वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९८ पृ. १
  • आशीर्वाद ठरेल अशी भेट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आशीर्वाद ठरेल अशी भेट
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • “देवाच्या कळपाचे पालन करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • ख्रिस्ती मंडळीला वडिलांची कशी मदत होते?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
  • ख्रिस्ती मेंढपाळ तुमची सेवा कशी करतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • तुमच्या देखरेखीखाली असलेल्या देवाच्या कळपाचे पालन करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km ७/९८ पृ. १

आशीर्वाद ठरेल अशी भेट

१ जक्कयने मोठ्या आनंदाने एक पाहुणा म्हणून येशूचे आपल्या घरी स्वागत केले. आणि ही भेट किती मोठा आशीर्वाद ठरली!—लूक १९:२-९.

२ मंडळीचा मस्तक या नात्याने आज येशू ख्रिस्त, ‘देवाच्या कळपाचे पालन करण्याचे’ निर्देशन वडिलांना देतो. (१ पेत्र ५:२, ३; योहा. २१:१५-१७) सभांमध्ये शिक्षण देणे व क्षेत्र सेवेत पुढाकार घेणे यांव्यतिरिक्‍त मंडळीचे पर्यवेक्षक मंडळीतील प्रत्येक सदस्यास प्रेमळ, वैयक्‍तिक साह्‍य पुरवतात. यामुळे, वेळोवेळी वडील तुमच्याकडे वैयक्‍तिक लक्ष देतील अशी तुम्ही अपेक्षा करू शकता; एकतर तुमच्या घरी, राज्य सभागृहात, तुमच्यासोबत कार्य करताना किंवा इतर प्रसंगी. वडिलांच्या या भेटींबद्दल तुम्हाला भीती वाटावी का? मुळीच नाही. ते तुमची भेट घेतात म्हणजे, तुम्ही कुठे तरी उणे पडत आहात असा त्याचा अर्थ होत नाही. तर मग मेंढपाळकत्वाच्या भेटीचा उद्देश काय?

३ पौलाने म्हटले, की बांधव “कसे आहेत हे [पाहण्यासाठी]” तो त्यांची भेट घेऊ इच्छित होता. (प्रे. कृत्ये १५:३६) होय, प्रेमळ मेंढपाळ या नात्याने वडीलजन, तुम्ही कसे आहात हे जाणून घेण्यास अतिशय उत्सुक असतात. सहायक व उभारणीकारक ठरेल असे आध्यात्मिक साह्‍य ते तुम्हाला देऊ इच्छितात. आपल्या प्रत्येकाची अशी वैयक्‍तिक काळजी घेतली जावी ही आपला प्रेमळ मेंढपाळ, यहोवा याची इच्छा आहे.—यहे. ३४:११.

४ वडिलांच्या भेटींचे स्वागत करा: बांधवांना भेट देण्याचा पौलाचा उद्देश, ‘ते स्थिर व्हावेत म्हणून त्यांना काही आध्यात्मिक कृपादान देणे व उत्तेजनाचे आदानप्रदान करणे’ हा होता. (रोम. १:११, १२) या शेवटल्या कठीण काळात आपल्या सर्वांनाच आध्यात्मिक उत्तेजनाची व विश्‍वासात सतत दृढ राहण्याकरता मदतीची गरज आहे. मेंढपाळकत्वाच्या भेटीस तुम्ही सकारात्मक प्रतिसाद दिल्यास उत्तेजनाचे उत्तम आदानप्रदान होईल याबद्दल शंकाच नाही.

५ वडिलांच्या मेंढपाळकत्वाच्या कार्यापासून मिळू शकणाऱ्‍या अनेक लाभांची कदर करा. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल चिंता वाटत असल्यास किंवा एखादा प्रश्‍न तुमच्या मनात घोळत असल्यास मदतीचा हात पुढे करणारे वडील, मंडळीत आहेत याचा विसर पडू देऊ नका. कदाचित, तुमच्या आध्यात्मिक सुस्थितीवर परिणाम करणारी एखादी बाब असेल; याविषयी उघडपणे त्यांच्याशी चर्चा करण्यात मागेपुढे पाहू नका. यहोवाने केलेल्या या प्रेमळ व्यवस्थेविषयी कदर बाळगा आणि अशा भेटीमुळे निष्पन्‍न होणाऱ्‍या आशीर्वादांचा आनंद लुटा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा