बायबल आशा आणि मार्गदर्शन देते
१ “पृथ्वीतलावर आनंद—तो अल्पकाळही उपभोगता येईल अशी शक्यता दिसत नाही. आजार, वार्धक्य, उपासमार, गुन्हेगारी व इतरही अनेक समस्या बहुधा जीवन दुःखी करून टाकतात. तेव्हा, तुम्ही म्हणाल की, या पृथ्वीवरच नंदनवनातील अनंतकाल जीवन जगण्याविषयी बोलणे म्हणजे सत्याकडे डोळेझाक करण्यासारखेच आहे. तुम्हाला तो वेळेचा अपव्यय वाटेल. अनंतकाल जीवन जगणे हे एक स्वप्न वाटेल.”
२ या शब्दांनी तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकाची सुरवात होते. चौदा वर्षांआधी हे पुस्तक प्रकाशित झाले त्यावेळेपेक्षा आज त्यातील प्रस्तावना अधिक प्रसंगोचित आहे. लोकांना हे जाणून घेण्याची गरज आहे की, बायबल मार्गदर्शन देते आणि त्यांना पीडित करणाऱ्या सर्व समस्यांचे समाधान करण्याचे वचन देते. अनंतकाल जगू शकाल पुस्तक सादर करून डिसेंबरमध्ये लोकांना मदत करण्याचा प्रयत्न आपण करू. अर्थात, एखाद्या व्यक्तीला साहित्य दिले म्हणजे ती व्यक्ती राज्य आशेचा स्वीकार करीलच याची कोणतीही खात्री नाही. तर बायबल अभ्यास सुरू करण्याच्या ध्येयाने आपण पुनर्भेटी केल्या पाहिजेत. असा प्रयास केल्यावर मदत मिळण्याची खात्री आपल्याला मिळते. (मत्त. २८:१९, २०) येथे काही प्रस्तावना सुचवल्या आहेत:
३ तुम्ही एखाद्या वयस्कर व्यक्तीला भेटल्यास असा प्रस्ताव वापरून पाहू शकता:
◼ “मी असा प्रश्न विचारू इच्छितो: तुमच्या तरुणपणी समाजातील लोक एकमेकांशी कसा व्यवहार करायचे? [प्रतिसादाकरता वाव द्या.] परिस्थितीत पुष्कळसा फरक झालाय, नाही का? मग हा बदल कशामुळे झाला असं तुम्हाला वाटतं? [प्रतिसादासाठी वाव द्या.] खरं म्हणजे, आपण बायबलमधील एका भविष्यवाणीची पूर्णता पाहत आहोत. [२ तीमथ्य ३:१-५ वाचा.] आजच्या जगाचं अचूक वर्णन देण्याखेरीज बायबल नजीकच्या भवितव्यातील एका चांगल्या जगाचं वचन देतं. बायबलमधल्या अनेक भविष्यवाण्या पूर्ण झाल्यामुळे भवितव्याविषयी ते जे काही सांगते ते सुद्धा खरं ठरेल असा आमचा विश्वास आहे. देवाच्या मार्गदर्शनाखाली एक जागतिक सरकार असेल अशाचप्रकारचं एक अभिवचन बायबलमध्ये दिलंय.” अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील ११२ पृष्ठ काढा आणि परिच्छेद २ वाचा. घरमालकाला पुस्तक घेण्यास उत्तेजन द्या जेणेकरून भवितव्याविषयी बायबलमध्ये कोणती आशा आहे याविषयी तो माहिती मिळवू शकेल.
४ तुम्ही ज्या वयस्कर व्यक्तीला “अनंतकाल जगू शकाल” पुस्तक देऊ केले आहे तिला पुन्हा भेट देताना तुम्ही असे म्हणू शकता:
◼ “आपण मागे बोललो तेव्हा, काही वर्षांआधीच्या जीवनाच्या तुलनेत आधुनिक समाजात पुष्कळसं परिवर्तन होऊन तो समाज बिकट बनलाय असं आपण दोघांनीही मान्य केलं होतं. परंतु, भवितव्यात उत्तम जग असेल अशी आशा बायबल देतं हे दाखवायला मी पुन्हा आलोय. [वाचा प्रकटीकरण २१:३, ४.] आपल्या सर्वांना उत्तम परिस्थितीत जगायला आवडेल म्हणून या विषयी बायबल आणखी काय सांगते ते आपण पाहायला हवं.” अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील अध्याय १९ काढा आणि परिच्छेद १-३ वाचा. मोफत गृह बायबल अभ्यास सादर करा.
५ तुम्ही तरुण व्यक्तीशी संभाषण करत असल्यास, असे म्हणू शकता:
◼ “मी तुम्हाला असा प्रश्न करू इच्छितो: तरुण व्यक्ती या नात्याने भवितव्याविषयी आशावादी असणं उचित आहे असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला भविष्याविषयी काय वाटतं? [प्रतिसादासाठी वाव द्या.] सुदैवाने, भवितव्याबद्दल आशावादी असायला खरं कारण आहे. [वाचा स्तोत्र ३७:१०, ११.] लोकांना बायबल आणि त्यातील मजकुराविषयी विविध अभिप्राय असल्यामुळे तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक आम्ही प्रकाशित केलंय. बायबल काय म्हणतं त्यावर विश्वास करण्यासाठी ते कोणती कारणं देतं त्याकडे लक्ष द्या. [पृष्ठ ५६ वरील परिच्छेद २७ मधील पहिली तीन वाक्ये आणि संपूर्ण २८ परिच्छेद वाचा.] बायबलच्या म्हणण्यावर आपण विश्वास ठेवू शकतो अशी खात्री एकदा पटली की मग भवितव्यासाठी आपल्याला निश्चित आशा असू शकते. या पुस्तकाची एक प्रत स्वीकारून वाचावी असं उत्तेजन मी तुम्हाला देतो.”
६ “अनंतकाल जगू शकाल” पुस्तक स्वीकारलेल्या तरुण व्यक्तीला भेटण्यासाठी तुम्ही परत जाता तेव्हा अशी सुरवात करू शकता:
◼ “भवितव्याविषयी तुम्ही किती चिंतातुर आहात हे मला सांगितल्याबद्दल मला बरं वाटलं. तुम्हाला आठवत असेल की, आपल्याला आनंदी आणि सुरक्षित भवितव्याचं अभिवचन देणारं बायबल वचन मी तुम्हाला दाखवलं होतं. इथं आणखी एक वचन आहे. [वाचा प्रकटीकरण २१:३, ४.] मी तुम्हाला दिलेल्या पुस्तकावरून, बायबल हे देवानं प्रेरित केलेलं पवित्र पुस्तक आहे याचा खात्रीशीर पुरावा मिळतो. या वास्तविकतेचा गहन अर्थबोध आहे. याचा अर्थ, बायबल देवाविषयी जे काही सांगते ते आपण स्वीकारू शकतो असा होईल. [पृष्ठ ४७ वरील परिच्छेद १-२ वाचा.] तुमची इच्छा असेल, तर तुमच्यासोबत बायबलचा मोफत अभ्यास करायला मला नक्कीच आवडेल.” अभ्यास स्वीकारण्यात आल्यास, त्या व्यक्तीकडे बायबलची एक प्रत आहे का ते विचारा. नसल्यास, नवीन जग भाषांतर (इंग्रजी) अथवा त्याला हवे असेल त्या भाषेत एखादे बायबल तुम्ही आणून द्याल असे सांगा.
७ जीवनाच्या समस्यांना तोंड देण्याकरता मार्गदर्शन कोठून मिळवावे हे माहीत नसलेली व्यक्ती कदाचित या प्रस्तावास प्रतिसाद देऊ शकेल:
◼ “आपण अशा काळात जगत आहोत जिथं जवळजवळ सर्वांनाच गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. अनेकजण मार्गदर्शनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सल्लागारांकडे जातात. काहीजण मानसशास्त्रातून मदत प्राप्त करू पाहतात. खरोखरच कामी पडणारा योग्य सल्ला आपल्याला कुठून मिळेल असं तुम्हाला वाटतं? [प्रतिसादासाठी वाव द्या.] बायबल अशा एका महत्त्वपूर्ण वस्तुस्थितीविषयी सांगते जी आपण सर्वांनी समजून घेणं जरूरीचं आहे.” यिर्मया १०:२३ वाचा. तुम्ही पृथ्वीवर अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील अध्याय २९ काढा आणि परिच्छेद ३ वाचा. “बायबलमध्ये दिलेले तत्त्व आपल्या जीवनाचा दर्जा आता कसा सुधारू शकते आणि देवाच्या राज्यात आपल्या सर्व समस्या कशा सुटतील हे समजण्यास ते पुस्तक तुम्हाला मदत करील. तुम्हाला ते वाचायला आवडेल का?” पुस्तक सादर करा.
८ प्रथम भेटीत, मार्गदर्शनाची मानवाला गरज आहे याविषयी तुम्ही बातचीत केली असल्यास, पुनर्भेटीच्या वेळी असे म्हणून तुम्ही चर्चा पुढे जारी ठेवू शकता:
◼ “आपण प्रथम भेटलो तेव्हा, जीवनाच्या समस्यांना यशस्वीपणे तोंड देण्याकरता आपल्याला देवाकडील मार्गदर्शनाची गरज आहे असं आपल्या दोघांचं सहमत झालं होतं. त्याबाबत, मी तुम्हाला दिलेल्या पुस्तकात समाप्तीला जे विवेचन केलंय ते माझ्या मते तुम्हाला आवडलं असेल. [अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील पृष्ठ २५५ वरील परिच्छेद १४-१५ वाचा.] तुमच्यासोबत मोफत गृह बायबल अभ्यास करायला मला आवडेल आणि आताच त्याचं प्रदर्शन मी करून दाखवू शकतो.”
९ आपल्या जीवनात देव वचनाच्या महत्त्वाची आणि मार्गदर्शनाची कदर बाळगण्यास लहानथोरांना आपण मदत करू तसे यहोवा आपल्या परिश्रमांवर आशीर्वाद पाठवील.—स्तोत्र ११९:१०५.