वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९८ पृ. २
  • जुलैसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जुलैसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • उपशिर्षक
  • जुलै ६ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै १३ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै २० ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै २७ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९८
km ७/९८ पृ. २

जुलैसाठी सेवा सभा

जुलै ६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ११० (२३)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. देशाच्या व स्थानीय मंडळीच्या एप्रिल महिन्याच्या क्षेत्र सेवा अहवालावर विवेचन मांडा. ईश्‍वरशासित वृत्त.

१५ मि: “नेहमी उपस्थित राहणे किती बरे!” प्रश्‍नोत्तरे. तरुणांना नियमितपणे सभांना उपस्थित राहण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी जून ८, १९८८, सावध राहा! (इंग्रजी), पृष्ठे १९-२१ वरील विवेचने समाविष्ट करा.

२० मि: “आपल्या शेजाऱ्‍यांना सुवार्ता ऐकवण्याची गरज आहे.” मंडळीच्या साठ्यात असलेली काही माहितीपत्रके प्रस्तुत करण्यासाठी दिलेल्या सुचनांची दोन किंवा तीन कार्यक्षम प्रचारकांकडून उजळणी करून घ्या. स्थानिक क्षेत्रात ती परिणामकारक का असू शकतात याचे स्पष्टीकरण द्या. अपेक्षा माहितीपत्रकातून किंवा ज्ञान पुस्तकातून बायबल अभ्यास सुरू करण्याच्या ध्येयावर भर द्या. पहिल्या भेटीचे व त्यानंतर एका पुनर्भेटीचे प्रात्यक्षिक दाखवा ज्यात अभ्यासाचा प्रस्ताव मांडला जातो.

गीत ७३ (७) व समाप्तीची प्रार्थना.

जुलै १३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ११६ (१५)

१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. ऑगस्टमध्ये पाच सप्ताहांत असल्यामुळे त्या महिन्यात सहायक पायनियरींग करण्यासाठी आपले नाव नोंदवण्याच्या बाबीचा गांभीर्याने विचार करण्याचे सर्वांना प्रोत्साहन द्या.

१५ मि: स्थानिक गरजा.

२० मि: जगाच्या आत्म्यामुळे तुम्हाला विषबाधा होत आहे का? ऑक्टोबर १, १९९७, टेहळणी बुरूज, पृष्ठे २५-९ वर आधारित वडिलांचे भाषण.

गीत १८२ (२४) व समाप्तीची प्रार्थना.

जुलै २० ने सुरू होणारा सप्ताह

गीत १८ (१५)

८मि: स्थानिक घोषणा. “वीस हजार!” असे शीर्षक असलेल्या पेटीची उजळणी करा.

१२ मि: “आशीर्वाद ठरेल अशी भेट.” दोन वडिलांची चर्चा. सप्टेंबर १५, १९९३, टेहळणी बुरूज, पृष्ठे २०-३ यात सांगितलेल्या मेंढपाळकत्वाच्या कार्याची उद्दिष्टे काय ते स्पष्ट करा. वडिलांच्या भेटींची आतुरतेने वाट पाहण्याचे स्नेहपूर्ण उत्तेजन मंडळीला द्या.

२५ मि: “पायनियर सेवा—तुम्हाला ती जमेल का?” (परिच्छेद १-१४) सुरवातीला संक्षिप्त विवेचने मांडून सेवा पर्यवेक्षक सर्वांना नियमित पायनियरींगचा गंभीरपणे विचार करण्याचे प्रोत्साहन देतात. मग ते पहिल्या प्रश्‍नाची चर्चा करतात आणि यासोबतच १९९८ वार्षिक पुस्तकातील (इंग्रजी) पृष्ठे १०४-५ वरील “आवेशपूर्ण पायनियर आत्मा” यातील विवेचने समाविष्ट करतात. पायनियरींगचा अनुभव असलेले मंडळीचे दोन किंवा तीन सदस्य सेवा पर्यवेक्षकांसोबत दुसऱ्‍या प्रश्‍नाची चर्चा करण्यासाठी व्यासपीठावर जातात. पायनियर या नात्याने ते आपल्या खर्चाची तोंडमिळवणी कशी करू शकतात याविषयी ते सर्वजण एक व्यावहारिक, वास्तविक दृष्टिकोन प्रस्तुत करतात. मग तिसऱ्‍या प्रश्‍नाची चर्चा करण्यासाठी दोन पालक या गटात सामील होतात. पूर्ण-वेळेच्या सेवेस आपले जीवन ध्येय बनविण्याचा युवकांनी गांभीर्याने विचार का करावा याची सकारात्मक कारणे ते देतात. पुढील सेवा सभेत उर्वरित प्रश्‍ने विचारात घेतली जातील त्यासाठी सर्वांना उपस्थित राहण्याचे प्रोत्साहन द्या.

गीत ८० (६) व समाप्तीची प्रार्थना.

जुलै २७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १५५ (२३)

१५ मि: स्थानिक घोषणा. सर्वांना आपला जुलैचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. ऑगस्टच्या पहिल्या सप्ताहासाठी केलेल्या सेवा योजनांची घोषणा करून सर्वांना सहभाग घेण्याचे प्रोत्साहन द्या. “नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम” याची उजळणी करा.

३० मि: “पायनियर सेवा—तुम्हाला ती जमेल का?” (परिच्छेद १५-२५) वडिलांचे भाषण व चर्चा. प्रश्‍न ४-५ हाताळताना, पायनियरांकडून तसेच ज्यांनी पूर्वी पायनियर सेवा केली आहे त्यांच्याकडून आपली मनःपूर्वक विवेचने व्यक्‍त करण्याची आगाऊ तयारी करून घ्या. उत्तम आराखडा राखण्याच्या व त्याला जडून राहण्याच्या गरजेवर भर देऊन व्यावहारिक ठरलेल्या साप्ताहिक सेवा आराखड्यांची उदाहरणे ते देतात. प्रश्‍न ६ चे उत्तर देणाऱ्‍या एका उत्तेजनपर भाषणाद्वारे वडील समारोप करतात. सप्टेंबर १ पासून सेवा वर्षांची सुरवात होत असल्यामुळे त्या दिवसापासून पूर्ण-वेळेची सेवा सुरू करण्याचा नवीन पायनियरांसाठी यापेक्षा उत्तम समय अजून कोणता असू शकतो बरे? मंडळीच्या सेवा समितीच्या कोणत्याही सदस्याकडून अर्ज प्राप्त केले जाऊ शकतात.

गीत ५१ (७) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा