वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९७ पृ. ६
  • जुन्या पुस्तकांचा उपयोग करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जुन्या पुस्तकांचा उपयोग करणे
  • आमची राज्य सेवा—१९९७
आमची राज्य सेवा—१९९७
km ७/९७ पृ. ६

जुन्या पुस्तकांचा उपयोग करणे

“ग्रंथरचनेला काही अंत नाही; बहुत ग्रंथपठण देहास शिणविते,” असे सुज्ञ राजा शलमोनाने लिहिले. (उप. १२:१२) मानवी बुद्धी आणि तत्त्वज्ञानाने भरलेल्या पुस्तकांविषयी हे बोल किती खरे आहेत. परंतु, विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाकरवी निर्माण केलेल्या आणि देवाचे वचन अर्थात बायबलमधील ईश्‍वरी बुद्धीवर आधारित असलेल्या पुस्तकांविषयी काय? यांमध्ये सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान आहे.—नीति. २:१-९, २१, २२.

२ काही विशिष्ट पुस्तकांची किंमत प्रत्येकी केवळ २.५० रुपये करण्यात आली आहे; लोकांपर्यंत ही पुस्तके आणि त्यांमधील जीवन प्रदान करणारा संदेश पोहंचावा म्हणून संस्थेने ही तरतूद केली आहे. भारतातल्या सर्व मंडळ्यांच्या अलीकडील सेवा सभेत या व्यवस्थेची घोषणा आणि त्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. म्हणून, आम्ही अशाप्रकारच्या सर्व प्रकाशनांची एक यादी देत आहोत ज्यायोगे प्रत्येक प्रचारकाकडे कोणत्याही वेळी ही यादी उपलब्ध असेल.

प्रत्येकी २.५० रुपयांसाठी उपलब्ध असलेली प्रकाशने

एकमेव खऱ्‍या देवाच्या उपासनेतील ऐक्य —मल्याळम, मराठी, नेपाळी, तामीळ

खरी शांती आणि सुरक्षितता—कोणत्या उगमाकडून? —तामीळ

“तुझे राज्य येवो” —सर्व भाषांमध्ये

तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता —गुजराती

थोर शिक्षकाचे ऐका —मराठी

देवाला खोटे बोलणे अशक्य आहे अशा गोष्टी —कन्‍नड

नवीन पृथ्वीमध्ये बचाव —मल्याळम, तामीळ

बायबल—देवाचे वचन की मानवाचे —इंग्रजी

मानव उत्क्रांतीने आला की निर्मितीने —इंग्रजी

‘शांतीच्या राजकुमाराच्या’ अधिपत्याखाली जागतिक सुरक्षितता —इंग्रजी

सद्य जीवन एवढेच सर्व काही आहे का? —इंग्रजी, तेलगू

सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते —गुजराती

३ या पुस्तकांचा उत्तम वापर कसा करता येईल? एक गोष्ट म्हणजे, तुम्ही तत्काळ आपले व्यक्‍तिगत पुस्तकालय तपासावे असे आम्ही सुचवतो. वर दिलेली सर्व पुस्तके तुमच्याजवळ आहेत का? यांपैकी काही पुस्तके नसल्यास, तुमच्या मंडळीद्वारे त्यांची मागणी करून तुम्ही आपल्या घरातले पुस्तकालय पूर्ण करू शकता. ही सर्व पुस्तके प्रशाला पुस्तकालयात आहेत का हे ईश्‍वरशासित सेवा प्रशाला पर्यवेक्षक तपासून पाहू शकतात. नसल्यास, प्रशाला पुस्तकालयात ठेवण्यासाठी ते या पुस्तकांच्या प्रती मागवू शकतात आणि मंडळीकडून त्यांचा खर्च घेतला जाऊ शकतो. आपल्या घरातल्या आणि मंडळीच्या प्रशाला पुस्तकालयातही अनेक भाषांमध्ये—तुम्ही ज्या भाषांचा जास्त उपयोग करत नाही त्या भाषेचीही—पुस्तके ठेवणे केव्हाही चांगले. त्या भाषेचे कोणी तुम्हाला क्षेत्रात भेटले किंवा त्या भाषेची कोणी आस्थेवाईक व्यक्‍ती सभांना उपस्थित राहू लागली तर यांचा लाभ होईल. ही पुस्तके पुन्हा छापण्याची आमची योजना नाही हे लक्षात ठेवा—सध्याचा साठा संपल्यावर तुम्हाला कदाचित पुन्हा कधीच नवीन प्रती मिळणार नाहीत!

४ सेवेत भाग घेत असताना यातील काही प्रकाशने तुम्ही सोबत ठेवावीत असे प्रोत्साहनही आम्ही तुम्हाला देत आहोत. केवळ खास सादरता मोहिमांमध्येच नव्हे, तर वर्षादरम्यान केव्हाही तुम्ही ही पुस्तके २.५० रुपयांच्या खास दरात सादर करू शकता हे लक्षात ठेवा. आणि त्यांचा संच तुम्ही सादर करू शकता—उदाहरणार्थ, तुम्ही एखादे पुस्तक दाखवू शकता आणि मग चार पुस्तके १० रुपयांसाठी सादर करू शकता. उत्क्रांती आणि सद्य जीवन यांसारखी पुष्कळशी पुस्तके, एखाद्या विशिष्ट विषयावर खास माहिती देतात आणि घरमालकाने तो विषय काढलाच तर त्यांचा फायदेकारक रीतीने उपयोग करता येऊ शकतो.

५ सर्व पुस्तके असलेले ईश्‍वरशासित पुस्तकालय एक मौल्यवान ठेवा आहे; एखाद्या विशिष्ट विषयावरील जुन्या पुस्तकांमधली तपशीलवार माहिती तपासून पाहिल्याने आपले शास्त्रवचनीय ज्ञान वाढवण्यास आपल्याला मदत मिळते. शिवाय, सेवेत असताना घरमालकाचे लक्ष वेधणारे उचित पुस्तक असल्यास, सुंदर संभाषण सुरू होऊ शकते मग बायबल अभ्यास सुरू होऊ शकतो आणि त्या व्यक्‍तीला जीवनाच्या मार्गावर आणले जाऊ शकते. म्हणून, तुम्ही तुमच्या मंडळीद्वारे वर दिलेल्या पुस्तकांचा पुरेसा साठा मागवावा आणि तुमच्या व्यक्‍तिगत अभ्यासाकरता आणि क्षेत्रात त्यांचा उत्तम उपयोग करावा असे उत्तेजन आम्ही तुम्हाला देत आहोत.—नीति. २:१०, ११.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा