ऐतिहासिक कामगिरीचा ऑगस्ट महिना! एका नवीन पत्रिकेचे संपूर्ण जगभरात वाटप
१. देवाच्या राज्याच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होणार असल्यामुळे संपूर्ण जगभरात कोणती खास मोहीम राबवली जाईल?
१ लवकरच देवाच्या राज्याच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. अशा वेळी एका खास मोहिमेद्वारे यहोवाचा आदर करणे उचित ठरेल. ऑगस्ट महिन्यादरम्यान आपण संपूर्ण जगभरात “जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे कोण देऊ शकेल?” या नवीन पत्रिकेच्या वाटपात सहभाग घेणार आहोत. ही पत्रिका वाचकांना जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे बायबलमध्ये शोधण्याचे उत्तेजन देते व jw.org ही वेबसाइट त्यांना कशी मदत करेल हे स्पष्ट करते.
२. ऑगस्ट महिन्यात “उच्च स्वराने” अर्थात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या यहोवाच्या स्तुतीत आपण कसे योगदान देऊ शकतो?
२ मोठ्या प्रमाणात यहोवाची स्तुती: ऑगस्ट महिन्यात साहाय्यक पायनियरिंग करून आपले सेवाकार्य वाढवू इच्छिणाऱ्या प्रचारकांसाठी एक खास तरतूद करण्यात आली आहे. या महिन्यात प्रचारक ३० तास भरून साहाय्यक पायनियरिंग करू शकतात. ऑगस्टमध्ये पाच शुक्रवार, शनिवार, आणि रविवार असल्यामुळे आठवड्यादरम्यान नोकरी करणारे किंवा शाळेत जाणारे अनेक प्रचारक साहाय्यक पायनियरिंग करू शकतील. तुमच्या बायबल अभ्यास विद्यार्थ्याला किंवा मुलाला प्रचारक व्हायचे असेल तर तुम्ही वडिलवर्गाच्या संयोजकाला लगेच ही गोष्ट सांगू शकता. या महत्त्वाच्या महिन्यात प्रचारक होऊन आपल्यासोबत सेवाकार्य करून त्यांना बरेच प्रोत्साहन मिळू शकेल! पुष्कळ सामान्य पायनियर, त्यांचे वर्षाचे तास पूर्ण केल्यानंतर ऑगस्ट महिन्यात सुटी घेत असले तरीसुद्धा, या खास मोहिमेत पूर्ण रित्या सहभाग घेण्याकरता ते आपल्या वेळापत्रकात बदल करू शकतात. सर्व ख्रिस्ती कुटुंबे, ऑगस्ट महिन्यात “उच्च स्वराने” अर्थात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या यहोवाच्या स्तुतीत आपलेही योगदान कसे असेल या बाबतीत आत्तापासूनच चर्चा करू शकतात.—एज्रा ३:११; नीति. १५:२२.
३. या खास मोहिमेबद्दल आपण काय आशा बाळगू शकतो?
३ याआधी आपण अशा अनेक मोहिमांत सहभाग घेतला असला तरीपण ही मोहीम ऐतिहासिक ठरेल अशी आपण आशा करू या. ऑगस्ट महिन्यात आपण तासांच्या, प्रचारकांच्या, आणि साहाय्यक पायनियरांच्या बाबतीत नवीन उच्चांक गाठू शकतो का? २०१४ सेवा वर्षाच्या शेवटी येणारा हा ऑगस्ट महिना, इतर सर्व महिन्यांपेक्षा साक्षकार्याचा सर्वात मोठा महिना ठरण्यासाठी यहोवाचे सेवक करत असलेल्या मेहनतीवर त्याचे आशीर्वाद राहोत, अशी आपली सदिच्छा आहे!—मत्त. २४:१४.