ईश्वरशासित सेवा प्रशालेत नाव नोंदणी
१ ईश्वरशासित सेवा प्रशाला, लाखो यहोवाच्या साक्षीदारांना सुवार्तेचे सेवक या नात्याने प्रशिक्षित करण्यामध्ये साधनीभूत ठरली आहे. आपण प्रथम या प्रशालेत नाव नोंदवले होते तेव्हा किती भीती वाटली होती किंवा आपण स्वतः किती अयोग्य आहोत असे वाटले होते हे आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल आणि आता, देवाच्या वचनाचे वक्ते आणि शिक्षक या रूपातील आपल्या आध्यात्मिक विकासामध्ये आपण तिची भूमिका कृतज्ञतेने स्वीकारतो. (पडताळा प्रेषितांची कृत्ये ४:१३.) या उल्लेखनीय प्रशालेत तुम्ही नाव नोंदवले आहे का?
२ कोण नाव नोंदवू शकते? आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित (इंग्रजी) या पुस्तकाचे पृष्ठ ७३ म्हणते: “जे सध्या मंडळीशी संलग्न आहेत असे सर्वजण तिजमध्ये आपले नाव नोंदवू शकतात आणि सभांना उपस्थित राहणारे नवीन लोक देखील, ते ख्रिस्ती तत्त्वांशी विसंगत असलेले जीवन व्यतीत करीत नसल्यास, नाव नोंदवू शकतील.” आम्ही, पात्र ठरणाऱ्या सर्वांना—पुरुष, स्त्रिया आणि मुलांना—प्रशाला पर्यवेक्षकाकडे जाऊन आपले नाव नोंदवण्याचे आमंत्रण देत आहोत.
३ सन १९९७ साठी प्रशाला कार्यक्रम: सन १९९७ च्या ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या कार्यक्रमात विविध बायबल शिकवणी समाविष्ट आहेत. आपल्या वक्तृत्व आणि शिकवण्याच्या क्षमता विकसित करण्याव्यतिरिक्त, प्रत्येक आठवडी त्यातील अभ्यासक्रमातील अनेक आध्यात्मिक रत्नांद्वारे आपल्याला शिकायला मिळते. (नीति. ९:९) साप्ताहिक बायबल वाचनासह आपण प्रशालेसाठी तयारी केली आणि नियमितपणे उपस्थित राहिलो तर कार्यक्रमातून आपण पुष्कळ आध्यात्मिक फायदा मिळवू शकतो.
४ सन १९९७ मध्ये, नेमणूक क्र. २ साठी असलेले पुष्कळसे बायबल पाठ गत वर्षांपेक्षा कमी आहेत. या नेमणुकीसाठी तयारी करत असताना, विद्यार्थ्याने आपल्या वाचनासाठी किती वेळ लागतो हे काळजीपूर्वक पाहावे आणि मग आपल्या भागासाठी नेमून दिलेल्या पाच मिनिटांतील किती वेळ प्रस्तावना आणि समाप्तीकरता वापरता येऊ शकतो हे ठरवावे. यामुळे आपला वेळ संपूर्णतः उपयोगात आणण्यास आणि वाचन क्षमता त्याचप्रमाणे आयत्या वेळी भाषण देण्याची कला विकसित करण्यास विद्यार्थ्याला वाव मिळेल.—१ तीम. ४:१३.
५ ज्ञान पुस्तकावर आधारित नेमणूक क्र. ३ मध्ये प्रस्तुतींची संभवनीय रचना म्हणून अनौपचारिक साक्षकार्य सामील करण्यात आले आहे. यास्तव, एखादी बहीण या नेमणुकीची रचना म्हणून पुनर्भेट, गृह बायबल अभ्यास किंवा अनौपचारिक साक्षकार्य यांपैकी कोणत्याही एकाची निवड करू शकेल. अर्थात, प्रामुख्याने भर रचनेवर नव्हे तर प्रभावशाली शिकवणुकीवर देण्यात यावा.
६ तुम्हाला बोधप्रद भाषण, बायबलचे ठळक मुद्दे किंवा विद्यार्थी नेमणूक प्रस्तुत करण्याचा विशेषाधिकार लाभला असला, तरी आपल्या भागाची उत्तम तयारी आणि सराव करून, त्यास ठाम मताने आणि उत्साहाने सादर करून, जादा वेळ न घेऊन, प्रशाला पर्यवेक्षकांचा सल्ला ऐकून आणि लागू करून आणि नेहमीच आपली नेमणूक विश्वासूपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करून तुम्ही ईश्वरशासित सेवा प्रशालेप्रती आपली कदर दाखवू शकता. अशाप्रकारे, प्रशालेत नाव नोंदवणे हा तुम्हाकरता आणि उपस्थित असलेल्या सर्वांकरता आशीर्वाद ठरेल.