घोषणा
▪ साहित्य सादरता ऑगस्ट: पुढील ३२ पृष्ठांची कोणतीही माहितीपत्रके, ६.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव आपल्याकडून काय अपेक्षितो, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करतो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, आणि सर्वकाळ टिकणारे ईश्वरी नाम (इंग्रजी). सप्टेंबर: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गण्या. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी आहे ९०.०० रुपये. मासिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी आणि पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ४५.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी उपलब्ध नाही. वर्गणी नाकारण्यात आल्यास नियतकालिकांच्या किरकोळ प्रती प्रत्येकी ४.०० रुपयांच्या अनुदानात सादर केल्या जाव्यात. वर्गण्या प्राप्त करताना आठवणीत ठेवा की, पंजाबी आणि उर्दू वगळता (ज्यांमध्ये ते मासिक आहे), टेहळणी बुरूज आता सर्व भारतीय भाषांत तसेच नेपाळी भाषेत, दर पंधरवड्याला प्रकाशित होते. सावध राहा! हे मल्याळम व तमीळ या भाषांत पाक्षिक आहे पण कन्नड, गुजराती, तेलगू, नेपाळी, मराठी व हिंदी या भाषांत ते मासिक आहे. उर्दू, पंजाबी व बंगाली या भाषांत सावध राहा! याच्या त्रैमासिक वितरकांच्या प्रती मंडळ्यांसाठी उपलब्ध आहेत, पण या तीन भाषांत वर्गण्या उपलब्ध नाहीत. या महिन्याच्या उत्तरार्धात राज्य वार्ता क्र. ३५ चे वितरण केले जाईल. नोव्हेंबर: राज्य वार्ता क्र. ३५ चे वितरण चालू राहील. प्रत्येक घरातील अथवा निवासातील घरमालकास राज्य वार्ता क्र. ३५ याच्या प्रती देऊन ज्या मंडळ्या आपले क्षेत्र उरकतात ते आता ज्ञान पुस्तक, २०.०० रुपयांच्या अनुदानात सादर करू शकतात. सूचना: वर उल्लेखिलेल्या कोणत्याही सादरतांच्या मोहिमेची मागणी ज्या मंडळ्यांनी अद्याप केलेली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-AB-14) वर मागणी पाठवावी.
▪ या आधी, कोट्टायम येथे डिसेंबर २६-२८ साठी आयोजित केलेले प्रांतीय अधिवेशन आता त्याच तारखांना अर्नाकुलम येथे आयोजित केले आहे. अधिवेशन मुख्यालयाचा पत्ता आहे: c/o Ipe Thomas, C-32/1994 Netaji Road, Edappally P.O., Cochin, KER 682 024.
▪ प्रत्येक समाजात, वर्षभरात विविध प्रसंगी जगिक सुट्या असतात ज्यावेळी मुलांना शाळेतून आणि प्रापंचिक नोकरी करणाऱ्यांनासुद्धा नोकरीतून सुट्टी मिळते. यामुळे मंडळीला क्षेत्र सेवेत अधिक भाग घेण्याच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध होतात. असे प्रसंग केव्हा येतील याचा वडिलांनी अंदाज बांधावा आणि सुट्ट्यांदरम्यान गटाच्या साक्षकार्याकरता ज्या व्यवस्था केल्या जातात त्यांविषयी मंडळीला आगाऊ माहिती द्यावी.
▪ प्रत्येक मंडळीला तीन लिटरेचर इंव्हेंटरी (S-AB-18) फॉर्म मिळतील. मंडळीच्या सचिवांनी ऑगस्टच्या सुरवातीलाच साहित्य सेवकांना भेटावे व महिन्याच्या शेवटी मंडळीच्या साहित्य साठ्याची यादी तयार करण्यासाठी तारीख ठरवावी. साठ्यातील सर्व साहित्याची अचूक मोजणी केली पाहिजे आणि एकूण संख्या लिटरेचर इंव्हेंटरी फॉर्म यावर नोंदवावी. नियतकालिक सेवकाकडून उपलब्ध असलेल्या नियतकालिकांची एकूण संख्या प्राप्त केली जाऊ शकते. कृपया मूळ प्रत संस्थेला सप्टेंबर ६ च्या आधी पाठवावी. तुमच्या फाईलसाठी एक कार्बन प्रत ठेवा. तिसरी प्रत कच्ची प्रत म्हणून वापरू शकता. ही यादी करताना सचिवांनी देखरेख केली पाहिजे आणि पूर्ण केलेला फॉर्म अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी तपासला पाहिजे. सचिव व अध्यक्षीय पर्यवेक्षक दोघेही या फॉर्मवर सह्या करतील.
▪ मंडळीचे सचिव, काँग्रीगेशन ॲनलीसीस रिपोर्ट फॉर्म (S-10) यावर नोंद करण्यासाठी संख्या देखील संग्रहित करतील. पब्लिशर रेकॉर्ड कार्ड्समधून (S-21) आवश्यक माहिती तक्त्याच्या रुपात अचूकपणे मांडली जाते याची खात्री करण्यासाठी अहवाल संकलित करण्यास मदत करणाऱ्या वडील अथवा सेवा सेवकाला ते काळजीपूर्वक सूचना देतील. काँग्रीगेशन ॲनलीसीस रिपोर्ट फॉर्म अचूकपणे आणि व्यवस्थित भरला पाहिजे आणि त्यावर सही करण्याआधी सेवा समितीने त्याची काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे. कृपया याची नोंद घ्या की, फॉर्मवरील पहिल्या पाच चौकटींमध्ये सरासरी साप्ताहिक सभांच्या उपस्थिती द्यायच्या आहेत. यांची बेरीज करण्यासाठी, चौकटींच्या वर दिलेल्या सुचनांचे नीट पालन करा. फॉर्मच्या समोरच्या बाजूला खालून दुसऱ्या चौकटीतील संख्येत मात्र नियुक्त वडिलांचाच समावेश करावा हे देखील लक्षात असू द्या; पर्यायी पर्यवेक्षक, सेवा सेवक आहेत आणि त्यानुसार शेवटल्या चौकटीतील संख्येत त्यांचा समावेश करावा. कृपया संस्थेला S-10 फॉर्मची मूळ प्रत सप्टेंबर १० च्या आधी पाठवावी; त्याची नक्कल केलेली प्रत तुमच्या फाईलमध्ये ठेवा.
▪ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
बायबल कथांचे माझे पुस्तक (लहान आकाराचे) —तामीळ
▪ साठ्यात नसलेली प्रकाशने:
“तुझे राज्य येवो” —मल्याळम