वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९७ पृ. १
  • ‘होईल तितके करा’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘होईल तितके करा’
  • आमची राज्य सेवा—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • “तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • स्वतःला ‘निष्कलंक, निर्दोष आणि शांतीत’ राखा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • यहोवाच्या सेवेत कार्यमग्न राहणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • आपल्या परीने यहोवाला सर्वात चांगलं ते द्या आणि आनंदी राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९७
km ६/९७ पृ. १

‘होईल तितके करा’

१ आपण यहोवाला स्वतःचे समर्पण केले तेव्हा, त्याच्यासाठी आपल्या परीने होता होईल तितके करण्याची आणभाक आपण केली होती. यथोचितपणे, प्रेषित पेत्राने पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना, यहोवा समोरील त्यांच्या योग्यतेची खात्री करण्यासाठी होता होईल तितके करण्याचे उत्तेजन दिले. (२ पेत्र १:१०) सद्यकाळात, यहोवाची सेवा करून त्याला प्रसन्‍न करण्यास आपण निश्‍चित होईल तितके करू इच्छितो. यात काय अंतर्भूत आहे? यहोवाबरोबरील आपला नातेसंबंध अधिक दृढ होतो व त्याने आपल्यासाठी जे काही केले आहे त्याचा आपण गहन विचार करतो तेव्हा, त्याला अत्युत्तम सेवा सादर करण्याची अंतःकरणापासून आपल्याला प्रेरणा मिळते. आपण आपल्या सेवेचा दर्जा आणि शक्यतो सेवेतील आपला सहभागही वाढवू इच्छितो.—स्तोत्र ३४:८; २ तीम. २:१५.

२ सेवेतील आपला सहभाग अधिक वाढवू इच्छिणाऱ्‍या एका तरुण बांधवाला असे दिसून आले, की देवाच्या वचनाचा नियमित अभ्यास केल्यामुळे यहोवाबद्दल असणारी त्याची कृतज्ञता वाढली शिवाय त्याचा आवेशही अधिक वाढला. यामुळे पायनियर सेवेकरता अर्ज करण्याची त्याला प्रेरणा मिळाली. अनोळखी व्यक्‍तींशी बोलण्यास कचरत असणाऱ्‍या एका बहिणीने युक्‍तिवाद पुस्तकातील काही प्रस्तुतींचा सराव केला व अल्पावधीतच ती आपल्या सेवेत मोठे यश अनुभवू लागली. एका दांपत्यासोबत ती बायबल अभ्यास संचालित करू शकली ज्यांनी नंतर सत्य स्वीकारले.

३ तुम्ही जे काही करू शकता त्यात आनंद माना: आपल्यातील काहीजण निकृष्ट आरोग्य, कौटुंबिक विरोध, दारिद्रय अथवा क्षेत्रातील औदासीन्यता यांसारख्या कठीण समस्या अनुभवतात. या शेवटल्या काळांत सर्वसामान्य असणाऱ्‍या इतर अनेक समस्या आपल्या सेवेस कदाचित बाधक ठरू शकतील. (लूक २१:३४, NW तळटीप; २ तीम. ३:१) याचा अर्थ, यहोवाला केलेल्या आपल्या समर्पणासंबंधी आपण उणे पडलो आहोत असा होतो का? नाही, त्याची सेवा करण्यात आपण होता होईल तितके करत असल्यास आपण निश्‍चितच उणे पडलेलो नाही.

४ इतर जण जे काही साध्य करू शकतात त्या आधारावर स्वतःचा न्याय करणे शहाणपणाचे नाही. उलटपक्षी, “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी,” असे उत्तेजन शास्त्रवचने आपल्याला देतात. आपल्या परीने शक्य आहे त्या टोकापर्यंत स्वतःस झोकून दिल्याने यहोवा तर प्रसन्‍न होतोच शिवाय, आपल्यालाही “अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.”—गलती. ६:४; कलस्सै. ३:२३, २४.

५ “निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला [देवाला] आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा,” या पौलाच्या शब्दांकडे आपण लक्ष देऊ. (२ पेत्र ३:१४) हा आत्मा आपल्याला सुरक्षिततेची जाणीव देईल व केवळ यहोवाच देऊ शकतो अशी मनाची शांती प्रदान करील.—स्तोत्र ४:८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा