मेसाठी सेवा सभा
मे ५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १३० (२२)
१० मि:स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. ईश्वरशासित वृत्त.
१२ मि:‘निरंतर येशूला अनुसरा.’ प्रश्नोत्तरे. जून १, १९९३ टेहळणी बुरूज, पृष्ठ १०, ११ वरील अनुभवांचा समावेश करा.
२३ मि:“आस्था दाखवलेल्या सर्वांसाठी खरी कळकळ दाखवा.” श्रोतेगणांबरोबर चर्चा. दाखवलेल्या आस्थेचा मागोवा घेण्याच्या गरजेवर भर द्या. सार्वजनिक ठिकाणी भेटणाऱ्या लोकांना अधिक साक्ष देण्यासाठी त्यांच्याकडून त्यांचा नावपत्ता प्राप्त करण्याचे काही व्यवहारकुशल मार्ग सूचवा. परिच्छेद ६-९ मध्ये सुचवलेल्या प्रस्तुतींपैकी दोन प्रस्तुतींचे, कार्यक्षम प्रचारकांकडून प्रात्यक्षिक करून घ्या. मार्च १९९७ ची आमची राज्य सेवा, पृष्ठ ३ वरील “पुनर्भेट करण्यात यशस्वी कसे होता येईल” या पेटीची उजळणी करा. प्रत्येक सप्ताहात पुनर्भेटी करण्यासाठी काही वेळ राखून ठेवण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.
गीत १५१ (१८) व समाप्तीची प्रार्थना.
मे १२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १३३ (३)
१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.
१२ मि:प्रश्न पेटी. वडिलांद्वारे भाषण.
२३ मि:“पत्रिकांचा उपयोग करून तुमचा प्रकाश प्रकाशू द्या.” प्रश्नोत्तरे. परिच्छेद ६ आणि ७ मध्ये असलेल्या संभाषणांचे प्रात्यक्षिक करून दाखवा. अनेकविध भाषांतील पत्रिका नेहमी सोबत घेऊन जाण्याचे प्रचारकांना उत्तेजन द्या व मंडळीत उपलब्ध असलेल्या पत्रिकांचा उल्लेख करा.
गीत १६२ (१८) व समाप्तीची प्रार्थना.
मे १९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १३९ (१६)
७ मि:स्थानिक घोषणा. मे २६ साठी आखलेल्या खास क्षेत्र सेवा व्यवस्थांची घोषणा करा.
२० मि:“प्रगतिशील गृह बायबल अभ्यास संचालित करणे.” कार्यक्षम बांधव, बायबल अभ्यास संचालित करण्यात यशस्वी असलेल्या एकदोन प्रचारकांसोबत लेखाची चर्चा करतो. समगतीने अभ्यास चालू ठेवण्यास तसेच विद्यार्थी काय शिकत आहे हे अजमावण्यास मदत करणाऱ्या शैक्षणिक पद्धती कथित करण्यासाठी प्रचारक, ज्ञान पुस्तकातील मुद्द्यांचा उदाहरणादाखल वापर करतात.—पाहा जून १९९६ आमची राज्य सेवा पुरवणी, परिच्छेद ५, ८, १२, आणि २१.
१८ मि:“वर्गण्या कशा हाताळाव्यात.” प्रश्नोत्तरे. “उत्तम सेवेची हमी मिळवण्यासाठी तुम्ही काय करू शकता,” या पेटीतील लागू करण्याजोग्या मुद्द्यांची उजळणी करा. अचूकता, निटनेटकेपणा आणि तत्परता यांवर जोर द्या. वर्गण्या प्राप्त करताना, ही पुरवणी संदर्भाकरता हाताशी ठेवण्याची सूचना प्रचारकांना द्या.
गीत १६५ (२०) व समाप्तीची प्रार्थना.
मे २६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १४८ (६)
१५ मि:स्थानिक घोषणा. जूनच्या साहित्य सादरतेची उजळणी करा. संक्षिप्त प्रस्तुती तयार करण्यासाठी ज्ञान पुस्तकाचा उपयोग करून पृष्ठे १०-११ वरील परिच्छेद १७-१९ मध्ये दिलेल्या विचारांचा वापर कसा केला जाऊ शकतो ते स्पष्ट करा. बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने अधिकतर प्रयत्न करण्याचे सर्वांना प्रोत्साहन द्या. जलद प्रगती करण्यास आस्थेवाईकांना मदत करण्याच्या गरजेवर भर द्या.—जानेवारी १५, १९९६, टेहळणी बुरूज, पृष्ठे १३-१४ पाहा.
१२ मि:“आपण वारंवार भेटी का घेत असतो?” प्रश्नोत्तरे. उद्घोषक (इंग्रजी) पुस्तकात पृष्ठ ५७० वरील पेटीतले मुद्दे समाविष्ट करा.
१८ मि:स्थानिक गरजा. वडिलांचे भाषण अथवा मंडळीच्या एखाद्या आध्यात्मिक गरजेवर केंद्रित, दोन वडिलांमधील चर्चा. सुधारणेसाठी शास्त्रवचनीय बोध आणि व्यावहारिक सूचना द्या.
गीत १७४ (२२) व समाप्तीची प्रार्थना.