देव देत असलेल्या वाढीसोबत आनंद करणे
१ पहिल्या शतकातील ख्रिस्ती, आवेशी राज्य प्रचारक होते. ‘दिवसेंदिवस मंडळ्यांची संख्या वाढायची’ तेव्हा त्यांना आनंद व्हायचा. (प्रे. कृत्ये १६:५) त्यांचे निडर प्रचार कार्य आशिया, युरोप आणि आफ्रिकेपर्यंत विस्तारले आणि परिणामस्वरूप विश्वास ठेवणाऱ्यांचे भरघोस पीक मिळाले.
२ शेवटल्या काळी, प्रचार कार्य “सर्व जगात” पोहंचेल असे येशूने भाकीत केले होते. (मत्त. २४:१४) सन १९९६ च्या सेवा वर्षात, आम्हाला जगभरातील देशांमधून अद्भुत वाढींचे आणि प्रचारकांच्या नवनवीन उच्चांकांचे अहवाल मिळत राहिले. या जलद वाढीमुळे शेकडो नवीन राज्य सभागृहे आणि संमेलन सभागृहे बांधण्याची त्याचप्रमाणे पुष्कळ शाखा दप्तरे विस्तारण्याची गरज भासली आहे.
३ ऑगस्ट १९९६ च्या आमची राज्य सेवा यात आफ्रिकेत होत असलेल्या बांधकामाचा अहवाल देण्यात आला होता. अशाचप्रकारचे कार्य लॅटिन अमेरिकेत होत आहे. १९९६ च्या सेवा वर्षाकरता, मेक्सिको, ४,७०,०९८ प्रचारकांचा अचंबित करणारा उच्चांक आणि सरासरी ६,००,७५१ बायबल अभ्यासांचा अहवाल देतो ज्याकरता ४६६ नवीन मंडळ्यांच्या स्थापनेची गरज आहे!
४ भारतामध्ये या वर्षी आणखी २५ मंडळ्या बनल्या आणि आता एकूण ५३१ मंडळ्या व एकाकी गट आहेत. ऑगस्टमध्ये, १६,६१५ प्रचारकांनी कार्यहालचालीचा अहवाल दिल्यावर आपला २४ वा सलग उच्चांक गाठण्यास आपल्याला आनंद झाला. याचा परिणाम म्हणून या वर्षी सात टक्के वाढ झाली आहे. भारतात साक्षीदारांची १७० राज्य सभागृहे असली तरीही या जलद वाढीमुळे नवीन राज्य सभागृहे बांधण्याची—यातील २१ बांधकाम प्रकल्प सध्या जारी आहेत—त्याचप्रमाणे आपल्या शाखेच्या बांधकाम प्रकल्पाचे काम पुढे नेण्याची आवश्यकता भासली आहे.
५ बांधकाम खर्चिक असले तरीही पुष्कळ राज्य सभागृहे बांधण्याची गरज आहे. अशाप्रकारच्या प्रकल्पांना सहसा राष्ट्रीय राज्य सभागृह निधीतून साहाय्य मिळते; हा निधी तुमच्या सभेच्या ठिकाणी ‘बांधकाम निधी’ असे लिहिलेल्या पेटीत ज्या देणग्या तुमच्याकडून येतात त्याद्वारे पुरवला जातो. अशा बांधकाम खर्चांना स्वेच्छेने हातभार लावल्याने आपल्याला देण्यातील आनंद आणि यहोवाद्वारे वाढ होत आहे हे पाहण्याचा हर्ष अनुभवण्यास मिळतो!—प्रे. कृत्ये २०:३५.
[४, ५ पानांवरील चित्र]
पराग्वे शाखा
[४ पानांवरील चित्र]
इक्वादोर शाखा
[४, ५ पानांवरील चित्र]
मेक्सिकोतील एक्स्टेंशनचे चालू बांधकाम
[४, ५ पानांवरील चित्र]
डोमिनिकन प्रजासत्ताक शाखा
[४ पानांवरील चित्र]
ब्राझील शाखा एक्स्टेंशनसह
[४, ५ पानांवरील चित्र]
उरुग्वे शाखेचे चालू बांधकाम
[५ पानांवरील चित्र]]
लॅटिन अमेरिकेतील वैशिष्ट्यपूर्ण कमी खर्चाची राज्य सभागृहे
१. ब्राझील
२. निकाराग्वा
३. चिली
४. कोलंबिया
५. मेक्सिको
६. ब्राझील
७. पेरू
८. व्हेनेझुएला
९. मेक्सिको