जानेवारीसाठी सेवा सभा
जानेवारी ६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ६ (४)
१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. देशाच्या आणि स्थानिक मंडळीच्या सप्टेंबर महिन्याच्या क्षेत्र सेवा अहवालावर विवेचन मांडा.
२० मि: आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्तता कार्डाचे नविनीकरण करण्याची वेळ. हे कार्ड पूर्णपणे भरण्याच्या आणि ते सदैव आपल्यासोबत बाळगण्याच्या महत्त्वावर कार्यक्षम वडील चर्चा करतात. आणीबाणीच्या प्रसंगी तुम्हाला बोलता येणे दुरापास्त झाल्यास हा दस्तऐवज तुमचा प्रवक्ता होऊ शकतो. (पडताळा नीति. २२:३.) रक्तास नकार दर्शविणारा चालू जाहीरनामा देण्याकरता दर वर्षी नवीन कार्ड भरण्याची गरज आहे कारण काही डॉक्टांनी तसेच इतरांनीही असा दावा केला आहे, की एका वर्षापेक्षा जुने असलेले दस्तऐवजामुळे एखाद्याचे चालू निश्चित मत कदाचित स्पष्ट होणार नाही. सभा संपल्यानंतर सर्व बाप्तिस्माप्राप्त प्रचारकांनी साहित्य कक्षावरून आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्तता कार्ड घ्यावे आणि ज्यांना बाप्तिस्मा न झालेली लहान मुले आहेत अशांनी आपल्या प्रत्येक मुलाकरता ओळखपत्र प्राप्त करावे. ही कार्डे सभेनंतर लगेच भरू नयेत, असे सांगा. ती काळजीपूर्वक घरी भरण्यात यावीत परंतु त्यांवर स्वाक्षरी करू नये. या कार्डांवरील स्वाक्षरी, साक्ष आणि तारीख टाकणे मंडळीच्या पुढील पुस्तक अभ्यासाच्यावेळी पुस्तक अभ्यास संचालकाच्या देखरेखीखाली करण्यात येईल. त्याच्या गटातील सर्वांना हे कार्ड मिळाल्याची तो खात्री करील आणि त्यांना आवश्यक ती मदत करील. साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करणाऱ्यांनी कार्ड बाळगणाऱ्याची दस्तऐवजावरील स्वाक्षरी प्रत्यक्ष पाहण्यास हवी. त्यावेळी अनुपस्थित असलेल्यांना पुढील सेवा सभेच्या वेळी जोपर्यंत सर्व बाप्तिस्माप्राप्त प्रचारक आपली कार्डे योग्यपणे भरत नाहीत आणि त्यांवर स्वाक्षरी करीत नाहीत तोपर्यंत संचालक/वडील त्यांना मदत करतील. (ऑक्टोबर १५, १९९१ च्या पत्राचे पुनरावलोकन करा.) बाप्तिस्मा न झालेले प्रचारक त्यांची इच्छा असल्यास या कार्डावरील भाषेत परिस्थितींनुसार आणि मतांनुसार फेरफार करून आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी स्वतः आपले मार्गदर्शक कार्ड लिहून तयार करू शकतात. या महत्त्वपूर्ण गोष्टींवर सूक्ष्म दृष्टी ठेवल्याने यहोवा त्यास योग्य समजेल.—नीति. १६:२०.
१५ मि: “इतरांना शिकविण्यासाठी पात्र आणि सुसज्जीत.” (परिच्छेद १-६) यहोवाच्या मदतीने आपण प्रभावीपणे इतरांना शिकवू शकतो असा आत्मविश्वास असण्याच्या गरजेवर जोर देऊन परिच्छेद १-२ वर त्रोटक विवेचने मांडा. प्रचारक-घरमालक अशा दोन जोड्या घेऊन परिच्छेद ३-६ मधील प्रस्तुतींचे प्रात्यक्षिक दाखवा. आरंभीची आणि पुनः भेट कशी घ्यावी, हे प्रत्येक जोडी करून दाखविल.
गीत १४ (६) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी १३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १६ (१०१)
१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. चालू नियतकालिकांमधील बोलण्याजोगे काही मुद्दे दाखवा. अनौपचारिकपणे साक्ष देता यावी म्हणून आपण आपली ओळख लोकांना कशा प्रकारे करून द्यावी यावर सूचना सादर करा. दुकानांत, रस्त्यांत, बागेत, सार्वजनिक वाहतूक यांसारख्या इतर ठिकांणी श्रोत्यांनी कोणते आरंभीचे शब्द उपयोगात आणले आहेत, हे सांगण्यासाठी त्यांना आमंत्रण द्या.
१० मि: “इतरांना शिकविण्यासाठी पात्र आणि सुसज्जीत.” (परिच्छेद ७-९) सन १९९५ वार्षिक पुस्तक (इंग्रजी), पृष्ठ ४५ वरील पुनर्भेटी करण्याचा अनुभव कथन करून मिळालेल्या आस्थेचा मागोवा घेण्याच्या महत्त्वावर जोर द्या. परिच्छेद ७-८ मधील प्रस्तुतींवर अनुभवी प्रचाराकरवी प्रात्यक्षिक करून घ्या. सुरवातीला इतर प्रकाशने सादर करण्यात आली तरी अखेरीस ज्ञान पुस्तकाच्या साह्याने बायबल अभ्यास संचालित करण्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. येणाऱ्या सप्ताहात पुनर्भेटी करण्यासाठी काही वेळ राखून ठेवण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.
२५ मि: “आपल्या देवाच्या भवनाकडे आपले दुर्लक्ष होता कामा नये.” पुरवणीची प्रश्नोत्तराने चर्चा. स्थानिकरीत्या लागू करा. तुमच्या मंडळीचे स्वतःचे सभागृह असावे म्हणून आणि ते असल्यास त्याची चांगल्या प्रकारे देखभाल करण्याचे प्रोत्साहन द्या. तुमच्या मंडळीच्या इमारतीच्या प्रकल्पाचे काम चालू असल्यास किंवा अलीकडेच पूर्ण झाले असल्यास बांधवांनी दिलेल्या भौतिक आणि इतर साह्याबद्दल त्यांची वाखाणणी करा. तुमच्या सभेच्या ठिकाणी ‘बांधकाम निधी’ असे नाव असलेल्या पेटीकडे लक्ष वेधा आणि हे दाखवून द्या, की संपूर्ण देशातील मंडळ्यांना आपापले राज्य सभागृह उभारता यावे म्हणून या पेटीत टाकली जाणारी रक्कम संस्थेचा राष्ट्रीय राज्य सभागृह निधी म्हणून प्रत्येक महिन्याला संस्थेला पाठविले जाते. (ऑगस्ट २१, १९९५ चे संस्थेचे पत्र पाहा.) परिच्छेद १७ वाचा.
गीत १५ (११९) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी २० ने सुरू होणारा सप्ताह
गीत २१ (१)
१० मि: स्थानिक घोषणा.
१८ मि: “सर्व माणसांचे तारण व्हावे.” प्रश्नोत्तरे. वेगवेगळ्या पार्श्वभूमींतील लोकांकडून आपल्याला कशा प्रकारे अनुकूल प्रतिसाद मिळाला हे दाखविणारे काही अनुभव त्रोटकपणे सांगण्यासाठी श्रोत्यांना निमंत्रण द्या.
१७ मि: स्थानिक गरजा. किंवा टेहळणी बुरूज, एप्रिल १, १९९६ अंकातील “तुम्ही आपला भार नेहमी यहोवावर टाका” पृष्ठे २७-९ वरील लेखावर उत्साहवर्धक भाषण.
गीत २३ (९३) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी २७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २० (५५)
५ मि: स्थानिक घोषणा.
१० मि: सचिवांद्वारे प्रश्न पेटीची उजळणी.
१५ मि: “आपण ‘वचनाची घोषणा’ करतो.” प्रश्नोत्तरे. आपण देवाच्या वचनाला इतके मोलाचे का समजतो आणि आपल्या सेवाकार्यातील प्रत्येक संधीच्या वेळी त्याचा उपयोग का करतो, यावरील विवेचनांचा समावेश करा.—पाहा मार्च २२, १९८४, सावध राहा! (इंग्रजी), पृष्ठे ९-११.
१५ मि: फेब्रुवारीच्या साहित्य सादरतेची उजळणी करा. पुस्तकातील मुख्य वैशिष्टे दाखवा जसे: (१) अध्यायाची ठसठशीत शीर्षके, (२) रंगीत चित्रे, (३) बोधक रकाने आणि तक्ते तसेच (४) प्रेरक छापील प्रश्न. सभेच्या आधीच्या भागाच्या एकवाक्यतेत, प्रस्तुतीमधील निवडक शास्त्रवचन वापरण्याचे उत्तेजन द्या. एक किंवा दोन प्रात्यक्षिके थोडक्यात दाखवा. या सप्ताहात उपयोग करण्यासाठी पुस्तके घेण्याचे सर्वांना आठवण करून द्या.
गीत २६ (९) व समाप्तीची प्रार्थना.