वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९७ पृ. ५
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
  • आमची राज्य सेवा—१९९७
  • उपशिर्षक
  • पुढील विधानांची उत्तरे, खरे किंवा खोटे यात द्या:
  • पुढील प्रश्‍नांची उत्तरे द्या:
  • पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा वाक्यांश पुरवा:
  • पुढील विधानांतून अचूक उत्तर निवडा:
  • पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:
आमची राज्य सेवा—१९९७
km १२/९७ पृ. ५

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत सप्टेंबर १ ते डिसेंबर २२, १९९७ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्‍नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.

[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्रश्‍नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्‍तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]

पुढील विधानांची उत्तरे, खरे किंवा खोटे यात द्या:

१. देवाने बुद्धिमान मनुष्यप्राण्यांना स्वतंत्र इच्छा दिली नसती तर दुष्टाईच अस्तित्वात नसती. [rs पृ. ४२८ परि. २]

२. मत्तय १९:२८ येथील, आत्म्याने जन्मलेल्या येशूच्या दुय्यम याजकांनाच नव्हे तर मानवजातीतील इतरांनाही सूचित करणारे आणि लूक २२:३० येथील “इस्राएलाचे बारा वंश” यांची सारखीच अर्थसूचकता आहे. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८७ ३/१ पृ. २७ परि. १०; पृ. २८ परि. १२.]

३. येशू शोमरोनी स्त्रीशी बोलत असताना त्याच्या शिष्यांना आश्‍चर्य वाटले कारण तिची जीवनशैली अनैतिक होती. (योहान ४:२७) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ ७/१५ पृ. १५ परि. १-२.]

४. योहान ६:६४ येथे आढळणारी “पहिल्यापासून” ही अभिव्यक्‍ती असे सूचित करते, की प्रेषित म्हणून यहुदाची निवड झाली तेव्हाच येशूला हे ठाऊक होते, की हाच आपला विश्‍वासघात करणारा असेल. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा it-2 पृ. १२९ परि. ४-६.]

५. निर्गम २१:२२, २३ आपल्याला हे समजण्यास मदत करते की देवाला, न जन्मलेल्या मानवी बालकाचा जीव देखील मोलाचा वाटतो. [kl-MR पृ. १२८ परि. २१]

६. ज्याप्रमाणे उंची पोशाख करण्यास पहिले पेत्र ३:३, ४ मना करत नाही त्याचप्रमाणे जडजवाहीर व सौंदर्य प्रसाधनांचा मर्यादित व वाजवी उपयोग करण्यासही ते मना करत नाही. [rs पृ. ४३५ परि. १]

७. योहान ५:१ येथे उल्लेखिलेला “यहूद्यांचा सण” सा.यू. ३१ च्या वल्हांडण सणास सूचित करतो. [si पृ. १९४ परि. ८]

८. एखाद्या सहउपासकाने आपल्याला दुखावले असल्यास त्याच्याशी कोणताही संपर्क टाळून त्याला आपल्या जीवनातून बाहेर टाकणे चुकीचे ठरेल. [uw-MR पृ. १३४ परि. ७]

९. मुलकी अधिकारी नीतिमान असोत किंवा अनीतिमान असोत पण खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी आपला विवाह त्यांच्यामार्फत कायदेशीररित्या नोंदला पाहिजे. [kl-MR पृ. १२२ परि. ११]

१०. इफिसमध्ये असताना लूकने प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक लिहिले होते. [si पृ. १९९ परि. ३]

पुढील प्रश्‍नांची उत्तरे द्या:

११. पहिल्या शतकातल्या इफिसमधील ख्रिश्‍चनांच्या उदाहरणाच्या सुसंगतेत दुरात्म्यांचा प्रतिकार करण्यासाठी कोणते एक आवश्‍यक पाऊल उचलणे गरजेचे आहे? (प्रेषितांची कृत्ये १९:१९) [kl-MR पृ. ११४ परि. १४]

१२. नोहाच्या काळी काही दूतांनी कसे पाप केले? [kl-MR पृ. १०९ परि. ४]

१३. वारशासंबंधीच्या वादविवादात गोवण्यास येशूने का नकार दिला? (लूक १२:१३, १४) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९७ ४/१ पृ. २८.]

१४. प्रेषितांची कृत्ये १:६ येथे दिलेल्या अहवालानुसार, येशू इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय असा प्रश्‍न त्याच्या शिष्यांनी त्याला विचारला असता ते कोणत्या गोष्टीविषयी अज्ञात होते? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९० १२/१ पृ. २५ परि. ४.]

१५. स्थायी विवाहास हातभार लावणारे दोन घटक कोणते ते सांगा. [uw-MR पृ. १४० परि. ४]

१६. विशिष्ट प्रसंगी एखादी ख्रिस्ती स्त्री आपले मस्तक का आच्छादते? [rs पृ. ४३३ परि. २]

१७. योहान १:१ या वचनात इतर भाषांतरे “शब्द देव होता” असे म्हणतात तसे न म्हणता नवे जग भाषांतर (इंग्रजी) “शब्द देवता होता” असे का म्हणते? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा rs २१२ परि. ५.]

१८. प्रकटीकरणाच्या पुस्तकानुसार ‘चेटक्यांनी’ पश्‍चात्ताप करून आपल्या मार्गांत बदल केला नाही तर त्यांच्या वाट्याला काय येईल? [kl-MR पृ. १११ परि. ८]

१९. येशू एक परिपूर्ण व्यक्‍ती होता आणि तो स्वतः एक शिक्षक असल्याचे त्याने कबूल केले, तर मग त्याला “उत्तम शिक्षक” म्हटले गेले तेव्हा मात्र त्याने त्याचा स्वीकार का केला नाही बरे? (लूक १८:१८, १९) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ ३/१ पृ. १५ परि. ७.)

२०. योहान १३:३४ येथे दिलेल्या आज्ञेत कोणते नाविण्य होते? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९० ९/१ पृ. २३ परि. ५-६.]

पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा वाक्यांश पुरवा:

२१. एखाद्या बंधूच्या मनांत आपल्याविरुद्ध काहीतरी असल्याचे आपल्या लक्षात येते तेव्हा पुढाकार घेण्यासाठी व _________________________ स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी _________________________ जोडीला _________________________ हवी असते. [uw-MR पृ. १३५ परि. १०]

२२. “दहा मोहरा” ह्‍या, स्वर्गीय राज्याचे अधिक _________________________ उत्पन्‍न करण्यासाठी आत्म्याने जन्मलेल्या शिष्यांना वापरता येण्यासारख्या _________________________ प्रतिनिधित्त्व करतात. (लूक १९:१३) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८९ १०/१ पृ. ८.]

२३. यहुदीयाचा रोमी सुभेदार पिलात याच्याकडे यहुद्यांनी येशूविरुद्ध केलेले तीन खोटे आरोप म्हणजे, तो _________________________ फितवतो, _________________________ देण्याची मनाई करतो आणि स्वतः _________________________ आहे असा दावा करतो. (लूक २३:२) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w९० १२/१ पृ. ९ परि. १.]

२४. खरे ख्रिस्ती, नाताळ किंवा खोट्या धार्मिक विश्‍वासावर आधारलेला कोणताही सण साजरा करीत नाहीत कारण ते केवळ यहोवालाच _________________________ राखून आहेत; शिवाय पापी मनुष्य किंवा राष्ट्रांची _________________________ सुट्टीचे दिवसही ते साजरे करत नाहीत. [kl-MR पृ. १२६ परि. १६]

२५. बायबलचे विद्यार्थी या नात्याने, साहित्याच्या संशोधनासाठी आपण उपलब्ध सूचींचा उपयोग करण्यास शिकले पाहिजे, प्रत्येक प्रश्‍नाला _________________________ किंवा _________________________ असे उत्तर मिळण्याची अपेक्षा करू नये व _________________________ आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांवरील प्रेम प्रकट होईल असे _________________________ घेतले पाहिजेत. [uw-MR पृ. १४४ परि. १३)

पुढील विधानांतून अचूक उत्तर निवडा:

२६. प्रेषित पेत्रानुसार आपला (पश्‍चात्ताप; विश्‍वास; आज्ञाधारकपणा) प्रकट करण्याची संधी आपल्याला मिळावी यासाठीच यहोवाची (दया; प्रीती; सहनशीलता) आपल्या काळापर्यंत विस्तारलेली आहे. (२ पेत्र ३:९) [rs पृ. ४२९ परि. २]

२७. लोकांना बंधमुक्‍त करणारे सत्य हे (विज्ञान; खोटा धर्म; येशू ख्रिस्त) याच्याविषयीचे सत्य होय, कारण केवळ त्याच्यामार्फतच (खोट्या शिकवणुकी; जगिक मतप्रचार; मृत्युदायक पाप) यापासून आपली सुटका होऊ शकते. (योहान ८:१२-३६) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९२ ३/१ पृ. ९ परि. ५.]

२८. ईश्‍वरी जीवन जगल्यामुळे (इतर लोक आपल्याला नेहमीच चांगले वागवतील; आपण वर्तमान काळात अमाप भौतिक गोष्टी उपभोगू; आपण योग्य तेच करत असल्यामुळे आपल्याला देवाची कृपापसंती मिळेल) याची शाश्‍वती मिळते. [kl-MR पृ. ११८, परि. २]

२९. “ह्‍यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीति करितोस काय?” असे येशूने प्रेषित पेत्राला विचारले तेव्हा तो त्याला असे विचारत होता की आपल्यावरील (त्याची प्रीती ह्‍या इतर शिष्यांवरील त्याच्या प्रीतीपेक्षा अधिक होती का; त्याची प्रीती ह्‍या इतर शिष्यांच्या येशूवरील प्रीतीपेक्षा अधिक होती का; त्याची प्रीती ह्‍यांच्यापेक्षा, अर्थात या मासळीपेक्षा अधिक होती का). (योहान २१:१५) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८८ ११/१ पृ. ३१ परि. ९.]

३०. योहान १०:१६ येथे उल्लेखिलेली “इतर मेंढरे” (विदेशी ख्रिश्‍चनांना; यहुदी ख्रिश्‍चनांना; परादीसमध्ये पृथ्वीवरील जीवनाचे भवितव्य असणाऱ्‍या सर्वांना) सूचित करतात. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ ४/१५ पृ. ३१ परि. ४.]

पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:

निर्ग. ३१:१२, १३; नीति. ३:९, १०; मत्त. ५:१४-१६; लूक ९:६०, ६२; १३:४, ५

३१. येशूने त्याच्या श्रोत्यांना सुपरिचित असणाऱ्‍या एका दुःखद घटनेचा उल्लेख करून दैववादी तर्काविरुद्ध मत मांडले आणि या दुःखद घटनेसाठी त्याने समय व प्रसंग यांस जबाबदार ठरवले हे स्पष्ट आहे. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९६ ९/१ पृ. ५ परि. ५.]

३२. मोशेचे नियमशास्त्र सर्व मानवजातीला बंधनकारक असावे असा उद्देश कधीही नव्हता. [uw-MR पृ. १४७ परि. ५]

३३. राज्यात प्रवेश करण्यासाठी समर्पित भक्‍तीची गरज आहे. [si पृ. १९२ परि. ३२]

३४. खरी भक्‍ती पुरस्कारण्यास आपला वेळ, शक्‍ती आणि आर्थिक साह्‍यांसमवेत इतर मिळकतींचाही उपयोग केल्यास यहोवा आपल्याला आशीर्वादित करील. [kl-MR पृ. १२० परि. ८]

३५. ख्रिश्‍चनांनी जगासमोर देवाचे नाव व उद्देश यांचे क्रियाशील साक्षीदार असले पाहिजे. [rs पृ. ४३८ परि. ४]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा