वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०७ पृ. १
  • नवे शिष्य बनवण्यात सर्वांचा सहभाग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नवे शिष्य बनवण्यात सर्वांचा सहभाग
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • विद्यार्थ्याला प्रगती करायला सगळेच मदत करू शकतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला आपण इतरांना कशी मदत करू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • जा आणि लोकांना शिष्य करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • बायबल विद्यार्थ्याला प्रगती करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला आपण मदत कशी करू शकतो?—भाग १
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km ४/०७ पृ. १

नवे शिष्य बनवण्यात सर्वांचा सहभाग

१ कोणताही नवा शिष्य हा केवळ एका व्यक्‍तीच्या प्रयत्नांमुळे बनत नाही. बायबल विद्यार्थ्यांच्या आध्यात्मिक विकासाकरता यहोवा आपल्या सर्व ‘सहकाऱ्‍यांचा’ उपयोग करू शकतो. (१ करिंथ. ३:६-९) आपण व्यक्‍तिशः ख्रिस्ती सभांमध्ये स्वतःच्या शब्दांत दिलेल्या अर्थपूर्ण उत्तरांद्वारे नव्या व्यक्‍तींना एकप्रकारे साहाय्य करत असतो. पण याव्यतिरिक्‍त, आपल्या चांगल्या वर्तणुकीद्वारेही आपण देवाचा आत्मा आपल्या जीवनात कार्यरत असल्याचे सिद्ध करतो. (योहा. १३:३५; गलती. ५:२२, २३; इफिस. ४:२२, २३) नव्या व्यक्‍तींना आपण आणखी कोणकोणत्या मार्गांनी मदत करू शकतो?

२ मंडळी या नात्याने: सभांना येऊ लागलेल्या नवीन व्यक्‍तींबद्दल आपण सर्वजण आस्था व्यक्‍त करू शकतो. सभेच्या आधी व नंतर, स्वतः पुढाकार घेऊन आपण त्यांच्याशी मैत्रिपूर्ण संभाषण करू शकतो. एका मनुष्याने पहिल्यांदा सभेला आल्यावर कसा अनुभव आला त्याविषयी सांगितले: “लहानपणापासून मी ज्या चर्चला जात होतो तेथे मला इतक्या वर्षांत भेटले नाहीत इतके इथे एकाच दिवशी प्रामाणिकपणे प्रेमळ लोक भेटले; विशेष म्हणजे ते सर्वजण माझ्याकरता पूर्णपणे अनोळखी होते. हेच सत्य आहे याविषयी माझ्या मनात कुठलीच शंका उरली नाही.” पहिल्या सभेला उपस्थित राहिल्यावर सात महिन्यात या व्यक्‍तीचा बाप्तिस्मा झाला.

३ बायबल विद्यार्थी जसजशी आध्यात्मिक प्रगती करू लागतो तसतशी त्याची मनःपूर्वक प्रशंसा करा. कदाचित तो बऱ्‍याच काळापासून विरोधाला तोंड देत असेल. किंवा तो सभांना नियमित येऊ लागला असेल. किंवा त्याने सभेत उत्तर देण्याचे धैर्य केले असेल. कदाचित त्याने ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत नाव नोंदवले असेल, किंवा सेवाकार्यात सहभाग घेण्यास सुरुवात केली असेल. जी काही प्रगती त्याने केली असेल त्याबद्दल त्याची प्रशंसा करा. यामुळे त्याला नव्याने उत्साह आणि उत्तेजन मिळेल.—नीति. २५:११.

४ बायबल अभ्यास घेणारा या नात्याने: काही प्रचारक आपल्या बायबल विद्यार्थ्यांचा मंडळीतल्या निरनिराळ्या व्यक्‍तींशी परिचय वाढावा म्हणून वेळोवेळी इतर प्रचारकांना आपल्यासोबत अभ्यासाकरता येण्याची विनंती करतात. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मंडळीच्या सभांना येण्याचे निमंत्रण द्या. ते सभेला येऊ लागतात तेव्हा त्यांची इतरांशी ओळख करून देण्यास विसरू नका. कदाचित तुमचा विद्यार्थी धूम्रपानासारख्या वाईट सवयीवर मात करण्याचा प्रयत्न करत असेल. किंवा त्याच्या घरातले लोक त्याच्या अभ्यासाला विरोध करत असतील. अशावेळी त्याच्यासारख्याच समस्येला तोंड दिलेल्या व तिच्यावर मात केलेल्या एखाद्या प्रचारकाशी बोलल्यामुळे त्याला मदत मिळू शकेल.—१ पेत्र ५:९.

५ नवीन व्यक्‍तींना मंडळीकडून आध्यात्मिक साहाय्याची गरज असते. त्यांच्याबद्दल प्रामाणिक आस्था दाखवून सर्वजण त्यांना आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत करू शकतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा