संस्थेच्या जागतिक कार्य पाठिंबा विस्ताराकरता देणग्या
यशया ५४:२, ३ येथे भाकीत केल्यानुसार, यहोवाची शुद्ध उपासना सबंध पृथ्वीवर विस्तार पावत आहे. गेल्या दहा वर्षांदरम्यान, अंगोला, कॅमेरून, विषुववृत्तीय गिनी, इथियोपिया, मदागास्कर, मलावी, मोझांबिक आणि टोगो या ठिकाणी राज्य कार्यहालचालींवरील बंदी उठवण्यात आली आहे. या तसेच इतर देशांमध्ये जेथे शेत, कापणीसाठी तयार झाले आहे तेथे गिलियड मिशनऱ्यांनी, सेवा प्रशिक्षण प्रशालेतील पदवीधरांनी, बेथेल कुटुंब सदस्यांनी आणि इतरांनी नेमणूक स्वीकारली आहे.—मत्त. ९:३७, ३८.
स्पष्टतः, यहोवाच्या संघटनेतील खऱ्या उपासकांच्या वाढीमुळे शेकडो नवीन राज्य सभागृहे बांधण्याची आवश्यकता आहे. संमेलन सभागृहे आणि आम्ही येथे भारतात करत आहोत त्याप्रमाणे नवीन किंवा व्यापक शाखा सुविधांची योजना करणे देखील अगत्याचे ठरले आहे. या प्रकल्पांना निधी पुरवण्यासाठी तसेच सबंध जगभरात राज्याचे कार्य प्रगतिशील ठेवण्याकरता संस्थेच्या जागतिक कार्याच्या देणग्यांचा बराच उपयोग करण्यात आला आहे.
या दोन पृष्ठांवरील चित्रे व नकाशे—सध्या चालू असलेले बांधकाम आणि लवकरच सुरू होणारे प्रकल्प—संस्था, आफ्रिकेच्या क्षेत्रात काय साध्य करत आहे याची तुम्हाला कल्पना देतात. येथे भारतात, नियमन मंडळाकडून आम्हाला ५० एकर जमीन विकत घ्यायला आणि सुमारे ४०० बेथेल सदस्यांच्या निवासाच्या इमारती व काम करण्याची जागा, तसेच स्वयंपाकघर, डायनींग हॉल, लॉन्ड्री व मेंटेनन्सचे वर्कशॉप अशा सुविधा पुरवण्यासाठी मान्यता मिळाली आहे.
या वर्षी, एप्रिल २ रोजी, ४१,१९३ जण भारतातील स्मारक विधीच्या सणासाठी उपस्थित होते—ही संख्या त्या महिन्यात अहवाल देणाऱ्या प्रचारकांच्या संख्येच्या अडीच पटीपेक्षाही अधिक आहे! आम्ही प्रार्थना करतो की, यातील उपस्थित राहिलेले अनेकजण लवकरच आपल्यासोबत यहोवाची शुद्ध उपासना करण्यात येऊन मिळतील, ज्याचा अर्थ अधिक मंडळ्या आणि राज्य सभागृहांची गरज असा होतो. ही वास्तविकता, यामुळे आपल्याला शुद्ध उपासनेसाठी भौतिक मार्गाने पाठिंबा देण्याचा किती सुहक्क आहे हे पटवून देते. मंडळ्या, राज्य सभागृह साहाय्य व्यवस्था यासाठी निधी पाठवून हे करू शकतात.—लूक १६:९; १ तीम. ६:१८.
[Picture on page 3]
क्वाझुलू-नेटल, दक्षिण आफ्रिका, येथील ९ दिवसांमध्ये बांधण्यात आलेले राज्य सभागृह
[Picture on page 3]
नायजेरियातील आर्थिक काटकसरीने बांधलेले राज्य सभागृह
[Picture on page 3]
१,५०० लोकांसाठी बैठक व्यवस्था असलेले, १९९६ वर्षाच्या शेवटापर्यंत पूर्ण करावयाचे मोझांबिकमधील संमेलन गृह
[Picture on page 3]
१९९६ वर्षाच्या शरद ऋतुपर्यंत तयार होणारी मोझांबिक येथील शाखा सुविधा
[Picture on page 3]
या उन्हाळ्यात पूर्ण होण्यास योजलेली सिएरा लोन शाखा
[Picture on page 4]
चोहीकडून उघडे असलेले मॉरिशसमधील पूर्णत्वास आलेले संमेलन सभागृह, तसेच १९९७ वर्षाच्या वसंत ऋतूत पूर्ण करावयाची शाखा सुविधा
[Picture on page 4]
बांधकाम चालू असलेली झिम्बाब्वे शाखा
[Picture on page 4]
सेनेगल येथील चोहीकडून उघडे असलेले संमेलन सभागृह आणि बांधकाम चालू असलेली नवीन शाखा
[Picture on page 4]
नैरोबी या राजधानीत असलेली नवीन केनिया शाखा
[Picture on page 4]
लवकरच पूर्ण होणारी मदागास्कर शाखा
[Picture on page 4]
मलावीसाठी प्रस्ताव मांडलेल्या शाखा इमारती