वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९७ पृ. १
  • सभा सत्कर्मे करावयास उत्तेजन देतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सभा सत्कर्मे करावयास उत्तेजन देतात
  • आमची राज्य सेवा—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना गेल्यामुळे तुम्हाला कोणते फायदे होतील?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • उपासनेकरता एकत्र जमणं महत्त्वाचं का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • क्षेत्र सेवेच्या सभा
    आमची राज्य सेवा—२००९
  • तुमची वहिवाट काय आहे?
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९७
km ८/९७ पृ. १

सभा सत्कर्मे करावयास उत्तेजन देतात

१ मंडळीच्या सभांना उपस्थित राहणे व क्षेत्र सेवेत सहभागी होणे हे आपल्या भक्‍तीचे दोन आवश्‍यक पैलू आहेत. जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू. एकाचा प्रभाव दुसऱ्‍यावर पडत असतो. ख्रिस्ती सभा, सत्कर्मे करावयास उत्तेजन देतात व त्यातल्या त्यात सर्वोत्तम अशी सत्कर्मे म्हणजे राज्य प्रचाराचे व शिष्य बनविण्याचे कार्य. (इब्री. १०:२४) आपण सभांना उपस्थित राहण्याचेच जर सोडून दिले तर कदाचित प्रचार कार्यातून अंग काढून घेण्यास आपल्याला जास्त वेळ लागणार नाही; याचे कारण प्रचार करण्याचे उत्तेजनच आपल्याला मिळणार नाही.

२ साप्ताहिक सभांमध्ये आपल्याला प्रचार करण्याची चेतना देणारा आध्यात्मिक बोध मिळतो. वेळेच्या निकडीवर वारंवार जोर देऊन बायबलचा जीवनदायी संदेश इतरांना सांगण्यास आपल्याला प्रवृत्त केले जाते. प्रचार कार्यात टिकून राहण्यास आपल्याला उत्तेजन व बळ दिले जाते. (मत्त. २४:१३, १४) सभांमध्ये विवेचने मांडण्याच्या संधींचा फायदा घेतल्याने इतरांपाशी आपला विश्‍वास अभिव्यक्‍त करण्याची आपल्याला चांगलीच सवय होऊन जाते. (इब्री. १०:२३) ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत नाव नोंदवल्याने, अधिक प्रभावशाली सेवक बनण्याचे व आपली शिकवण्याची कौशल्ये सुधारण्याचे प्रशिक्षण आपल्याला मिळते.—२ तीम. ४:२.

३ कशाप्रकारे सेवा सभा, प्रचार करण्यास आपल्याला उत्तेजन देतात: आमची राज्य सेवा यातील माहिती आधीपासूनच अभ्यासण्याचे उत्तेजन आपणा सर्वांना दिले जाते. मग आपण सेवा सभेला उपस्थितीत राहून तेथे व्यासपीठावर प्रस्तुतींची प्रात्यक्षिके पाहतो, तेव्हा ही माहिती आपल्या मनावर बिंबवली जाते. मग क्षेत्र सेवेत गेल्यावर, आमची राज्य सेवा यातील मुद्द्‌यांचा आपण पुन्हा एकवार विचार करू शकतो, प्रस्तुतींची प्रात्यक्षिके आठवू शकतो; तेणेकडून आपल्याला अधिक प्रभावशाली साक्ष देता येईल. अनेक प्रचारकांचा हाच अनुभव आहे.

४ सेवा सभेमध्ये शिकलेल्या गोष्टी अंमलात आणण्यासाठी काही जण इतरांसोबत सेवेत जाण्याची व्यवस्था करतात. क्षेत्राचे मुद्दे प्रचारकांच्या मनांत अद्याप ताजेच असल्यामुळे हे मुद्दे अंमलात आणण्यासाठी ते उद्दीपित होतात; याचे कारण प्रत्येक सप्ताहात प्रचार कार्यात सहभाग घेण्याचे उत्तेजन त्यांना सभांपासून मिळालेले असते.

५ आपल्या सहउपासकांसोबत आपण जेथे एकत्र होतो व सत्कर्मे करावयास उत्तेजित होतो त्या ख्रिस्ती सभांना दुसरा कोणताही पर्याय नाही. आपल्या सेवेचा उत्कर्ष व्हायचा असल्यास आपण नियमितपणे मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्यास हवे. “आपले एकत्र मिळणे न सोडता” आपण यहोवापासून येणाऱ्‍या या अद्‌भुत तरतुदीची कदर करू या.—इब्री. १०:२५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा