घोषणा
◼ साहित्य सादरता
जून: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करण्यावर भर द्या.
जुलै आणि ऑगस्ट: पुढील ३२ पृष्ठांची कोणतीही माहितीपत्रके, ६.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव आपल्याकडून काय अपेक्षितो, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करतो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, आणि सर्वकाळ टिकणारे ईश्वरी नाम (इंग्रजी).
सप्टेंबर: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात.
◼ संस्था, प्रचारकांच्या वैयक्तिक साहित्य मागण्यांची पूर्ती करत नाही. मंडळीची मासिक साहित्य मागणी संस्थेला पाठवण्यापूर्वी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी प्रत्येक महिन्याला एक घोषणा करण्याची योजना करावी; यामुळे, वैयक्तिक साहित्य प्राप्त करू इच्छिणारे सर्व जण साहित्य हाताळणाऱ्या बांधवास त्याबद्दलची माहिती देऊ शकतील. कोणती प्रकाशने, खास मागणीची आहेत ते कृपया लक्षात ठेवा.
◼ येत्या जुलैपासून, प्रवासी पर्यवेक्षक त्यांच्या भेटींदरम्यान “यहोवाची स्तुती करण्याकरता शिक्षणाचा उपयोग करा” या विषयावर जाहीर व्याख्यान आणि “दृष्य संघटनेच्या सोबत चाला” या विषयावर समारोपाचे भाषण देतील. गुरुवारी (किंवा शुक्रवारी) होणाऱ्या त्यांच्या पहिल्या सेवा भाषणाचा विषय आहे: “धैर्यवान व्हा आणि प्रचार करा!”
◼ अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या कोणा एकाने, जून १ रोजी किंवा त्यानंतर शक्य असेल तितक्या लवकर, मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे केल्यावर मंडळीत त्याची घोषणा करावी.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
यहोवाचे साक्षीदार आणि शिक्षण (इंग्रजी) —मल्याळम, तामीळ
सन १९९५ मध्ये इंग्रजीत प्रकाशित झालेले हे माहितीपत्रक पहिल्यांदाच भारतीय भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे. सर्व पालकांनी आपल्या मुलांसोबत याचा अभ्यास करावा व मुलांच्या शिक्षकांनाही ते सादर करावे, असे उत्तेजन आम्ही त्यांना देतो. मुले स्वतः, नियमितपणे याच्या प्रती शाळेला नेऊन, शक्य तितक्या शिक्षकांमध्ये त्यांचे वाटप करू शकतात.
आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित (सुधारित आवृत्ती १९९७) —मल्याळम