ईश्वरशासित वृत्त
◼ पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट, कॅमेरुन, घाना, बेनिन, लायबेरिया आणि नायजेरिया या सर्व राष्ट्रांनी फेब्रुवारी महिन्यात प्रचारकांचा नवीन उच्चांक गाठला.
◼ अनेक निर्वासित आता पुन्हा लायबेरियामध्ये येत आहेत आणि त्या देशात सत्यासाठी लोक खरोखरच भुकेले आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांचा प्रचारक उच्चांक २,२८६ असून ६,२७७ इतके गृह बायबल अभ्यास होते.
◼ मकाऊमध्ये मागील वर्षाच्या सरासरीपेक्षा १६ टक्के वाढ झाली असून फेब्रुवारी महिन्यात १३५ जणांनी अहवाल दिला.
◼ ताहिती, दक्षिण पॅसिफिक, फिजी आणि सॉलोमन बेटे या सर्वांनी फेब्रुवारी महिन्यात नवीन प्रचारक उच्चांकाचा अहवाल दिला.
◼ मादागास्कर बेटाने ९,४८४ प्रचारकांचा एक नवीन उच्चांक गाठला जो मागील वर्षाच्या सरासरीपेक्षा १४ टक्के अधिक होता. शिवाय, फेब्रुवारी महिन्यात प्रचारकांनी २०,००० बायबल अभ्यासांचा अहवाल दिला.