वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९७ पृ. ८
  • सांत्वन मिळवण्यास इतरांना मदत करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सांत्वन मिळवण्यास इतरांना मदत करा
  • आमची राज्य सेवा—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • इतरांची खरी काळजी घेऊन यहोवाचे अनुकरण करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • माहितीपत्रकांद्वारे सुवार्तेची घोषणा करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • तुमच्या सेवेत विविध माहितीपत्रकांचा वापर करा
    आमची राज्य सेवा—१९९५
  • देवाकडून आनंदाची बातमी! या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग पुनर्भेट घेण्यास व बायबल अभ्यास सुरू करण्यास केला जाऊ शकतो
    आमची राज्य सेवा—२०१३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९७
km ७/९७ पृ. ८

सांत्वन मिळवण्यास इतरांना मदत करा

पुष्कळ लोक आपत्ती, युद्धे, गुन्हे आणि पीडा यांनी त्रासून गेले आहेत. हल्लीच्या बातमीपत्रांमधून सांत्वन स्पष्टतः नाहीसेच झाले असले, तरी मानवजातीला त्याची खरोखर गरज आहे. सांत्वन देणे म्हणजे दुसऱ्‍या व्यक्‍तीला “आधार आणि आशा देणे” आणि त्याचे “दुःख किंवा त्याचा त्रास हलका करणे.” यहोवाचे साक्षीदार या नात्याने, अशा तऱ्‍हेने लोकांची मदत करण्यास आपण सुसज्ज आहोत. (२ करिंथ. १:३, ४) जुलै आणि ऑगस्ट दरम्यान आपण जी बायबल आधारित माहितीपत्रके सादर करणार आहोत त्यांमध्ये सत्याचे सांत्वनपर संदेश आहेत. (रोम. १५:४) विविध परिस्थितींमध्ये ही माहितीपत्रके कशी सादर करावीत याविषयी येथे काही सूचना दिल्या आहेत:

२ कदाचित एखाद्या दुःखद घटनेमुळे इतरांना साक्ष व सांत्वन देण्याची संधी असे म्हणून मिळू शकते:

▪ “अशा गोष्टी घडतात तेव्हा, देवाला मानवांची खरोखरच काळजी आहे का असा काहींना प्रश्‍न पडतो. तुम्हाला काय वाटतं? [प्रतिसादासाठी वाव द्या.] पृथ्वीची निर्मिती करण्यामागे देवाचा एक उद्देश होता असं बायबल सांगतं याकडे लक्ष द्या.” यशया ४५:१८ वाचा. मग पुढे म्हणा: “पृथ्वीवर वस्ती राहावी अशी त्याची इच्छा असल्यास, मानवांना पृथ्वीवर शांतीने राहता येण्यासाठी तो निश्‍चितच काहीतरी करेल असा विश्‍वास धरणे अवाजवी ठरेल का? माझ्याकडे असं माहितीपत्रक आहे ज्यामुळे तुम्हाला निश्‍चितच सांत्वन मिळेल. देव खरोखरी आपली काळजी करतो का? असं त्या माहितीपत्रकाचं शीर्षक आहे. [मुखपृष्ठावरील प्रश्‍नं वाचून काढा.] देव लवकरच आपल्याला सामना कराव्या लागणाऱ्‍या सर्व अन्यायी परिस्थितींचा नायनाट करील याचा खात्रीशीर पुरावा त्यात देण्यात आला आहे. तुम्हाला ते वाचायला आवडेल का?” माहितीपत्रक सादर करून पुनर्भेटीची व्यवस्था करा.

३ पुनर्भेटीत तुम्ही असे म्हणू शकता:

▪ “देव खरोखरी आपली काळजी करतो का? हे माहितीपत्रक मी तुम्हाला देऊन गेलो तेव्हा देव काळजी वाहतो याचा काही पुरावा आहे का, याची चर्चा आपण करत होतो. कदाचित पृष्ठ ७ वर तुम्ही हा मुद्दा पाहिला असेल. [चित्र दाखवा आणि परिच्छेद १५ चा सारांश द्या.] मानवजातीला निर्माण करण्यात देवाने कोणती काळजी घेतली ते दाखवणारे हे एक मात्र उदाहरण आहे. [पृष्ठ ८ वरील परिच्छेद २७ वाचा.] बायबलच्या व्यक्‍तिगत अभ्यासाने मला जीवनाच्या दैनंदिन अडीअडचणींना तोंड देण्यास मदत दिली आहे कारण त्यामध्ये देव या सर्व गोष्टींना कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे सांगितले आहे.” बायबल अभ्यासाचे प्रदर्शन करून दाखवता येईल का असे विचारा.

४ “जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल?” हे माहितीपत्रक वापरून संक्षिप्त रूपात साक्ष देता येऊ शकते. स्वतःची ओळख देऊन तुम्ही असे म्हणू शकता:

▪ “मी तुम्हाला व तुमच्या शेजाऱ्‍यांना एक महत्त्वपूर्ण संदेश सांगत आहे.” माहितीपत्रकातील पृष्ठ ४ वरील पहिला परिच्छेद वाचा आणि मग घरमालकाचे काय मत आहे ते विचारा आणि त्याला आपले विचार व्यक्‍त करू द्या. बायबलमधून यशया ४५:१८ काढा. ते वचन वाचून म्हणा: “आपल्याला लक्षात ठेवूनच पृथ्वी निर्माण करण्यात आली होती असं हे वचन दाखवतं. पण इथं आपलं काय काम आहे? आपलं भवितव्य काय आहे?” माहितीपत्रकाचा उद्देश समजावून सांगा आणि ते सादर करा. पुन्हा भेट देण्याची ठरावीक योजना करा.

५ नंतरच्या भेटीत, अभ्यास सुरू करण्याच्या हेतूने तुम्ही हा प्रस्ताव मांडून पाहू शकता:

▪ “जीवनाचा उद्देश आपल्याला कोण सांगू शकेल हे स्पष्ट करून आपल्या मागील संभाषणाची मी आणखी चर्चा करू इच्छितो. [जीवनाचा उद्देश माहितीपत्रकातल्या पृष्ठ ६ वरील १ आणि २ परिच्छेदांचे स्पष्टीकरण द्या.] प्रकटीकरण ४:११ आपल्याला स्पष्ट करते की यहोवा देव आपला निर्माणकर्ता आहे. [वाचा.] आपल्याला निर्माण करण्यामागे नक्कीच काही कारण असले असावे. ते कारण कोणते हे शोधण्याचा ज्या लोकांनी प्रयत्न केला आहे त्यांनी देवाचे लिखित वचन अर्थात बायबलचा अभ्यास केला आहे. ही संधी तुमच्यासमोर ठेवायला मला आवडेल.” आपला गृह बायबल अभ्यासाचा कार्यक्रम कसा चालवला जातो ते स्पष्ट करा आणि अभ्यास सुरू करण्याची व्यवस्था करा.

६ ज्यांनी आपल्या एखाद्या प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूचा अनुभव घेतला आहे अशांना हा सकारात्मक प्रस्ताव सांत्वनदायक ठरेल:

▪ “ज्या लोकांची एखादी प्रिय व्यक्‍ती मरण पावली आहे अशांकरता मी सामाजिक सेवा करत आहे. आपल्याला सामना कराव्या लागणाऱ्‍या घटनांपैकी ही सर्वात कठीण घटना असल्यामुळे, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी) हे माहितीपत्रक तयार करण्यात आले आहे. या माहितीपत्रकाने लाखो लोकांना मदत दिली आहे. येशू ख्रिस्ताने दिलेल्या एका रोचक अभिवचनाबद्दल ते काय सांगते हे तुम्हाला मला दाखवायला आवडेल. [योहान ५:२१, २८, २९ सोबत पृष्ठ २६ वरील पाचवा परिच्छेद वाचा.] इथं पृष्ठ २९ वर, येशू लाजाराला मृतातून प्रत्यक्षात उठवत आहे हा बायबलचा अहवाल दाखवणारे चित्र पाहा. तुम्ही हे सांत्वनदायक माहितीपत्रक घ्यावे असे उत्तेजन मी तुम्हाला देतो आणि पुन्हा येऊन याची चर्चा तुमच्यासोबत करायला मला आवडेल.”

७ तुम्ही परतल्यावर, “तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा” (इंग्रजी) या माहितीपत्रकातील पृष्ठ २९ वरील चित्र पुन्हा एकदा दाखवून असे म्हणू शकता:

▪ “येशूने लाजाराचे पुनरुत्थान केले याबद्दल आपण चर्चा केली असल्याचे तुम्हाला आठवत असेल. [पृष्ठ २८ वरील मथळा वाचा, आणि मग “हे खरोखर घडले का?” या उपशीर्षकाखालील मजकूर विचारात घ्या.] तुमची एखादी मृत प्रिय व्यक्‍ती पुन्हा पाहायला तुम्ही उत्सुक असाल, तर पुनरुत्थानाच्या आशेवर भरवसा ठेवायला मी तुमची मदत करायला तयार आहे.” गृह बायबल अभ्यासाविषयी सांगा.

८ येत्या महिन्यांमध्ये, ‘सर्व शोकग्रस्ताचे सांत्वन करण्याद्वारे’ येशूचे अनुकरण करण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करू या.—यश. ६१:२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा