“मी काय करावं?”
१ प्रौढावस्थेत पदार्पण करणारा एक युवक या नात्याने तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की, “आता आयुष्यात पुढे मी काय करावं?” ख्रिस्ती युवक यहोवाच्या सेवेतील आपला सहभाग वाढवू इच्छितात. पण, भौतिक गरजांची तरतूद करणे यांसारख्या प्रौढावस्थेतील इतर जबाबदाऱ्या पेलताना सेवेतील सहभाग वाढवणे कसे शक्य आहे? हा प्रश्न अगदी चुटकीसरशी सुटणे शक्य नाही.
२ जगाची एकंदर आर्थिक परिस्थिती पाहून आणि भविष्याची चित्रे पाहून काही युवक चिंताग्रस्त होतात. ‘मी आणखीन शिक्षण घ्यावं का? की लगेच पूर्ण-वेळेची सेवा सुरू करावी?’ अशा विचारात ते पडतात. पण, ‘माझ्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती?’ या प्रश्नाचे अगदी प्रामाणिक उत्तर दिल्यास योग्य निर्णय घेण्यास एखाद्या व्यक्तीला मदत होऊ शकते. म्हणून, आपले हेतू काय यांचे परीक्षण करणेही जरूरीचे आहे.
३ तुमच्या तारुण्याच्या दिवसांत तुम्ही कोणत्या गोष्टीचा सर्वाधिक विचार केला आहे? आर्थिक लाभ हाच तुमचा एकमेव चिंतेचा विषय आहे का? की राज्य आस्थांना बढावा देण्यासाठी तुम्ही खरोखरच आपले जीवन खर्ची घालू इच्छिता? विद्यापीठातून मिळवलेल्या पदवीमुळे चांगली नोकरी लागेलच याची आजकाल शाश्वती नसते. पर्यायी उपाय म्हणून अनेकांनी शिकाऊ या नात्याने काम करून जास्त मागणी असलेली कला-कौशल्ये शिकून घेतली आहेत, किंवा कमीत कमी वेळ घेणारे काही व्यावसायिक किंवा तांत्रिक प्रशाला प्रशिक्षण घेतले आहे अथवा अल्पावधीचे कॉलेज कोर्सेस केले आहेत.
४ यहोवाच्या शब्दावर भरवसा ठेवा: जे लोक आपल्या जीवनात राज्य आस्थांना प्राधान्य देतात त्यांच्या भौतिक गरजा यहोवा परमेश्वर तृप्त करील या त्याच्या आश्वासनाचा विचार करणे अत्यावश्यक आहे. (मत्त. ६:३३) हे काही पोकळ आश्वासन नव्हे. सेवा प्रशिक्षण प्रशालेस उपस्थित राहणाऱ्या अनेक बांधवांनी सत्य शिकण्यापूर्वी कॉलेजमधून पदव्या मिळवल्या. पण, ते कोणती नोकरी करत होते? त्यांच्यापैकी मोजकेच जण त्या करिअरमध्ये होते ज्यासाठी त्यांनी शिक्षण घेतले होते. तर बाकीचे अनेक जण पायनियरींग करता करता काही छोटी-मोठी कामे करून आपल्या आर्थिक गरजा बऱ्यापैकी भागवत होते. अशाप्रकारे ख्रिस्ती सेवेतील आपला सहभाग वाढवल्यामुळे पैशांत मोजता येणार नाही इतके मोठे आशीर्वाद सध्या त्यांना लाभत आहेत.
५ महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर पुढे काय करावे हे ठरवताना सर्व बाबी तोलून पाहा आणि त्यासोबतच आपल्या हेतूंचेही काळजीपूर्वक परीक्षण करा. निर्णय घेताना एक समतोल दृष्टिकोन राखता यावा म्हणून एप्रिल ८, १९९८ च्या सावध राहा! अंकातील पृष्ठे २५-२७ वर दिलेली माहिती विचारात घ्या. तुमच्या पालकांशी, मंडळीतील वडिलांशी, तुमच्या विभागीय पर्यवेक्षकांशी आणि तुमच्या क्षेत्रातल्या यशस्वी पायनियरांशी याविषयी बोला. असे केल्याने आयुष्यात पुढे काय करावे याबाबतीत एक सुज्ञ निर्णय घेण्यास तुम्हाला मदत मिळेल.—उप. १२:१, १३.