घोषणा
◼ साहित्य सादरता
ऑगस्ट: पुढीलपैकी ३२ पृष्ठांची कोणतीही माहितीपत्रके ५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करतो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, आणि ईश्वरी नाम—जे सर्वकाळ टिकेल (इंग्रजी).
सप्टेंबर: तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. पर्यायी सादरता म्हणून, तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल किंवा जीवन येथे कसे आले—उत्क्रांतीने अथवा निर्मितीने? (इंग्रजी) हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना).
ऑक्टोबर: टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! (इंग्रजी) यांच्या वर्गण्या. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ९०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी आणि पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ४५.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही. वर्गणी नाकारण्यात आल्यास, नियतकालिकांच्या किरकोळ प्रती प्रत्येकी ४.०० रुपयांस सादर केल्या जाव्यात.
नोव्हेंबर: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक २०.०० रुपयांना. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने सर्व वाटपांचा मागोवा घेण्याकरता खास प्रयत्न केला जाईल.
सूचना: आम्ही सर्व मंडळ्यांना कौटुंबिक आणि अनंतकाल जगू शकाल पुस्तकांचा चांगला उपयोग करण्यास उत्तेजन देतो. प्रचारकांना संपूर्ण वर्षभरात या पुस्तकांच्या प्रती स्वतःजवळ ठेवायला आणि उचित प्रसंगी ती सादर करायला प्रोत्साहन दिले जाऊ शकते. ज्या मंडळ्यांनी अद्याप वरील मोहिमेच्या साहित्याची मागणी पाठवली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर ऑर्डर फॉर्मवर (S-AB-14) ती पाठवावी.
◼ ऑक्टोबर-डिसेंबर १९९६ अंकापासून उर्दूमधील त्रैमासिक सावध राहा! जर्मनीत चार रंगामध्ये छापण्यात येईल आणि मग ती सर्फेस मेलद्वारे थेटपणे भारतात पाठवली जातील. उर्दूमधील सावध राहा! नियतकालिकासाठी ज्या मंडळ्यांची आधीच मागणी आहे त्या डिस्ट्रीब्युटर्स ऑर्डर (M-229) फॉर्म पाठवून त्यांची मागणी हवी असल्यास वाढवू शकतात. तोच फॉर्म वापरून इतर मंडळ्या स्थायी मागणी करू शकतात. उर्दूमधील टेहळणी बुरूज हे मासिक भारतातच छापले जाईल.
◼ प्रत्येक मंडळीला तीन लिटरेचर इंव्हेंटरी (S-AB-18) फॉर्म मिळतील. मंडळीच्या सचिवांनी ऑगस्टच्या सुरवातीलाच साहित्य सेवकांना भेटावे व महिन्याच्या शेवटी मंडळीच्या साहित्य साठ्याची यादी करण्यासाठी तारीख ठरवावी. साठ्यातील सर्व साहित्याची अचूक मोजणी केली पाहिजे आणि एकूण संख्या लिटरेचर इंव्हेंटरी फॉर्म यावर नोंदवावी. नियतकालिक सेवकाकडून उपलब्ध असलेल्या नियतकालिकांची एकूण संख्या मिळवली जाऊ शकते. कृपया मूळ प्रत संस्थेला सप्टेंबर ६ च्या आधी पाठवावी. तुमच्या फाईलसाठी नक्कल केलेली प्रत ठेवा. तिसरी प्रत कच्ची प्रत म्हणून वापरू शकता. ही यादी करताना सचिवांनी देखरेख केली पाहिजे आणि पूर्ण केलेला फॉर्म अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी तपासला पाहिजे. सचिव व अध्यक्षीय पर्यवेक्षक या फॉर्मवर सह्या करतील.
◼ मंडळीचे सचिव काँग्रीगेशन ॲनलीसीस रिपोर्ट फॉर्म (S-10) यावर नोंद करण्यासाठी संख्या देखील संग्रहित करतील. पब्लिशर रेकॉर्ड कार्ड्समधून (S-21) आवश्यक माहितीला तक्त्याच्या रुपात अचूकपणे मांडले जाते त्याची खात्री करण्यासाठी अहवाल संकलन करण्यास मदत करणाऱ्या वडील व सेवा सेवकाला ते काळजीपूर्वक सूचना देतील. काँग्रीगेशन ॲनलीसीस रिपोर्ट फॉर्म अचूकपणे आणि नीटपणे भरला पाहिजे आणि त्यावर सही करण्याआधी सेवा समितीने त्याची काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे. कृपया याची नोंद घ्या की, फॉर्मवरील पहिल्या पाच चौकटींमध्ये सरासरी साप्ताहिक सभांच्या उपस्थिती द्यायच्या आहेत. यांची बेरीज करण्यासाठी, चौकटींच्या वर दिलेल्या सुचनांचे नीट पालन करा. फॉर्मच्या समोरील बाजूच्या खालून दुसऱ्या चौकटीतील संख्येत मात्र नियुक्त वडिलांचाच समावेश करावा हे देखील लक्षात असू द्या; पर्यायी पर्यवेक्षक सेवा सेवक आहेत आणि त्यानुसार शेवटल्या चौकटीतील संख्येत त्यांचा समावेश करावा. कृपया संस्थेला S-10 फॉर्मची मूळ प्रत सप्टेंबर १० च्या आधी पाठवावी; त्याची नक्कल केलेली प्रत तुमच्या फाईलमध्ये ठेवा.
◼ सप्टेंबर १ पासून जे प्रचारक नियमित पायनियर सेवा सुरू करण्याची योजना करत आहेत त्यांनी विलंब न करता अर्ज भरावा.