आपल्या शेजाऱ्यांना सुवार्ता ऐकवण्याची गरज आहे
१ देवाची अशी इच्छा आहे की, “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.” (१ तीम. २:४) “सर्व माणसांचे” यात आपले शेजारीही आलेच. त्यांना सुवार्ता ऐकवायची असल्यास आपल्या प्रस्तुती वैविध्यपूर्ण असणे व भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आस्था लक्षात घेणे आवश्यक आहे. (१ करिंथ. ९:१९-२३) “सार्वकालिक जीवनाकडे योग्य कल असलेल्या” लोकांच्या अंतःकरणाप्रत पोहंचण्यास मदत व्हावी म्हणून यहोवाच्या संस्थेने आपल्याला निरनिराळी साधने पुरवली आहेत. (प्रे. कृत्ये १३:४८; NW) आपल्या शेजाऱ्यांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्यांदरम्यान विविध माहितीपत्रकांचा उपयोग कसा करता येईल ते आपण पाहू या.
२. सादर करण्याजोगी माहितीपत्रके: विशिष्ट माहितीपत्रके प्रस्तुत करताना उपयुक्त ठरतील अशा सहायक सूचना खाली सूचीबद्ध केल्या आहेत. प्रत्येक सूचनेत पुढील गोष्टी अंतर्भूत आहेत (१) संभाषण सुरू करण्यासाठी एक विचारप्रवर्तक प्रश्न, (२) माहितीपत्रकात बोलण्याजोगे मुद्दे जेथे आढळतील त्याचा संदर्भ व (३) चर्चेदरम्यान वाचता येईल असे एखादे उचित शास्त्रवचन. व्यक्तीच्या प्रतिसादानुसार उर्वरित प्रस्तुती तुम्ही आपल्या स्वतःच्या शब्दांत मांडू शकता. अधिकतर माहितीपत्रकांसाठी आमची राज्य सेवा याच्या मागील अंकाचा उल्लेख केलेला आहे; या अंकात माहितीपत्रके सादर करण्याची अधिक तपशीलवार प्रस्तुती तुम्हाला आढळेल.
देव खरोखरी आपली काळजी करतो का?
ज्यांना दुर्व्यवहार सहन करावा लागला अशांना साह्य करण्यासाठी कोणती आशा आहे असं तुम्हाला वाटतं?—पृष्ठे २७-८, परिच्छेद २३-७; यश. ६५:१७, १८; km-MR ७/९७ पृ. ८.
जीवनाचा काय उद्देश आहे—तो तुम्हाला कसा शोधता येईल?
आज इतके लोक जीवनात असमाधानी आहेत याचं काय कारण असावं?—पृष्ठे २९-३०, परिच्छेद २, २५-६; स्तोत्र १४५:१६; km-MR ७/९६ पृ. ४.
भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!
सध्या येशू ख्रिस्त काय करत आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?—चित्रे ४१-२; प्रकटी. ११:१५; km-MR ८/९६ पृ. ८.
नंदनवन आणविणारे सरकार.
येशूने आपल्याला ज्या राज्यासाठी प्रार्थना करण्यास शिकविले त्या राज्याविषयी जाणून घेण्यास तुम्हाला आवडेल का?—पृष्ठ ३; मत्त. ६:९, १०.
तुमच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा. (इंग्रजी)
आपली प्रिय व्यक्ती मृत्यूमध्ये गमावलेल्या कोणाचे सांत्वन कसे करता येईल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?—पृष्ठ २६, परिच्छेद २-५; योहा. ५:२८, २९; km-MR ७/९७ पृ. ८.
तुम्ही त्रैक्य मानावे का?
देवाचे खरे स्वरूप जाणून घेणे आपल्या भवितव्याकरता महत्त्वाचे आहे का?—पृष्ठ ३, परिच्छेद ३, ७-८; योहा. १७:३.
३ इतर माहितीपत्रके: फेब्रुवारी १९९८ च्या आमची राज्य सभा पुरवणीत, खासकरून बौद्ध, हिंदू, ज्यू व मुस्लिम लोकांना साक्ष देण्याकरता रचलेल्या माहितीपत्रकांसहित इतर काही प्रकाशनांची यादी दिलेली आहे. जेथे कोठे उचित असेल तेथे, आपल्याला भेटणाऱ्या लोकांना ही माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात. सदर पुरवणीतील पृष्ठे ४-६ वर दिलेल्या सूचनांसोबतच युक्तिवाद (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठे २१-४ ची उजळणी करून अशा लोकांची आस्था जागवणाऱ्या संक्षिप्त प्रस्तुती तयार करा.
४ सुशिक्षित असलेल्या परंतु बायबलची फारशी माहिती नसणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी आणखीन एक माहितीपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यांना देवाच्या वचनाचे परीक्षण करण्यास प्रवृत्त करण्याच्या हेतूने त्याची रचना करण्यात आली आहे. उचित असेल तेथे तुम्ही पुढील माहितीपत्रके सादर करू शकता:
सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक.
व्यापक स्वरूपाचे शिक्षण प्राप्त करणे, यात बायबलमध्ये आढळणारे ज्ञान प्राप्त करणे देखील संमिलित आहे हे तुम्हाला मान्य आहे का?—पृष्ठ ३, परिच्छेद १-३ व पृष्ठ ३०, परिच्छेद २; उप. १२:९, १०.
५ बायबल अभ्यासाचे माहितीपत्रक: आपल्या सेवेचा उद्देश, पहिल्याच भेटीत किंवा मग पुढील पुनर्भेटीत बायबल अभ्यास सुरू करणे हा असला पाहिजे. त्याच उद्देशासाठी, म्हणजे गृह बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी व तो संचालित करण्यासाठी, आपल्याजवळ सहजसोप्यारितीने उपयोग करता येतील अशा एका माहितीपत्रकाचा पुढे उल्लेख केला आहे:
देव आपल्याकडून काय अपेक्षितो?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की प्रत्येक आठवडी फक्त ३० मिनीटे किंवा त्याहून कमी वेळ अभ्यास केल्याने केवळ १६ आठवड्यांत तुम्हाला बायबलचे मूलभूत ज्ञान मिळवता येईल.—पाठ २, परिच्छेद ६; २ तीम. ३:१६, १७; km-MR ३/९७ पृ. ४.
६ चांगल्या शोमरोनी शेजाऱ्याच्या आपल्या दाखल्याद्वारे येशूने हे स्पष्ट केले, की खरा शेजारी तो असतो जो संकटांत दुसऱ्यांना साह्य करण्यासाठी प्रेम व दया दाखवतो. (लूक १०:२७-३७) आध्यात्मिकदृष्ट्या आपले शेजारी संकटात आहेत. त्यांनाही सुवार्ता ऐकवण्याची गरज आहे. ती त्यांना सांगण्याची जबाबदारी पत्करून आपण हे सिद्ध करू या, की आपण येशू ख्रिस्ताचे खरे शिष्य आहोत.—मत्त. २४:१४; गलती. ५:१४.