ऑगस्टसाठी सेवा सभा
ऑगस्ट ५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५६ (३३)
१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.
२० मि: “सुवार्तेची घोषणा करण्यात ढिलाई नाही.” भाषण आणि श्रोत्यांसोबत चर्चा. शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), खंड २, पृष्ठ ६७३, परिच्छेद १ यातील उताऱ्यांचा समावेश करा.
१५ मि: “माहितीपत्रकांद्वारे सुवार्तेची घोषणा करा.” (परिच्छेद १-५) प्रास्ताविक भाषणात पहिला परिच्छेद उपयोगात आणा. आपल्या समस्या आणि भूतलावर जीवनाचा आनंद ही माहितीपत्रके सेवाकार्यात वापरण्याच्या फायद्यांबद्दल सकारात्मक विवेचने मांडा. चांगली तयारी केलेल्या चार प्रात्यक्षिकांची योजना करा व या माहितीपत्रकांद्वारे प्रथम भेटी तसेच पुनर्भेटी कशा हाताळल्या जाऊ शकतात ते दाखवा. एक तरुण प्रचारक आपल्या पालकाच्या साहाय्याने भूतलावर जीवनाचा आनंद माहितीपत्रकाचा उपयोग करून प्रस्तुतींचे प्रात्यक्षिक करत असल्याचे दाखवा. प्रचारक, येथे सुचवलेल्या प्रस्तुतींच्या आधारे इतर माहितीपत्रकांच्या प्रस्तुती स्वतः तयार करू शकतात.
गीत १३६ (२८) व समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट १२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १९२ (१०३)
१५ मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. डिसेंबर १, १९९३, टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठे २९-३१ मधील “सहभागिता करण्याचे मार्ग,” या लेखातील सकारात्मक विवेचने समाविष्ट करा.
१५ मि: “माहितीपत्रकांद्वारे सुवार्तेची घोषणा करा.” (परिच्छेद ६-८) पहा! या माहितीपत्रकातील मजकुराविषयी संक्षिप्तपणे सांगा. प्रथम भेट आणि पुनर्भेट यांकरता सुचवलेल्या प्रस्तुतींचे प्रात्यक्षिक दाखवा. सर्वांना त्यांच्या वाटपांचा मागोवा घेण्यास उत्तेजन द्या.
१५ मि: “संस्थेच्या जागतिक कार्य पाठिंबा विस्ताराकरता देणग्या.” वडिलांचे उत्तेजनात्मक भाषण. वार्षिक अहवाल पुस्तक (इंग्रजी) यात वृत्त दिल्यानुसार प्रतिनिधीत्व केलेल्या काही देशांमधील राज्याच्या कार्याबाबतच्या प्रगतीबद्दल काही आकडेवारीचा समावेश करा. भारतामधील भावी बांधकाम प्रकल्पाबद्दल आणि ज्यात सर्वजण भाग घेऊ शकतात अशा आर्थिकरित्या मदत करण्याच्या सुहक्काबद्दलही उत्सुकता वाढवा.
गीत ९ (१९) व समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट १९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १७४ (५६)
१० मि: स्थानिक घोषणा. प्रश्न पेटीची उजळणी करा.
१५ मि: “प्रचार करण्यास कोण पात्र आहे?” वडील दोन अथवा तीन प्रचारकांसोबत लेखाची चर्चा करतात. आपल्याला सर्वोत्तम प्रशिक्षण लाभत आहे व ते आपल्याला देवाचे सेवक होण्यास सज्ज करत आहे यावर जोर द्या. आपल्याला प्रचार करण्यास अपात्र वाटण्याचे काहीच कारण नाही.
२० मि: “ज्ञान पुस्तकाद्वारे शिष्य कसे बनवावेत.” जून १९९६ आमची राज्य सेवा याच्या पुरवणीतील परिच्छेद १७-२६ यांवर श्रोत्यांशी चर्चा. ज्ञान पुस्तकातून जे अभ्यास चालवत आहेत अशांचे स्थानिक अनुभव समाविष्ट करण्यासाठी आधीच योजना करा. त्यांनी पुरवणीतील सुचनांचा उपयोग कसा केला आहे आणि अधिक प्रगतिशील गृह बायबल अभ्यास चालवण्यात त्यांना कशी मदत प्राप्त झाली आहे यावर ते सकारात्मकरित्या बोलू शकतात. सर्वांना पुरवणी जपून ठेवण्यास आणि नवीन अभ्यास सुरू करताना व्यक्तिगतपणे त्याची उजळणी करण्यास उत्तेजन द्या.
गीत १८९ (९०) व समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट २६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १०४ (५७)
१० मि: स्थानिक घोषणा. अधिवेशन मुख्यालयांचे पत्ते असणाऱ्या चौकटीकडे लक्ष वेधवा आणि निदान एका प्रांतीय अधिवेशनाला तरी उपस्थित राहण्याकरता तत्काळ योजना करण्याची गरज आहे ते सांगा.
२० मि: तुमच्या मुलाच्या शालेय शिक्षणाबद्दल आस्था बाळगणे. वडिलांचे भाषण. यहोवाचे साक्षीदार आणि शिक्षण (इंग्रजी), पृष्ठे २-५ या माहितीपत्रकातील माहितीची उजळजी करा, व आपण शाळेतील उपयुक्त प्रशिक्षणाची कदर का बाळगतो ते दाखवा. लौकिक ध्येयांपेक्षा आपण आध्यात्मिक ध्येयांना प्रथम स्थानी का ठेवतो हे शिक्षकांना व्यवहारचातुर्याने कसे समजावून सांगावे याची चर्चा करा. पृष्ठ ३१ वरील “समारोप” यातील मुद्दे समाविष्ट करा. सप्टेंबर ८, १९८८, सावध राहा! (इंग्रजी), पृष्ठ ११ येथे दिलेल्या सूचना लागू करण्यास पालकांना प्रोत्साहन द्या.
१५ मि: सप्टेंबरच्या साहित्य सादरतेची उजळणी करा. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे या पुस्तकाचा आपण वापर करणार आहोत. स्थानिक भाषेत हे जेथे उपलब्ध नाही, तेथे तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक सादर केले जाऊ शकते. कौटुंबिक पुस्तक विश्वभरात पसंत केले जाते आणि लांबलचक प्रस्तावना न देताच ते सादर केले जाऊ शकते. पृष्ठ ३ वर दिलेल्या अध्यायांच्या मनोवेधक शिर्षकांकडे लक्ष वेधले जाऊ शकते. त्याचप्रमाणे, अनंतकाल जगू शकाल पुस्तक सादर करताना “देवाने दुष्टपणाला परवानगी का दिली?,” हा ११ वा अध्याय दाखवा; हा प्रश्न अनेक लोक विचारतात. ते पुस्तक शास्त्रवचनीय उत्तर कसे देते ते दाखवा. एका कार्यक्षम प्रचारकाला या प्रत्येक पुस्तकाच्या संक्षिप्त सादरतेचे प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगा. उचित असेल तेथे, जीवन—येथे कसे आले? उत्क्रांतीने अथवा निर्मितीने? हे पुस्तक सादर केले जाऊ शकते. हे पुस्तक विद्यार्थ्यांना सादर करण्याची जाणीव राखा.
गीत ११३ (६२) व समाप्तीची प्रार्थना.