वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९८ पृ. १
  • ऑगस्ट महिना एक खास महिना ठरेल का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्ट महिना एक खास महिना ठरेल का?
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • वीस हजार!
    आमची राज्य सेवा—१९९८
  • तुम्ही नियमितपणे राज्याचा प्रचार करता का?
    आमची राज्य सेवा—२०००
  • ऐतिहासिक कामगिरीचा ऑगस्ट महिना! एका नवीन पत्रिकेचे संपूर्ण जगभरात वाटप
    आमची राज्य सेवा—२०१४
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km ८/९८ पृ. १

ऑगस्ट महिना एक खास महिना ठरेल का?

१ यहोवाच्या लोकांसाठी सन १९६३ एक खास वर्ष होते. का ते तुम्हाला माहीत आहे का? कारण त्या वर्षी, जगभरातील प्रचारकांनी दहा लाखांचे शिखर गाठले होते. तुम्ही जर त्या काळी सत्यात होतात तर तुम्हाला आठवत असेल, इतक्या लोकांना राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करताना पाहून आपण किती उत्तेजित झालो होतो! आज केवळ संयुक्‍त संस्थानांतच तितके प्रचारक आहेत. तथापि, एकट्या संयुक्‍त संस्थानांत दरमहा सरासरी ९०,००० प्रचारक सेवेत सहभाग घेतल्याचा अहवाल देत नाहीत. भारताचीही स्थिती अशीच आहे.

२ आव्हान स्वीकारा: ऑगस्ट महिन्यात संयुक्‍त संस्थानांत दहा लाख प्रचारकांचे एक अभूतपूर्व शिखर गाठण्याचा प्रयत्न संस्था करत आहे. २०,००० प्रचारकांचे शिखर गाठणे हे भारताचे ध्येय आहे. आपले प्रयत्न यशस्वी झाल्यास येथे देखील ऑगस्ट महिना एक खास महिना ठरेल! प्रत्येकाने आपापली भूमिका पार पाडली तर आपण आपले ध्येय गाठू शकतो.

३ ज्यांनी सुट्टीला जाण्याचा बेत केला आहे ते जाण्यापूर्वी सेवेत काही वेळ खर्च करू शकतात. सुट्टीला गेल्यावर भेटणाऱ्‍या लोकांना साक्ष देता यावी म्हणून पत्रिका, माहितीपत्रके किंवा नियतकालिके यांचा साठा आपल्यासोबत घ्या. तसेच, तुम्ही जेथे सुट्टीला जाता तेथील स्थानिक प्रचारकांसह सेवेत सहभाग घेऊ शकता.

४ तुम्ही शारीरिकरित्या दुर्बल असता, अगदी तेव्हा देखील सेवेत सहभाग घेणे तुम्हाला शक्य आहे. कदाचित डॉक्टरांना, नर्सेसना किंवा तुम्हाला भेटायला येणाऱ्‍या लोकांना तुम्ही साक्ष देऊ शकता. पत्राद्वारे किंवा टेलिफोनद्वारेही तुम्ही साक्ष देऊ शकता.

५ ऑगस्ट महिन्यात क्षेत्र सेवेत सहभाग घेण्यासाठी इतरांकडून साहाय्य मिळाल्यास काहींना याचा आनंदच होईल. हे साहाय्य पुरवण्यासाठी वडील, सेवा सेवक आणि पुस्तक अभ्यास संचालकांनी व्यवस्था करावी. कुठल्याही परिस्थितीत महिन्याच्या अखेरीस आपला क्षेत्र सेवा अहवाल तत्परतेने देण्याचे विसरू नका, जेणेकरून ऑगस्ट महिन्यात प्रचारक म्हणून तुम्ही गणले जाल.

६ विशेषाधिकार जिवापाड जपा: आपली सेवा एक “चांगली ठेव” आहे. (२ तीम. १:१४) सुवार्तेचा प्रचार करण्याचा जो विशेषाधिकार आपल्याला दिला आहे त्याची आपण कदर करतो. (१ थेस्सलनी. २:४) यहोवाने आपल्यासाठी जे काही केले आहे त्याचा आपण विचार करतो तेव्हा, या अतिमहत्वपूर्ण कार्यात केवळ एकदोन महिने नव्हे तर वर्षभर, अखंड सहभाग घेण्यास आपण प्रवृत्त झाले पाहिजे. कोणत्याही गोष्टीला नियमित प्रचार कार्याच्या आड येऊ देऊ नये. आपण ऑगस्टचा हा महिना यहोवाच्या सेवेतील एक खास महिना बनवू आणि येथून पुढे न चुकता प्रत्येक महिना त्याच्याविषयी साक्ष देण्याचा निर्धार करू!—स्तोत्र ३४:१.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा