वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९७ पृ. २
  • जूनसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जूनसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९७
  • उपशिर्षक
  • जून २ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून ९ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून १६ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून २३ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून ३० ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९७
km ६/९७ पृ. २

जूनसाठी सेवा सभा

जून २ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १८१ (१७)

८ मि:स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. देशासाठी आणि स्थानिक मंडळीसाठी असणाऱ्‍या फेब्रुवारीच्या क्षेत्र सेवा अहवालावर विवेचन मांडा.

१५ मि:‘होईल तितके करा.’ प्रश्‍नोत्तरे.—एप्रिल १५, १९९३, टेहळणी बुरूज, (इंग्रजी) पृष्ठे २८-३० देखील पाहा.

२२ मि:“देवाकडील ज्ञान अनेक प्रश्‍नांची उत्तरे देते.” एक तरुण व्यक्‍ती व दोन अथवा तीन प्रचारकांसोबत अध्यक्ष सदर लेखाची चर्चा करतात. परिच्छेद १ वर विवेचन मांडून, प्रश्‍नांची उत्तरे देण्याकरता ज्ञान पुस्तक आपल्याकरता इतके परिणामकारक का आहे यावर जोर द्या. एका सराव सत्राचे प्रात्यक्षिक दाखवा आणि प्रत्येक प्रस्तुतीनंतर सुधारणा करण्यासाठी सूचना द्या.

गीत २०० (२३) व समाप्तीची प्रार्थना.

जून ९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १८९ (४)

१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

१५ मि:पावसाळ्याच्या स्मरणिका. भाषण व श्रोतेगणांसोबत चर्चा. देशातल्या अनेक भागांमधील धुँवाधार पावसामुळे नित्याचे जीवन बहुधा विस्कळीत होऊन जाते. ईश्‍वरशासित कार्यहालचालींची उपेक्षा होऊ नये म्हणून कार्यहालचालींचे संघटन आपण कसे करू शकतो बरे? पुढील गोष्टींची चर्चा करा: (१) नियमितपणे सभांना उपस्थित राहणे. (२) सेवेत नियमितपणे भाग घेण्याची योजना करणे; महिन्याच्या अखेरीस हवामान बिकट होण्याची शक्यता असल्यास महिन्याच्या सुरवातीलाच जास्त सहभाग घेणे. (३) उचित असेल असा एखादा रेनकोट आणि पावसापासून आपले बायबल, साहित्य आणि नियतकालिकांचे संरक्षण करील अशी एक योग्य स्वरूपाची बॅग घेणे. (४) शक्य असल्यास उचित असे क्षेत्र निवडणे, जसे की इमारती अथवा जलमय होत नाहीत अशी क्षेत्रे निवडणे. (५) आडोशाला राहून अनौपचारिक साक्षकार्य करता येईल अशी सार्वजनिक ठिकाणे शोधणे. (६) वडिलांनी मंडळीच्या कार्याचे संघटन उत्तम प्रकारे करणे ज्यामुळे अहवाल देत असलेल्या कार्यात घट होणार नाही.

२० मि:इतरांना शिकविणे—एक निकडीची गरज. वडिलांमार्फत भाषण. १९९७ वार्षिकपुस्तक यात पृष्ठ ३३ वरील १९९६ च्या जगव्याप्त सेवा अहवालाची उजळणी करा. जेथे कोठे लोक भेटतात तेथे त्यांना साक्ष देण्याच्या शिकस्तीच्या प्रयत्नांमुळे फलप्राप्ती होत आहे. आता निकडीची गरज म्हणजे, सर्व वाटपांचा मागोवा घेणे आणि लोकांना सत्य शिकवणे. आपण सार्वजनिक ठिकाणी लोकांना भेटतो तेव्हा व्यवहार कुशलतेने त्यांच्याकडून त्यांचे नाव आणि त्यांचा पत्ता विचारून घ्या जेणेकरून त्यांना पुनर्भेट दिली जाऊ शकते. राज्याचे बीज पेरण्यापेक्षा अधिक काही करण्याची आपल्याला गरज आहे; त्यास आपण पाणीही घातले पाहिजे. (१ करिंथ. ३:६-८) चांगल्या जमिनीत बीज पेरल्यास, समज प्राप्त करण्यासाठी उत्तम शिक्षण व्यक्‍तीला मदत करू शकते. (मत्त. १३:२३) शिक्षण देण्याच्या कार्यात आपण, शक्य असेल तितक्या कौशल्याने आणि पुरेपूर भाग घेण्यास हवा. (इब्री. ५:१२अ) जून १९९६ आमची राज्य सेवा पुरवणीतील परिच्छेद २५-६ मधल्या मुद्द्‌यांचा समावेश करा. अपेक्षा माहितीपत्रकातून अथवा ज्ञान पुस्तकातून अभ्यास सुरू करण्याच्या प्रयत्नावर जोर द्या.

गीत २०४ (२५) व समाप्तीची प्रार्थना.

जून १६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १९२ (२१)

१० मि:स्थानिक घोषणा. चालू अंकांतील बोलण्याजोगे मुद्दे सुचवा.

१५ मि:स्थानिक घोषणा.

२० मि:तुमचा धर्म खरा आहे की खोटा हे ओळखणे. डिसेंबर २२, १९८९ सावध राहा! (इंग्रजी), पृष्ठ १८ यावर आधारित, एक वडील, दोन किंवा तीन कार्यक्षम प्रचारकांसोबत चर्चा करतात. प्रांजळ वाटणाऱ्‍या अनेक लोकांना वारंवार भेटी दिल्या जातात. तथापि, बायबल अभ्यास मात्र ते स्वीकारत नाहीत. अचूक ज्ञानाच्या एकवाक्यतेत कार्यहालचाल करण्याच्या गरजेची त्यांना जाणीव करून देण्यासाठी, या सावध राहा! नियतकालिकाच्या लेखातील मुद्द्‌यांचा उपयोग कसा केला जाऊ शकतो याची चर्चा करा. ज्ञान पुस्तकातील अध्याय ५: “देव कोणाच्या भक्‍तीचा स्वीकार करतो?” यातले मुख्य मुद्दे दाखवा. परिच्छेद २० वाचा. प्रेमळपणे व व्यवहारकुशलतेने, अशा व्यक्‍तींना अभ्यास स्वीकारण्याचे व सभांना उपस्थित राहण्याचे उत्तेजन देण्यासाठी त्यांच्या पुनर्भेटी घेतल्या जाऊ शकतात.

गीत २०१ (८) व समाप्तीची प्रार्थना.

जून २३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १९३ (१८)

१० मि:स्थानिक घोषणा.

१५ मि:आपल्याबद्दल त्यांचे काय मत आहे? टेहळणी बुरूज प्रकाशनांची सूची (इंग्रजी) १९८६-१९९५, पृष्ठे ३४१-३ [किंवा १९८६-९० सूची (इंग्रजी) यातील पृष्ठे २६८-९] यावरील माहितीच्या आधारावर एक भाषण. यहोवाच्या साक्षीदारांबद्दल—आपले आचरण आणि आपले कार्य यांबद्दल ‘इतरांची लक्षणीय विवेचने’ निवडा. इतर जण आपल्यामध्ये जे पाहतात त्यामुळे ते अनुकूलरित्या कसे प्रभावित होतात ते दाखवा. यामुळे सदैव सदाचरण राखण्याची व आपल्या कामात चिकाटी राखण्याची आपल्याला प्रेरणा का मिळावी ते स्पष्ट करा. परिचितांशी व आपल्याबद्दल अधिक जाणून घेणाऱ्‍या आस्थेवाईकांशी बोलताना अशा कृपायुक्‍त विवेचनांचा उपयोग कसा करावा ते दाखवा.

२० मि:“पालकांनो—आपल्या पाल्यांना प्रचार करण्याची तालीम द्या.” प्रश्‍नोत्तरे. आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित पुस्तकात, पृष्ठ १०० वरील “तरुणांना मदत देणे” या उपशीर्षकाखाली दिलेल्या मार्गदर्शनाचाही समावेश करा.

गीत २११ (२२) व समाप्तीची प्रार्थना.

जून ३० ने सुरू होणारा सप्ताह

गीत १९७ (६)

१० मि:स्थानिक घोषणा. सर्वांना जूनचा सेवा अहवाल देण्याचे स्मरण द्या.

२० मि:“युवकांनो—तुमची आध्यात्मिक ध्येये कोणती आहेत?” दोन पिता, सदर लेखाची एकत्र मिळून चर्चा करतात. भौतिक आस्थांचा पाठपुरावा करण्याऐवजी आध्यात्मिक आशीर्वाद देणारी ईश्‍वरशासित ध्येये राखण्याच्या आवश्‍यकतेची जाण राखण्याकरता आपल्या पाल्यांना मदत कशी केली जाऊ शकते याची ते चर्चा करतात.—आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित पुस्तकातील पृष्ठे ११६-१८ देखील पाहा.

१५ मि:जुलैच्या साहित्य सादरतेसाठी तयारी करणे. ज्या माहितीपत्रकांनी स्थानिक क्षेत्रातील लोकांची आस्था वाढवली आहे, अशी एक किंवा दोन माहितीपत्रके निवडा आणि प्रत्येकातील काही प्रमुख मुद्द्‌यांची उजळणी करा. यांस प्रस्तुतीत समाविष्ट करण्याचे काही मार्ग सुचवा. पुन्हा भेट देऊन आस्था विकसित करण्यासाठी वाटपांची नोंद ठेवण्याचे सर्वांना स्मरण द्या.

गीत १०९ (२) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा