वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९६ पृ. ५
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • उपशिर्षक
  • पुढील विधानांची उत्तरे, खरे किंवा खोटे यात द्या:
  • पुढील प्रश्‍नांची उत्तरे द्या:
  • पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा वाक्यांश पुरवा:
  • पुढील विधानांतून अचूक उत्तर निवडा:
  • पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:
आमची राज्य सेवा—१९९६
km ८/९६ पृ. ५

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत मे ६ ते ऑगस्ट १९, १९९५ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्‍नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.

[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्रश्‍नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्‍तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरुज नियतकालिकाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]

पुढील विधानांची उत्तरे, खरे किंवा खोटे यात द्या:

१. येशूच्या एका बलिदानाने मोशेच्या नियमशास्त्रातील सर्व अर्पणांची जागा घेतली. [४, uw-MR पृ. ३३ परि. ८(४)]

२. “मागोग देशातील गोग” ह्‍या जगातील सरकारांना केलेला लाक्षणिक सूचक आहे. (यहे. ३८:२) [१२, साप्ताहिक बायबल वाचन; पहा w९१ ८/१५ पृ. २७, परि. २.]

३. यहेज्केल २३ अध्यायात दाखवल्यानुसार अहला ही अहलीबाची थोरली बहीण होती, त्याचप्रमाणे रोमन कॅथोलिसिझम ही प्रोटेस्टंटीझमची थोरली बहीण आहे व या दोन्ही संघटनांनी जगातील वाणिज्य तसेच राजकीय शक्‍तींसोबत आध्यात्मिक जारकर्म करून स्वतःला दूषित केले आहे. [६, साप्ताहिक बायबल वाचन; पहा w८९ ४/१ ३०.]

४. संत बनण्याकरता एखाद्याने मेले पाहिजे. [१, rs पृ. ३५३ परि. १]

५. प्रकटीकरण २०:१० येथे वर्णन केल्यानुसार सैतानाला “अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले” याचा अर्थ काय होतो ते प्रकटीकरण २१:८ ज्याप्रमाणे स्पष्ट करते त्यावरून बायबल स्वतः स्पष्टीकरणे देते असे दिसून येते. [१६, rs पृ. ३६५ परि. ४]

६. याकोब ४:१७ व यहेज्केल ३३:७-९ यांत सुसंगतता आहे व देव आपल्याकडून जी अपेक्षा करतो त्याचे ज्ञान असल्यामुळे आपण त्याला जबाबदार ठरतो असे ती शास्त्रवचने दाखवतात. [१०, साप्ताहिक बायबल वाचन; पहा wMR९३ ४/१ पृ. ७ परि. १.]

७. राजा नबुखद्‌नेस्सराने दानीएलाला स्वप्नातील मूर्तीचे वर्णन करून सांगितल्यावर त्याचा अर्थ सांगण्याद्वारे दानीएलाने तो खरा संदेष्टा असल्याचे सिद्ध केले. [१५, साप्ताहिक बायबल वाचन; पहा दानीएल २:७-९, २६.]

८. यहेज्केल ४७:१ मध्ये वर्णन केलेल्या काल्पनिक मंदिरातून वाहणारे पाणी बाप्तिस्म्याच्या शुद्ध करणाऱ्‍या शक्‍तीला चित्रित करते. [१४, साप्ताहिक बायबल वाचन; पहा w८८ ९/१५ पृ. २७ परि. २०.]

९. कोणी तुम्हाला ‘मजा करण्यास’ आग्रह केल्यास, मग ते आमंत्रण, ख्रिस्ती असण्याचा दावा करणाऱ्‍या व्यक्‍तीकडून आले असले, तरीही नाही म्हणण्यास कधीच कचरू नका. (२ पेत्र २:१८, १९) [८, uw-MR पृ. ४३ परि. ११]

१०. देवाने दियाबलाला निर्माण केले. [१३, rs पृ. ३६३ परि. २]

पुढील प्रश्‍नांची उत्तरे द्या:

११. इसहाकाला अर्पण करण्याच्या अब्राहामाच्या प्रयत्नाने काय समजून घेण्यास आपली मदत केली पाहिजे? (उत्प. २२:१-१८) [३, uw-MR पृ. ३२ परि. ८(१)]

१२. यहोवा देवाने आदाम व हव्वेला दिलेली कामगिरी एक नियम होता असे का म्हटले जाऊ शकते? (उत्प. १:२८; २:१५) [६, uw-MR पृ. ३८ परि. २]

१३. यहोवाच्या अभिषिक्‍त साक्षीदारांनी व त्यांच्या साथीदारांनी कोणत्या प्रकारे यहेज्केलाप्रमाणे असावयाचे आहे? (यहे. ११:२५) [१, साप्ताहिक बायबल वाचन; पहा w८८ ९/१५ पृ. १६ परि. ३.]

१४. सर्पाच्या संततीमध्ये कोणाचा समावेश होतो? [२, uw-MR पृ. ३० परि. ३]

१५. यहोवावर लबाडीचा आरोप लावण्याखेरीज, देव आपल्या मनुष्यप्राण्यांना काय देत नसल्याचा दावा सैतानाने केला? (उत्प. ३:१-५) [१०, uw-MR पृ. ४६ परि. १]

१६. यहोवा या ईश्‍वरी नावाचा अर्थ काय आहे? [१३, kl-MR पृ. २५ परि. ७]

१७. आदाम व हव्वेने बऱ्‍यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाल्ले “त्या दिवशी” ते मरण पावले असे कोणत्या दोन पद्धतीने म्हटले जाऊ शकते. (उत्प. २:१७) [१३, uw-MR पृ. ५६ परि. ५]

१८. २ थेस्सलनीकाकर १:९ आणि प्रकटीकरण २१:८, विश्‍वव्यापी तारण खोटी शिकवण असल्याचे स्पष्टपणे कसे दाखवून देतात? [८, rs पृ. ३५८ परि. १-३]

१९. कोणत्या संदेष्ट्याने पृथ्वीला ‘नभोमंडळ’ असे संबोधले, व शास्त्रवचनांत हे कोठे लिहिले आहे? [८, kl-MR पृ. १७ परि. १४]

२०. दियाबल अस्तित्वात आहे याच्या पुराव्याचा कोणता मुख्य स्रोत आपल्याजवळ आहे, आपल्याकडे कोणत्या संशयातीत प्रत्यक्ष साक्षीदाराची जबानी आहे, आणि जगातील दुष्टाईचे प्रमाण, सैतानाच्या अस्तित्वाची खात्री कशा प्रकारे पटवते? [११, rs पृ. ३६१ परि. ३, ४]

पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा वाक्यांश पुरवा:

२१. यहेज्केल २१:२६ याच्या पूर्णतेत, _________________________ हे “उंच” राज्य _________________________ मध्ये नाश करण्याद्वारे “नीच” करण्यात आले, व “नीच” _________________________ राज्यांना “उंच” करण्यात आले व अशा तऱ्‍हेने देवाच्या प्रतिनमुनेदार _________________________ हस्तक्षेप न होता त्यांना पृथ्वीवरील ताबा घेऊ दिला. [५, साप्ताहिक बायबल वाचन; पहा w८८ ९/१५ पृ. १९ परि. १६.]

२२. _________________________ पुस्तकाचा काही भाग आधीच लिहिलेला प्रत्यक्ष _________________________ आहे, जो इतक्या शतकांदरम्यानच्या महान साम्राज्यांच्या सत्तेकरता झालेल्या संघर्षावर केंद्रित करतो. [१५, si पृ. १३८ परि. १]

२३. यहेज्केल ३४:२३ येथील “माझा सेवक दावीद” ही अभिव्यक्‍ती _________________________ याच्या मृत्यूच्या बऱ्‍याच कालावधीनंतर लिहिण्यात आली; ते भविष्यसूचक विधान आहे व _________________________ सूचित करते. [१४, si पृ. १३७ परि. ३१]

२४. इस्राएल लोकांनी देवाविरुद्ध पाप केले असते व त्यांना बंदिवासात नेले असते, तर _________________________ या नात्याने त्यांना काय झाले असते त्याविषयी निर्गम ३४:७ दाखवते, तर यहेज्केल १८:४ देवाला _________________________ जबाबदार असण्याविषयी सांगते. [४, साप्ताहिक बायबल वाचन; पहा w८८ २/१ पृ. ६.]

२५. बायबल वाचताना, तुम्ही जे काही वाचत आहात त्याचा _________________________ अवलंब तुम्ही कसा करू शकता आणि _________________________ मदत करण्याकरता तुम्ही वाचत असलेल्या गोष्टींचा उपयोग कसा करू शकता हे स्वतःला विचारणे बरे असेल. [१, uw-MR पृ. २६ परि. १२(४) आणि पृ. २८ परि. १२(५)]

पुढील विधानांतून अचूक उत्तर निवडा:

२६. एखाद्या ख्रिश्‍चनाच्या जीवनातील मुख्य गोष्ट (मंडळीत विशेषाधिकार असणे; हर्मगिदोनातून बचावणे; यहोवासोबत चांगला नातेसंबंध असणे) ही आहे. [७, uw-MR पृ. ४१ परि.९]

२७. आपल्याला जीवनात तोंड द्याव्या लागणाऱ्‍या समस्या बहुधा (आपल्याला हानी पोहंचवू पाहणाऱ्‍या लोकांमुळे; समय व प्रसंगामुळे; आपल्या स्वतःच्या पापी प्रवृत्ती आणि कुसंगतीमुळे) उद्‌भवतात हे मान्य करण्यास अनेक लोक नकार देतात. (१ करिंथ. १५:३३; याको. १:१४, १५) [९, uw-MR पृ. ४४ परि. १३]

२८. आपले (ज्ञान; शिकवण्याची क्षमता; वर्तन) देवाला निष्ठावान राहण्याच्या सर्वश्रेष्ठ वादविषयाच्या संबंधात आपली काय भूमिका आहे हे दाखवते. [१२, uw-MR पृ. ५२ परि. १२]

२९. प्रथम (विदेशी; यहुदी; सुंता केलेले शोमरोनी), नंतर (विदेशी; यहुदी; सुंता केलेले शोमरोनी) व शेवटी (विदेशी; यहुदी; सुंता केलेले शोमरोनी) ‘दयेचे पात्र’ बनले. (रोम. ९:२३, २४) [१६, uw-MR पृ. ५८ परि. ८, १०]

३०. सैतानाकडून शक्‍ती मिळालेले श्‍वापद (अँग्लो-अमेरिकन जागतिक सत्ता; संयुक्‍त राष्ट्रसंघ; आधिपत्याची विश्‍वव्यापी राजकीय व्यवस्था) आहे. (प्रकटी. १३:१, २) [१५, rs पृ. ३६४ परि. २—पृ. ३६५ परि. २]

पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:

स्तोत्र ७८:४०, ४१; यश. ५५:१०, ११; यहे. १८:२५; दानी. १:८, ११-१३; प्रे. कृत्ये ८:३२-३८;

३१. सत्य व येशू ख्रिस्ताने बायबल भविष्यवाणींच्या पूर्णतेत जे काही केले आहे त्याबद्दलची कदर प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना बाप्तिस्मा घेण्यास प्रवृत्त करते. [३, uw-MR पृ. ३२ परि. ७]

३२. तरुण ख्रिश्‍चनांनी अधिकाऱ्‍यांना तसेच सह-विद्यार्थ्यांना आदराने, ते त्यांच्या ईश्‍वर शिक्षित विवेकाच्या विरुद्ध जाणार नाहीत हे सांगण्यात कुचराई करू नये. [१५, साप्ताहिक बायबल वाचन; पहा w-MR९२ ११/१ पृ. १४ परि. १७.]

३३. मानवजातीबद्दल व पृथ्वीबद्दल देवाचा मूळ उद्देश पूर्ण करण्यात येईल. [२, kl-MR पृ. ९ परि. १०]

३४. खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी त्यांच्या विचारसरणीत यहोवाच्या मार्गांनुसार बदल करण्यास नेहमीच तयार असले पाहिजे, व सार्थ शास्त्रवचनीय सल्ला आपल्याला लागू होत नाही असे म्हणून त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नये. [४, साप्ताहिक बायबल वाचन; पहा w९० ११/१ पृ. ३१.]

३५. देवाला भावना आहेत, व आपण जी निवड करतो त्याचा त्याच्यावर परिणाम होतो. [६, kl-MR पृ. १४ परि. ८]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा