प्रश्न पेटी
◼ नेमलेला जाहीर वक्ता सभेला वेळेवर येत नाही तेव्हा काय केले जावे?
अधूनमधून, अनिवार्य परिस्थितींमुळे एखादा बांधव आपले निर्धारित भाषण देण्यासाठी वेळेवर येऊ शकणार नाही. ते लवकरच पोहंचतील असे गृहीत धरण्याचे कारण असल्यास, वडील टेहळणी बुरूज अभ्यास आधी घेण्याचा निर्णय कदाचित घेतील; जाहीर सभा त्यानंतर होऊ शकते. वक्ता येणार नाही असे स्पष्ट झाल्यास काय? कदाचित एखादे स्थानिक वक्ते पूर्वीच तयार करून ठेवलेले भाषण देऊ शकतील.
बहुधा काळजीपूर्वक आगाऊ योजनेमुळे ही समस्या टाळली जाते. जाहीर भाषण संयोजकाने निदान एक आठवड्याआधी तरी प्रत्येक वक्त्याला त्यांच्या नेमणुकीची आठवण करून दिली पाहिजे. या स्मरणिकेत, सभेची वेळ, राज्य सभागृहाचा पत्ता आणि शक्य असल्यास, दूरध्वनी क्रमांक तसेच सभागृह कसे शोधावे याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन असले पाहिजे. वक्त्याने या सर्व तपशीलांची काळजीपूर्वक नोंद करावी. त्याने आपली नेमणूक गांभिर्याने घेतली पाहिजे, व ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्यास स्वतःच्या व्यक्तिगत कामकाजात फेरफार करावा. एखाद्या अनिवार्य परिस्थितीमुळे तो असे करू शकला नाही तर त्याने तत्काळ जाहीर सभा संयोजकाशी संपर्क साधावा जेणेकरून एका पर्यायी वक्त्याची योजना केली जाऊ शकते. शेवटल्या क्षणी भाषण रद्द करण्याचे टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे. वक्त्याला विलंब झाल्यामुळे ते काही मिनिटे उशिराने येत असल्यास, त्यांनी राज्य सभागृहात फोन करण्याची योजना केली पाहिजे जेणेकरून बांधवांना पुढे काय करावे ते समजेल.
जाहीर भाषणाच्या नेमणुकांबद्दल कदर, चांगली आगाऊ तयारी आणि स्मरणिका तसेच काळजीपूर्वक देखरेख यांमुळे मंडळी दर आठवडी फायदेकारक जाहीर भाषणाचा लाभ घेऊ शकेल याची खात्री बाळगता येऊ शकते.