युवकांनो—तुमची आध्यात्मिक ध्येये कोणती आहेत?
१ आनंद मिळविण्यात, अर्थपूर्ण कार्य आणि साध्य होण्याजोगी ध्येये यांचा किती मोठा वाटा आहे हे यहोवा जाणतो. (पाहा उत्पत्ति १:२८; २:१५, १९.) आज यहोवाने आपल्या लोकांना, प्रचार करण्याची व शिकवण्याची कार्यनियुक्ती दिली आहे. परादीसमधील सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याचे अंतिम ध्येयही आपल्यासमोर आहे. दरम्यान, आपल्याला आपली शक्ती व साधनसामग्री चुकीच्या मार्गी लावायची नसल्यास, प्रगमनशील आध्यात्मिक ध्येये राखण्याची गरज आहे.—१ करिंथ. ९:२६.
२ युवकांसाठी वास्तविक ध्येये: युवकांनी आपल्या वैयक्तिक कार्यक्षमतांनुसार त्यांच्या आवाक्यात असणारी ईश्वरशासित ध्येये राखली पाहिजेत. (१ तीम. ४:१५) काही लहानग्यांनी तर वाचायला शिकण्याआधीच, बायबलची पुस्तके तोंडपाठ करण्याचे ध्येय गाठले आहे. कौटुंबिक अभ्यासामार्फत मुले, सभांची तयारी करण्यास शिकतात ज्यामुळे अर्थपूर्ण विवेचने मांडण्याची व ईश्वरशासित सेवा प्रशालेत नाव नोंदवण्याची ध्येये ते गाठू शकतात. मुले आपल्या पालकांबरोबर क्षेत्र सेवेत जातात तेव्हा, बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक होण्याच्या ध्येयाप्रत प्रगती करत असताना साक्ष देण्यात सहभागी होण्यासही ती शिकतात. पालकांनी आपल्या पाल्यांपुढे समर्पण आणि बाप्तिस्म्याचे ध्येय राखण्यावर जोर द्यावा.
३ तुम्ही किशोरवयीन असल्यास, तुमच्या आध्यात्मिक ध्येयांमध्ये कोणकोणत्या ध्येयांचा समावेश होतो? जीवनात खरोखर महत्त्वपूर्ण वाटणाऱ्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करून, ‘आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मरा.’ (उप. १२:१; स्तोत्र ७१:१७) शाळेला सुट्ट्या असतात त्या महिन्यांत सहायक पायनियरींग का करू नये बरे? एक नियमित पायनियर म्हणून पूर्ण वेळेची सेवा हाती घेण्याचा तुम्ही विचार केला आहे का? भावी काळात, तुमच्या क्षेत्रातील अथवा दुसऱ्या कोणत्या ठिकाणी, विदेशी भाषा बोलणाऱ्या एखाद्या गटाला किंवा मंडळीला मदत करण्याच्या उद्देशाने एखादी नवीन भाषा शिकून घेण्याबाबत कसे राहील? सध्या बेथेलमध्ये सेवा करणारे किंवा प्रवासी पर्यवेक्षक अथवा मिशनरी म्हणून सेवा करणाऱ्या अनेकांनी, ते शाळेत असतानाच खास पूर्ण वेळेच्या सेवेचे ध्येय स्वतः समोर ठेवले होते. तुम्हीही असेच का करू नये बरे?
४ कोवळ्या वयापासूनच, येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यास झटा. अगदी लहान वयात म्हणजे अवघ्या १२ वर्षांचा असताना येशू आध्यात्मिक गोष्टींविषयी सहजासहजी बोलला. (लूक २:४२-४९, ५२) वैयक्तिक अभ्यास करण्यासाठी, दररोज बायबलचे वाचन करण्यासाठी तसेच सभा व सेवेमध्ये प्रौढ ख्रिश्चनांसोबत नियमितपणे सहवास राखण्यासाठी आपल्या समोर फायदेशीर ध्येये राखल्यामुळे, येशूने शिकवले त्याप्रमाणे इतरांना देवाच्या राज्याविषयी शिकवण्याची कुशलता आत्मसात करण्यासाठी आपल्याला मदत होईल.