प्रश्न पेटी
◼ आपण आपल्या सेवेत कार्यरत असताना, कोणा विरुद्ध लिंगी व्यक्तीच्या संपर्कात येतो तेव्हा कोणकोणती सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे?
आपले बंधूभगिनी, त्यांच्या वैयक्तिक आचरणात नैतिकतेच्या उत्युच्च दर्जांना जडून राहण्याचा उद्देश राखून असतात अशी कारणानिशी आपण अपेक्षा करतो. तथापि, बोटांवर मोजण्याइतकीच नैतिक बंधने असणाऱ्या तसेच मलिन तथा बेलगाम वृत्ती असणाऱ्या जगात आपण वास्तव्य करून आहोत. आपले हेतू शुद्ध असले तरी, निर्भर्त्सना होऊ नये अथवा एखाद्या अनुचित कृत्यात गुरफटले जाऊ नये यासाठी आपण सतत दक्ष असण्यास हवे. यामध्ये, सेवेत कार्यरत असताना चौकस असणे अंतर्भूत आहे.
क्षेत्रात अनेकदा, सत्याबद्दल वरकरणी निखळ आस्था दाखविणाऱ्या विरुद्ध लिंगी व्यक्तींशी आपली गाठ पडत असते. भेट देत असता आपण एकटेच असल्यास, शिवाय घरामध्ये कोणीही नसल्यास आत न जाता दारातून साक्ष देणे बहुधा उत्तम असू शकेल. आस्था दाखवली असल्यास, आपल्या सोबतीला दुसरा एखादा प्रचारक अथवा घरातील इतर सदस्यही उपस्थित असल्यास पुन्हा भेट घेण्याच्या योजना आखल्या जाऊ शकतात. हे शक्य नसल्यास, साधर्म्य लिंगी प्रचारकास ही भेट सोपवली जाऊ शकते. कोणा विरुद्ध लिंगी व्यक्तीसह अभ्यास करण्यासंबंधीही हीच बाब लागू होते.—मत्त. १०:१६.
सेवेत आपल्यासह कार्य करण्यास एखाद्याची निवड करण्याबाबत आपण दक्ष असणे आवश्यक आहे. काही वेळा, विरुद्ध लिंगी प्रचारक एकत्र कार्य करू शकत असले तरी, गटात असतानाच असे करणे उत्तम आहे. सहसा, सेवेत असताना देखील आपला वैवाहिक सोबती नसणाऱ्या कोणा विरुद्ध लिंगी व्यक्तीसोबत एकांतात वेळ घालवत राहणे शहाणपणाचे नाही. यास्तव, सेवा गटावरील जबाबदार बांधवाने एकत्र कार्य करण्यासाठी प्रचारकांना तसेच किशोरवयीनांना नियुक्त करताना उत्तम निर्णयशक्तीचा उपयोग करावा.
नेहमीच उत्तम निर्णयशक्तीचा उपयोग केल्याने, आपण स्वतःला तसेच इतरांना “कोणत्याहि प्रकारे अडखळण्यास कारण” होण्याचे टाळू.—२ करिंथ. ६:३.