वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९७ पृ. ८
  • बायबल—सर्व लोकांसाठी देवाचे मार्गदर्शक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबल—सर्व लोकांसाठी देवाचे मार्गदर्शक
  • आमची राज्य सेवा—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • बायबल आशा आणि मार्गदर्शन देते
    आमची राज्य सेवा—१९९६
  • देवाकडील ज्ञान अनेक प्रश्‍नांची उत्तरे देते
    आमची राज्य सेवा—१९९७
  • क्षेत्र सेवेकरता सुचवलेल्या सादरता
    आमची राज्य सेवा—२००२
  • डिसेंबर दरम्यान पवित्र शास्त्राभ्यास सुरू करणे
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९७
km १२/९७ पृ. ८

बायबल—सर्व लोकांसाठी देवाचे मार्गदर्शक

१ एकविसशेपेक्षा अधिक भाषा आणि पोटभाषांमध्ये, अंदाजे चार अरब बायबलची छपाई झाल्यामुळे, पृथ्वीवरील ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला देवाचे वचन उपलब्ध झाले आहे. पण तरीही, “परमेश्‍वराची वचने ऐकण्यासंबंधीचा” दुष्काळ अजूनही आहेच. (आमो. ८:११) ज्या अनेकांजवळ बायबल आहे, ते एक तर त्याचे वाचन करीत नाहीत किंवा मग त्यातील मजकूर त्यांना समजत नाही. एक व्यावहारिक मार्गदर्शक म्हणून आपल्या जीवनात बायबलचा उपयोग करण्यास आपण त्यांना कसे प्रोत्साहित करू शकतो बरे?

२ डिसेंबर महिन्यात आपण, तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल, बायबल कथांचं माझं पुस्तक (इंग्रजी), सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य ही पुस्तके किंवा जुलै महिन्याची आमची राज्य सेवा यातील खास दर पुस्तक यादीतील पुस्तके सादर करणार आहोत. आस्था दाखवली जाते तेथे, गेल्या ४७ वर्षांपासून आपल्याला लाभदायक ठरलेले बायबल भाषांतर—नवीन जग भाषांतर देखील आपण सादर करू शकतो. त्याची सुस्पष्ट, आधुनिक भाषाशैली उदाहरणासहित दाखवून ते सादर केले जाऊ शकते. (“प्रत्येक शास्त्रलेख” [इंग्रजी] पुस्तक, पृष्ठ ३२८, परिच्छेद ६, पाहा.) सर्व लोकांसाठी देवाचे मार्गदर्शक म्हणून बायबलचा स्वीकार करण्यास इतरांना उत्साहाने मदत करण्याद्वारे, यहोवाकडून मिळालेल्या या देणगीची आपल्याला मनस्वी कदर असल्याचे आपण दाखवून देऊ.

३ “तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता,” या हस्तपत्रिकेचा उपयोग करून तुम्ही एका प्रस्तुतीची सुरवात करू शकता. तुम्ही कदाचित असे म्हणू शकता:

◼ “जगाच्या ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला बायबल उपलब्ध असलं तरी फारच कमी लोक नियमितपणे ते वाचतात. तुम्हाला काय वाटतं, याचं कारण काय असावं?” हस्तपत्रिकेतील पहिले दोन परिच्छेद आणि त्याबरोबरच २ तीमथ्य ३:१६ देखील वाचा. वर उल्लेखिलेल्या कोणत्याही एका पुस्तकातला उचित मुद्दा ठळकपणे मांडून पुस्तक सादर करा. ते नाकारले गेल्यास, हस्तपत्रिकेचा उर्वरित भाग सवडीनुसार वाचण्यास घरमालकाला सांगा. “भविष्याचे भाकित करणे” या शेवटच्या उपशीर्षकाकडे लक्ष वेधा.

४ ज्या घरमालकाला, “तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता,” ही हस्तपत्रिका दिली होती, त्याची पुन्हा भेट घेताना तुम्ही कदाचित याचा उपयोग करू शकता:

◼ आपली ओळख करून दिल्यानंतर, हस्तपत्रिकेतील शेवटचे दोन परिच्छेद वाचा. पृथ्वीवर अनंतकाल जगण्याच्या शक्यतेचा घरमालकाने कधी विचार केला का, याविषयी त्याला विचारा. त्याने उत्तर दिल्यावर, असे म्हणा: “यहोवाच्या साक्षीदारांना याची खात्री आहे, की बायबलमध्ये आढळणारे सर्व भविष्यवाद, तसेच देवाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणाऱ्‍या सर्व लोकांसाठी एक विस्मयकारक भविष्य भाकीत करणारे भविष्यवाद देखील पूर्ण होतील.” अपेक्षा माहितीपत्रकातील पृष्ठ १३ वरचे चित्र दाखवा, पाठ ५ उघडा आणि दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडून अभ्यास सुरू करा.

५ ज्या क्षेत्रातील लोक धार्मिक मनोवृत्तीचे आहेत, तेथे तुम्ही पहिल्यांदा कदाचित या प्रस्तावनेचा उपयोग करू शकता:

◼ “बायबलविषयी लोकांना जी आदर भावना आहे ती अधिक वाढवण्याचं उत्तेजन आम्ही लोकांना देत आहोत. पुष्कळशा कुटुंबांकडं बायबल असतं, पण गंभीर समस्या निर्माण होतात तेव्हा क्वचितच ते त्याचा सल्ला घेतात. हे कधी तुमच्या पाहण्यात आलं आहे का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] कदाचित त्यांना असं वाटत असेल, की बायबल हे जुन्या काळातलं आहे. हे पुस्तक, (महिन्याच्या सादरतेतील कोणतेही पुस्तक,) याचा सबळ पुरावा देतं, की बायबल वैज्ञानिकदृष्ट्या अचूक आहे, शिवाय आजच्या बिकट समस्यांवर देखील ते व्यावहारिक उपाय पुरवतं.” पुस्तकातील काही मुद्दे ठळकपणे सांगून पुस्तक सादर करा.

६ जेथे प्रकाशन घेण्यात आले होते तेथे पुन्हा भेट देताना, तुम्ही कदाचित असे म्हणू शकता:

◼ “मागच्या वेळी मी तुमच्याकडे आलो होतो तेव्हा आपण याची चर्चा केली होती, की आजच्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी बायबल कशी आपली मदत करतं. ते देवाचं वचन आहे असं समजून ज्या लोकांनी त्याचा स्वीकार केला आहे, त्यांनाही अधिक आनंदी आणि समाधानी जीवन व्यतीत करण्यास मदत मिळाली आहे. मागच्या वेळी मी तुम्हाला जे पुस्तक दिलं होतं त्यामध्येच स्पष्ट केलेलं एक व्यावहारिक बायबल तत्त्व मी तुम्हाला दाखवू इच्छितो.” तुम्ही सादर केलेल्या पुस्तकातील एखाद्या शास्त्रवचनीय तत्त्वावर चर्चा करा. आस्था दाखवल्यास, ज्ञान पुस्तक किंवा अपेक्षा माहितीपत्रकातून अभ्यास करण्याचा प्रस्ताव मांडा.

७ पुढील प्रस्तुती, वयस्कर लोकांची आस्था जागवू शकते:

◼ “असा एक काळ होता जेव्हा अनेक घरांतून बायबलचं वाचन केलं जायचं आणि त्याच्या तत्त्वांचं पालन केलं जायचं. तुमच्या कुटुंबातही असंच होतं का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] आजकाल असं दिसून येतं, की बहुतेक लोक इतके कामात असतात, की बायबल वाचण्यासाठी ते वेळंच काढू शकत नाहीत, किंवा मग त्यांना असं वाटतं की त्याची नैतिक तत्त्वं जुन्या पद्धतीची आहेत. पण, आज असे अनेक लोक आहेत ज्यांनी बायबलचा अभ्यास केल्यामुळं त्यांच्या जीवनात चांगले बदल घडून आले आहेत. देवाच्या वचनातील सामर्थ्यानं त्यांना कशी मदत केली हे वाचण्याची जर तुमची इच्छा असेल तर मला हे पुस्तक तुम्हाला द्यायला आवडेल.” त्या महिन्यासाठी असलेल्या पुस्तक सादरतेपैकी कोणतेही पुस्तक सादर करा.

८ पुनर्भेट करताना तुम्ही कदाचित असे म्हणू शकाल:

◼ “आपण मागच्या वेळी चर्चा केली तेव्हा आपण हे मान्य केलं होतं, की आधुनिक समाजात बायबलच्या नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. या अनादरामुळं आपण चिंतित झालं पाहिजे का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] बायबलचे ज्ञान संपादन करण्यावर येशू ख्रिस्ताने खूप भर दिला होता.” योहान १७:३ वाचा. मग ज्ञान पुस्तकात अध्याय १ च्या परिच्छेद ५ मध्ये दिलेली माहिती सांगा. आपल्या मोफत गृह बायबल अभ्यास कार्यक्रमाचे स्पष्टीकरण द्या आणि त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्याचा प्रस्ताव मांडा.

९ बायबल—सर्व लोकांसाठी देवाचे मार्गदर्शक, याकडे लोकांचे लक्ष वेधण्याचे तुमचे सर्व प्रयास यहोवाने आशीर्वादित करावेत म्हणून प्रार्थना करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा