एप्रिलसाठी सेवा सभा
एप्रिल ५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५५ (१)
१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. “निर्माणकर्ता (इंग्रजी) पुस्तक सादर करावे का?” याची उजळणी. या वर्षी एप्रिल १८ रोजी होणाऱ्या खास भाषणाला उपस्थित राहण्यासाठी सर्व आस्थेवाईकांना आमंत्रण द्या. भाषणाचा विषय आहे: “देवासोबत आणि शेजाऱ्यासोबत खरी मैत्री.”
१५ मि: “सुवार्तेचा प्रचार उत्सुकतेने करा.” एका मिनिटात लेखाबद्दल थोडक्यात माहिती सांगून प्रश्नोत्तरांनी चर्चा करा. प्रशाला मार्गदर्शक पुस्तक (इंग्रजी), पृष्ठे १९१-२, परिच्छेद १२-१३ वरील माहितीवर आधारित उत्तेजन देऊन समारोप करा.
२० मि: “सेवेत—पूर्णार्थाने सहभाग घेण्यासाठी कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य.” एका कुटुंबाची चर्चा. क्षेत्र सेवा म्हणजे सर्वांनी सहभाग घ्यावयाचा एक नियमित साप्ताहिक नित्यक्रम आहे असे कुटुंबाने का समजावे यावर चर्चा करा. ऑगस्ट १, १९९३, टेहळणी बुरूज, पृष्ठे १०-१२, परिच्छेद ९-१२ यात दिलेल्या उत्तेजनात्मक माहितीची उजळणी करा. आपल्या कुटुंबासाठी साप्ताहिक सेवा कार्याची योजना करण्यात यश कसे मिळाले याविषयी श्रोतेगणांत उपस्थित असलेल्या पालकांना विचारा.
गीत ६७ (२६) आणि समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल १२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ११२ (१६)
१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.
१५ मि: स्थानिक गरजा.
२० मि: “अंत जवळ येत असता अधिक साक्षकार्य करणे.” प्रश्नोत्तरे. प्रचाराच्या कार्यात सहभाग घेण्याची कधी कल्पनाही न केलेल्या परंतु राज्याच्या संदेशाचा प्रसार करण्याची निकड जाणून सध्या नियमितपणे प्रचार कार्यात सहभाग घेणाऱ्या एक किंवा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या. वेळ असल्यास, जेथे कोठे लोक आहेत तेथे जाऊन प्रचारकांनी साक्ष देण्यास अधिक प्रयत्न कसे केले आहेत हे दाखवण्यासाठी १९९७ वार्षिकपुस्तक (इंग्रजी), पृष्ठे ४२-८ वरील संक्षिप्त अनुभव सांगा.
गीत ९३ (२०) आणि समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल १९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ७९ (६)
५ मि: स्थानिक घोषणा.
१० मि: “तुमची एक स्थायी मागणी आहे का?” नियतकालिके हाताळणाऱ्या वडिलांनी किंवा सेवा सेवकाने शक्यतो भाषण द्यावे. प्रत्येक महिन्याला किती नियतकालिके मिळतात आणि अहवालानुसार सरासरी किती नियतकालिकांचे वाटप केले जाते याची मंडळीला माहिती द्या. आपण नियतकालिके वाया जाऊ देऊ नयेत. जुन्या नियतकालिकांचेही कसे वितरण केले जाऊ शकते याविषयी काही सल्ले द्या.—पाहा जुलै १९९३ आमची राज्य सेवा, पृष्ठ १.
३० मि: “पायनियरींग—वेळेचा सदुपयोग!” प्रश्नोत्तरे. परिच्छेद ५-७ मध्ये दिलेले अनुभव सांगण्यासाठी तीन बांधवांना नियुक्त करा. ज्यांना सहायक किंवा नियमित पायनियर सेवा करणे शक्य आहे अशांना अर्ज भरण्याचा विचार करण्याचे प्रोत्साहन देऊन समारोप करा. मंडळीच्या सेवा समितीतील कोणत्याही सदस्याकडून अर्ज प्राप्त केले जाऊ शकतात. मे महिन्यात सहायक पायनियरींग करण्यासाठी अर्ज देण्यास अजूनही उशीर झालेला नाही हे सांगा.
गीत १६५ (२०) आणि समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल २६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ७० (२२)
१० मि: स्थानिक घोषणा. सर्वांना एप्रिल महिन्याचा आपला क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याची आठवण करून द्या. मे महिन्यात सहायक पायनियरींग करणार असलेल्या सर्वांची नावे सांगून इतरांनाही अर्ज भरण्याचे उत्तेजन द्या. चालू नियतकालिके सादर करण्यासाठी काही मदतदायी सूचना द्या.—पाहा ऑक्टोबर १९९६ आमची राज्य सेवा, पृष्ठ ८.
१७ मि: “मी काय करावं?” श्रोत्यांसोबत सदर लेखाची संक्षिप्त उजळणी करा; कॉलेज झाल्यानंतर पुढे काय करण्याचा विचार आहे याविषयी एक किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी आपल्या पालकासोबत चर्चा करत असल्याचे प्रात्यक्षिक दाखवा. जुलै १९९८ आमची राज्य सेवा, पृष्ठ ४ वर दिलेल्या माहितीची ते सर्वजण उजळणी करतात. टेहळणी बुरूज नियतकालिकातल्या फेब्रुवारी १, १९९६ अंकातील पृष्ठ १४ वर आणि डिसेंबर १, १९९६ अंकातील पृष्ठे १७-१९ वर दिलेल्या उत्तेजनात्मक माहितीच्या एकवाक्यतेत पालक सल्ला देतात. आता पायनियरांच्या तासांच्या मागणीत कपात झाल्यामुळे शिक्षण पूर्ण करता-करता किशोरवयीन मुलगा/मुलगी पायनियरींग करण्याच्या शक्यतेचा विचार करतो/करते.
१८ मि: सहायक पायनियरांची मुलाखत घ्या. या महिन्यात सहायक पायनियरींग करणाऱ्या शिवाय या आधी सहायक पायनियरींग केलेल्या काही प्रचारकांची सेवा पर्यवेक्षक मुलाखत घेतात. त्यांना मिळालेले काही आशीर्वाद, त्यांनी साध्य केलेल्या गोष्टी आणि वर्षभरात निदान एकदोनदा तरी सहायक पायनियरींग करण्यास ते इतके उत्सुक का असतात याविषयी त्यांना दोनचार शब्द बोलायला सांगा.
गीत ६९ (९) आणि समाप्तीची प्रार्थना.