस ठरवलेला आहे का? असल्यास, सेवेसाठी नेमक्या काय योजना कराव्यात हे सगळ्यांना माहीत असेल आणि सगळेच जण त्यात पूर्णार्थाने सहभाग घेऊ शकतील.—नीती. २१:५अ, सुबोध भाषांतर.
२ सबंध कुटुंब मिळून सेवेत जायच्या आदल्या दिवशी क्षेत्रात उपयोग कराल त्या प्रस्तुती तुम्ही सर्व मिळून तयार करू शकता. आणि सराव सत्र ठेवल्यामुळे तर आणखीनच फायदा होऊन कुटुंबात सहकार्याची भावना निर्माण होऊ शकते. खरेच, कुटुंब या नात्याने पूर्ण तयारीनिशी क्षेत्र सेवेत सहभाग घेणे अत्यंत फलदायी असू शकते.
३ एक प्रवासी पर्यवेक्षक एका सबंध कुटुंबासोबत नियतकालिक कार्याला गेले होते. त्या कुटुंबातील एका मुलीसोबत घरोघरचे कार्य करत असताना मुलीने त्यांना विचारले: “तुम्ही किती वेळ माझ्यासोबत कार्य करणार आहात?” मग तिने त्यांना खुलासा करून सांगितले, की यानंतर ती तिच्या वडिलांसोबत कार्य करणार होती. तिला आणि तिच्या वडिलांना एकत्र मिळून कार्य करायला फार आवडायचे हेच यावरून दिसत होते. कुटुंबात उत्साहाचा हा केवढा उत्तम आत्मा!
४ काही कुटुंबे, वर्षातील एखादा महिना सहायक पायनियरींग करू शकतात. किंवा कुटुंबातील निदान एखादा तरी सदस्य नियमितपणे सहायक पायनियरींग किंवा नियमित पायनियरींग करू शकतो. उत्तम योजना आणि सहकार्य केल्याने कुटुंबातील सगळेच सदस्य पायनियरींग करणाऱ्या सदस्याला पाठिंबा देऊन सेवेतील आपला व्यक्तिगत सहभाग वाढवू शकतात. या भरीव कार्यामुळे तसेच सेवेतील चांगल्या अनुभवांमुळे कुटुंबाला निश्चितच फायदा होईल.—मला. ३:१०.
५ सुवार्तेच्या कार्यात पूर्णार्थाने सहभाग घेतल्याने यहोवाच्या सेवेत संयुक्त, आवेशी, फलदायी आणि आनंदी राहण्यास कुटुंबांना मदत मिळेल!—पडताळा फिलिप्पै. २:१, २.