वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९७ पृ. १
  • आपण “वचनाची घोषणा” करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण “वचनाची घोषणा” करतो
  • आमची राज्य सेवा—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • ‘करा घोषणा वचनाची!’
    यहोवाचे गुणगान करा
  • संदेश सांगू या!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • आनंदाच्या संदेशाचा प्रचार कसा केला जात आहे?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • सत्याच्या देवाचे अनुकरण करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९७
km १/९७ पृ. १

आपण “वचनाची घोषणा” करतो

१ बायबलमध्ये वर्णन केलेल्या ‘शेवटल्या काळाचा’ प्रत्यय म्हणून आज अनेक लोक “सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप” दाखवतात. (२ तीम. ३:१, ५) आपल्या कळपांना अस्सल आध्यात्मिक मार्गदर्शन देण्यात धर्मपुढाऱ्‍यांना आलेले अपेश हे याचे कारण आहे. ख्रिस्ती धर्मजगताचे पाळक बायबलचे समर्थन करत नाहीत. तत्त्वज्ञानी आणि वेदांती लोकांच्या निरर्थक शिकवणुकींची पोपटपंची करण्यास त्यांना आवडते किंवा देवाच्या वचनाची घोषणा करण्याऐवजी सामाजिक आणि राजकीय मुद्द्‌यांवर विचार करण्यास त्यांना आवडते. अनेक धार्मिक नेते बायबलवर विश्‍वास ठेवत नाहीत. त्यांना वाटते, की ते फार जुने आहे आणि म्हणून ते महान निर्माणकर्त्याच्या बायबलमधील शिकवणुकीऐवजी उत्क्रांतीच्या कल्पनेस हेकटपणे उत्तेजन देतात. कित्येक पाळक देवाच्या व्यक्‍तिगत नावाचा वापर करत नाहीत किंवा आर्वाचीन बायबल भाषांतरांमधून ते काढून टाकण्यात आले म्हणून हरकत घेत नाहीत.

२ येशूच्या दिवसांतील धार्मिक पुढाऱ्‍यांविषयी जसे खरे होते त्याप्रमाणे आजचे पाळक निरर्थक प्रचार करत आहेत. (मत्त. १५:८, ९) संदेष्टा आमोस याने भाकीत केल्याप्रमाणेच हे आहे. हा “दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्‍नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्‍वराची वचने ऐकण्यासंबंधीचा होईल.” (आमो. ८:११) लोकांना सर्व गोष्टींपेक्षा देवाच्या वचनातील आध्यात्मिक अन्‍नाची नितांत आवश्‍यकता आहे.

३ लोकांच्या आध्यात्मिक गरजेस कसे भागवावे: पौलाने तीमथ्याला आर्जवले, की त्याने ‘पवित्र शास्त्रास धरून राहावे जे एखाद्यास तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे’ तसेच इतरांना “वचनाची घोषणा” करण्याची जबाबदारीही त्याने त्याच्यावर गंभीरपणे सोपवली. (२ तीम. ३:१४, १५; ४:२) यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण प्रचार करतो तेव्हा बायबल जे शिकवते त्याजशी आपण जडून राहिले पाहिजे, असे केल्याने आपण आपल्या आदर्श येशूचे अनुकरण करतो ज्याने म्हटले: “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे.” (योहा. ७:१६) आपल्या शिकवणीचा आधार म्हणून आपण देवाचे वचन उपयोगात आणतो कारण आपण हे ओळखून आहोत, की त्यामध्ये ईश्‍वरी बुद्धी सामावलेली आहे आणि आपण इतरांना जी माहिती देतो त्या माहितीचा स्रोत लोकांना कळावा, अशी आपली इच्छा आहे.—१ करिंथ. २:४-७.

४ यहोवाबद्दल शिकण्यासाठी आणि त्यावर विश्‍वास ठेवण्यासाठी लोकांनी प्रथम बायबलमधील सत्य ऐकले पाहिजे. पौलाने तर्कसंगतपणे लिहिले: “ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्‍वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्‍यावाचून ते कसे ऐकतील?” (रोम. १०:१४) अचूक ज्ञानाद्वारे विश्‍वास संपादन व्हावा म्हणून आपण इतरांना प्रचार करण्याद्वारे मदत करतो. अशा प्रकारचे ज्ञान जीवनात सुधार करू शकते आणि करते देखील. इंग्रजी लेखक चार्ल्स डिकन्स यांनी बायबलविषयी असे लिहिले: “हे सर्वोत्तम पुस्तक असून न भूतो न भविष्यती असे त्याच्या बाबतीत म्हणता येते कारण त्यापासून आपल्याला सर्वोत्तम धडा शिकायला मिळतो तसेच सत्यशील आणि विश्‍वासू होण्याचा प्रयत्न करणारा कोणताही मनुष्य संभवतः याद्वारे मार्गदर्शित होऊ शकतो.”

५ आध्यात्मिक सत्यासाठी आसुसलेल्यांना या गोष्टीची कल्पना आहे, की देवाच्या वचनाच्या अधिकारावर हे आधारित आहे. सन १९१३ मध्ये फ्रेडरिक डब्लू. फ्रान्झ तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी होते त्यावेळी त्यांना मृत कोठे आहेत? (इंग्रजी) हे शीर्षक असलेली पुस्तिका देण्यात आली. या प्रश्‍नावरील बायबलचे उत्तर मोठ्या आस्थेने वाचल्यानंतर त्यांनी म्हटले: “हे सत्य आहे.” सत्याचा शोध घेणाऱ्‍या लाखो लोकांनाही असेच वाटले आहे. आपण वचनाची घोषणा शर्थीने आणि आवेशाने करीत राहू या तसेच इतर जण जेव्हा म्हणतात: “हे सत्य आहे” तेव्हा हे शब्द ऐकण्याच्या आनंदातही आपण सहभागी होऊ या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा